AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गर्लफ्रेंडने केली काळी जादू, बिग बॉस स्पर्धकाचा धक्कादायक खुलासा

'बिग बॉस 13' मधील स्पर्धक पारस छाब्रा याने नवा पॉडकास्ट शो सुरू केला असून 'आबरा का डाबरा' असं त्याचं नाव आहे. बिग बॉसच्या घरातही त्याचं 'आबरा का डबरा, मैं पारस छाबरा' हा डायलॉग खूप प्रसिद्ध झाला होता. आता याच नावाने त्याने यूट्यूबच्या दुनियेत आपली नवी इनिंग सुरू केली आहे.

गर्लफ्रेंडने केली काळी जादू, बिग बॉस स्पर्धकाचा धक्कादायक खुलासा
Image Credit source: social
| Updated on: Aug 06, 2024 | 11:20 AM
Share

आजकाल यूट्यूबवर अनेक पॉडकास्ट ट्रेंडमध्ये आहेत. या ट्रेंडला अनुसरून अनेक कलाकारांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर स्वतःचे पॉडकास्टही सुरू केले आहेत. त्यामध्ये आणखी एका कलाकाराची भर पडली आहे. तो अभिनेता म्हणजे ‘बिग बॉस 13’ फेम पारस छाब्रा. त्याच्या या पॉडकास्टमध्ये आत्तापर्यंत विशाल आदित्य सिंग आणि आरती सिंग यांनी हजेरी लावली. तर काटा लगा फेम आणि बिग बॉसमधील एक स्पर्धक असलेल्या शेफाली जरीवाला हीदेखील या शोमध्ये नुकतीच येऊन गेली. शेफालीशी संवाद साधता साधता पारसने एक मोठा खुलासा केला. त्याच्या एक्स-गर्लफ्रेंडने त्याच्यावर कशी ‘काळी जादू’ केली होती, याबद्दल पारस पहिल्यांदाच बोलला.

जेव्हा शेफाली जरीवालाने पारसला विचारले की काळी जादू म्हणजे काय? तेव्हा पारसने सांगितलं की, ‘ हे अगदी खरे आहे, माझ्या एक्स गर्लफ्रेंडने माझ्यावर काळी जादू केली होती.’ पारस म्हणाला, “ मी कायम तिचाच रहावं अशी माझ्या एक्स-गर्लफ्रेंडची इच्छा होती. त्यावेळी मी त्याच्यासोबत होतो. पण मी तिला एकटं सोडून निघून जाईन अशी तिच्या मनात भीती होती. त्यामुळे सकाळी ती मला फूंकून पाणी द्यायची आणि मला असं वाटायचं की कदाचित तिच्या धर्मात लोकांना असंच पाणी प्यायला देत असतील. कारण ती आपल्या धर्माची नव्हती. पण तिने दिलेलं पाणी पिऊन मी पूर्णपणे तिच्या कह्यात होतो ‘ असा अनुभव पारसने सांगितला.

गर्लफ्रेंडनेच केली काळी जादू

पुढे पारस म्हणाला, “ मी ५ दिवसांसाठी मुंबईत आलो आणि संपूर्ण ५ महिने इथेच राहिलो. पाच महिन्यांनंतरही मी एकदाच माझ्या घरी गेलो होतो आणि तेही माझे कपडे घेण्यासाठी. माझी आईही ( ते पाहून) गोंधळली होती. पण इथे एक ट्विस्ट आला. ती मुलगी माझ्यावर प्रेम करत होती आणि तिचे कुटुंब माझा तिरस्कार करत होते. मीच त्या दोघांमध्ये समेट घडवून आणला. पण जेव्हा मी तिच्या कुटुंबीयांना भेटलो तेव्हा त्यांनीही माझ्यावर काळी जादू केली. पण त्यांच्या मुलीपासून दूर राहण्यासाठी ही जादू होती. त्यांनी मला चहा दिला, पण मला तो चहा वेगळा वाटला. मात्र मी फारसा विचार केला नाही. चहा प्यायल्यावर मला विचित्र वाटायला लागलं. मी डॉक्टरांकडेही गेलो होतो, माझे सर्व रिपोर्ट्स बरोबर होते.” अशी आठवण पारसने सांगितली.

कसा बरा झाला पारस छाब्रा ?

मात्र रिपोर्ट नॉर्मल येऊनही पारसला खूप अस्वस्थ वाटत होतं आणि म्हणून तो पुन्हा एका बाबांकडे गेला. बाबांनी त्याला थोडा उतारा दिला आणि या युक्तीनंतर ती मुलगी पारसच्या मनातून पूर्णपणे गेली. त्याला खूप हलकं आणि फ्रेश वाटू लागलं. या पॉडकास्टमध्ये शेफालीशी बोलताना पारसने सांगितलं की त्याच्यासोबत जे घडलं त्यानंतर त्याची ज्योतिष शास्त्रातील आवड वाढली आणि त्याबद्दल अधिक माहिती मिळवण्याचा निर्णय त्याने घेतला.

बिग बॉसमध्ये येण्याआधी पारस छाब्रा स्प्लिट्सविलासारख्या रिॲलिटी शोमध्ये दिसला होता. मात्र, या दोन्ही रिॲलिटी शोमध्ये पारस काही चमक खास दाखवू शकला नाही.

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.