AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bigg Boss 14 | एकता कपूरच्या उपस्थित मोठे धमाके, जान कुमार सानू ‘बिग बॉस’मधून ‘आऊट’!

‘वीकेंड का वार’च्या एलिमिनेशन प्रक्रियेत जान कुमार सानूचे नाव आल्याने त्याला घरातून गाशा गुंडाळावा लागला.

Bigg Boss 14 | एकता कपूरच्या उपस्थित मोठे धमाके, जान कुमार सानू ‘बिग बॉस’मधून ‘आऊट’!
| Updated on: Dec 07, 2020 | 5:21 PM
Share

मुंबई : अनेक वादग्रस्त प्रकरणांनंतर गायक जान कुमार सानू अखेर ‘बिग बॉस 14’च्या (Bigg Boss 14) घरातून बेघर झाला आहे (Jaan Kumar Sanu Eliminated). ‘वीकेंड का वार’च्या एलिमिनेशन प्रक्रियेत जान कुमार सानूचे नाव आल्याने त्याला घरातून गाशा गुंडाळावा लागला. यावेळी घरात निर्माती एकता कपूर मोठे धमाके घेऊन आली होती. टीव्ही क्वीन एकता कपूरने ‘बिग बॉस 14’च्या घरात स्पर्धकांची परीक्षा घेतली. एकता कपूरच्या या परीक्षेत केवळ निक्की तंबोली आणि रुबीना दिलैक या दोघीच उत्तीर्ण झाल्या आहेत (Bigg Boss 14 latest update Jaan Kumar Sanu Eliminated).

एकता कपूरने घरातील स्पर्धकांना एकमेकांच्या ‘एक्झिट’ तारखा ठरवण्यास सांगितल्या होत्या. यावेळी जान कुमार सानू आणि कविता कौशिक खेळाच्या 7व्या आठवड्यात घराबाहेर पडतील, असा अंदाज बहुमताने बांधण्यात आला होता.

(Bigg Boss 14 latest update Jaan Kumar Sanu Eliminated)

कविता-एजाज-निक्की-जान वादाची चौकट

कविता कौशिकचे घरातील वागणे पाहून एजाज खानने, पुन्हा एकदा तू त्याच चुका करत असल्याचे तिला म्हटले. तर, दुसरीकडे निक्की तंबोली जान कुमार सानूवर ताशेरे ओढताना दिसली. जास्मीन आणि पवित्रा पुनियादेखील एकमेकांशी वाद घालताना दिसल्या. कोणाच्याही मदतीशिवाय मी अंतिम फेरीत पोहचेन, असा दावा निक्की तंबोलीने केला आहे.

एकता कपूरचा दुसरा निकष

आज सलमान खानने शनिवार व रविवारच्या युद्धामध्ये बिग बॉसच्या मंचावर एकता कपूरचे स्वागत केले. त्यांनी त्यांची ओळख त्यांच्या कुटूंबाशी केली. एकता कुटुंबाला त्यांच्या दुसर्‍या निकषाबद्दल सांगते. एकता कपूर म्हणाली की ती तिच्या सीरियलप्रमाणेच आपला चेहरा बदलून तिचे पात्र इथे ठेवणार आहे. तिचे म्हणणे आहे की घराच्या सदस्यांनी एकमेकांच्या अभिनयाची पुनरावृत्ती करावी लागते. (Bigg Boss 14 latest update Jaan Kumar Sanu Eliminated)

एकता कपूरची दुसरी परीक्षा

सलमान खानने बिग बॉसच्या मंचावर ‘वीकेंड का वार’मध्ये एकता कपूरचे स्वागत केले. त्याचबरोबर घरातल्यांशी ओळखही करून दिली. यावेळी एकता कपूर तिच्या कसोट्यांबद्दल घरातील स्पर्धकांना माहिती देते. सीरियलप्रमाणेच चेहरा बदलून अभिनय करण्याचा टास्क तिने घरातल्यांना दिला आहे. या टास्कमध्ये घरातल्या स्पर्धकांना एकमेकांची भूमिका करायची होती.

सर्व प्रथम, अली गोनीला कविता कौशिक आणि राहुल वैद्यला एजाज खानची भूमिका करण्यास सांगितले जाते. यानंतर कविता कौशिकला एजाज खान आणि रुबीना दिलैकला पवित्रा पुनियाची भूमिका साकारण्याचे आव्हान मिळाले. दोघांचाही अभिनय पाहून एकता कपूर आणि सलमान खान यांनी त्यांचे खूप कौतुक केले. यानंतर एकता कपूरने सलमानला खानला देखील पवित्रा पुनियाचा अभिनय करण्यास सांगितले होते.

(Bigg Boss 14 latest update Jaan Kumar Sanu Eliminated)

दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.