
अभिनेत्री ऐश्वर्या राय कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे असते चर्चेत. नुकताच झालेल्या कान फिल्म फेस्टिवल 2024 मध्ये ऐश्वर्या लेक आराध्या हिच्यासोबत पोहोचली होती. पण अभिनेत्रीला मुंबई विमानतळावर स्पॉट करण्यात आल्यानंतर, तिच्या हाताला दुखापत झाल्याचं समोर आलं. अभिनेत्रीच्या हाताला प्लास्टर करण्यात आलय्यामुळे चाहत्यांनी देखील चिंता व्यक्त केली. कोणतंही शुटिंग सुरु नसताना अभिनेत्रीच्या हाताला का इजा झाली? असा प्रश्न चाहत्यांना देखील पडला आहे.
ऐश्वर्या हिच्या हाताला दुखापत झाली होती. ज्यामुळे अभिनेत्रीच्या हाताला प्लास्टर करण्यात आलं. पण कान फिल्म फेस्टिव्हलला जाण्याची परंपरा मोडली नाही. फेस्टिवलमध्ये अभिनेत्री वॉक देखील केलं. ज्यामुळे ऐश्वर्या हिचं कौतुक देखील करण्यात आलं. रिपोर्टनुसार, 11 मे रोजी ऐश्वर्या हिच्या हाताला दुखापत झाली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, ऐश्वर्या घरीच पडल्यामुळे अभिनेत्रीच्या हाताला प्लास्टर करण्यात आलं. मनगटाला आलेली सूज कमी झाल्यानंतर अभिनेत्री राहिलेली कामं पूर्ण केली आणि कान फिल्म फेस्टिव्हलसाठी रवाना झाली. डॉक्टरांचा सल्ला घेऊन अभिनेत्री कान्स फिल्म फेस्टिव्हलसाठी गेली. मुंबईत परतल्यानंतर अभिनेत्रीच्या हाताची सर्जरी होणार अशी देखील माहिती समोर आली. मनगटाला आलेली सूज गेल्यानंतर ऐश्वर्याच्या हाताची सर्जरी होईल… असं देखील सांगण्यात येत आहे.
ऐश्वर्या राय दरवर्षी कान फिल्म फेस्टिव्हलला आवर्जून हजेरी लावते. या फेस्टिव्हलमध्ये ऐश्वर्याचा रेड कार्पेट लूक लक्षवेधी ठरतो. संपूर्ण जगभरात तिच्या अनोख्या लूक्सची चर्चा होते. पण आता अभिनेत्रीच्या हाताला असलेल्या प्लास्टरने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. यावेळी आराध्या आईची काळजी घेताना दिसली.
बच्चन कुटुंबाची लेक असल्यामुळे आराध्या कायम चर्चेत असते, सोशल मीडियावर देखील तिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. खुद्द ऐश्वर्या देखील आराध्या हिचे अनेक फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते. आराध्या देखील तिच्या लूकमुळे कायम चर्चेत असते.
आराध्या सध्या तिचं शालेय शिक्षण घेत आहे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आराध्या परदेशात पुढचं शिक्षण घेण्यासाठी जाणार असल्याची देखील माहिती मिळत आहे. पण यावर कोणी अधिकृत घोषणा केली नाही.