Pratyusha Banerjee Case : प्रत्युषा बॅनर्जी प्रकरणी 10 वर्षांनी मोठी अपडेट समोर, ‘तो’ पुरावा अन्…,जाणून बसेल मोठा धक्का
Pratyusha Banerjee Case : अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जी प्रकरणी मोठी अपडेट समोर आली असून, वकिलांनी एका पुराव्याच्या आधारावर निकाला सुनावला आहे. तब्बल 10 वर्षांनी याप्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे... जाणून तुम्हाला देखील बसेल धक्का...

Pratyusha Banerjee Case : ‘बालिका वधू’ मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जी ही आजा जगात नाही… अशी बातमी समोर आल्यानंतर सर्वांना मोठा धक्का बसला. प्रत्युषा हिच्यासोबत असं काही होईल असा कोणी विचार देखील केला नव्हात. प्रत्युषा ‘बिग बॉस’मध्ये देखील झळकली होती आणि जेव्हा अभिनेता सलमान खान याला याबद्दल कळलं तेव्हा भाईजान याने देखील हळहळ व्यक्त केली. 2016 मध्ये प्रत्युषा हिने टोकाचं पाऊल उचललं आणि तब्बल 10 वर्षांनंतर प्रकणात मोठी सुनावणी झाली आहे. तर जाणून घ्या नेमकं काय झालं आहे.
प्रत्युषाच्या हिच्या निधनानंतर सुरु झालेली सुनावणी अखेर 10 वर्षांनी संपली आहे. यामध्ये प्रत्युषा हिचा बॉयफ्रेंड राहुल राज सिंग याची निर्दोष सुटका झाली आहे. प्रदीर्घ कायदेशीर लढाईनंतर मुंबई उच्च न्यायालयाने राहुल याला सर्व आरोपांमधून पूर्णपणे दोषमुक्त करत मोठा दिलासा दिला आहे. यामुळे राहुल याने मोकळा श्वास घेतला आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, न्यायमूर्ती शिवकुमार डिगे यांच्या खंडपीठाने प्रत्युषा बॅनर्जी प्ररणाचा निकाल जाहिर केला. यावेळी त्यांनी एका पुराव्यावर भर दिला. 1 एप्रिल 2026 रोजी प्रत्युषा हिने गोरेगाव येथील भाड्याच्या घरात टोकाचं पाऊल उचललं…पण त्याआधी तिचं राहुल याच्यासोबत शेवटचं बोलणं झालं होतं…
सर्वात महत्त्वाचं म्हणजे, कोर्टात राहुलच्या बाजूने ज्येष्ठ वकील आबाद पोंडा आणि श्रेयांश मिठारे यांनी प्रभावी युक्तिवाद मांडला. शेवटच्या संभाषणात त्युषाची मानसिक स्थिती ठीक नव्हती. राहुल तिला म्हणत होता की, असं काहीही करु नकोस, मी येत आहे… एवढंच नाही तर, तिने स्वतःच्या या परिस्थितीसाठी कोणाला एकाला नाही तर, आई – वडिलांसह सर्वांना जबाबदार ठरवलं होतं.
विशेष म्हणजे, राहुल आणि प्रत्युषा यांच्या शेवटच्या कॉल रेकॉर्डिंग्सच्या आधारे पोलिसांनी नोंदवलेल्या एफआयआरवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आणि न्यायालयाने राहुलला आरोपांतून मुक्त केलं. सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे, शेवटच्या क्षणी प्रत्युषा हिने ‘मरके भी माही तुझसे मुँह न मोडना…’, असं सोशल मीडियावर स्टेटस ठेवत टोकाचं पाऊल उचललं. अखेर या प्रकरणातून राहुल सिंह याची सुटका झाली आहे.