Bigg Boss 16: अंधाऱ्या खोलीस रोमान्स सुरू; श्रीजिता-सौंदर्याने नॅशनल TV वर केलं लिपलॉक

'बिग बॉस'च्या घरात श्रीजिता-सौंदर्याचं लिपलॉक; अब्दु म्हणाला "वेड्या आहेत का?"

Bigg Boss 16: अंधाऱ्या खोलीस रोमान्स सुरू; श्रीजिता-सौंदर्याने नॅशनल TV वर केलं लिपलॉक
अंधाऱ्या खोलीस रोमान्स सुरू; श्रीजिता-सौंदर्याने नॅशनल TV वर केलं लिपलॉक
Image Credit source: Instagram
| Updated on: Dec 29, 2022 | 10:41 AM

मुंबई: ‘बिग बॉस’चं सोळावं पर्व सध्या चांगलंच गाजतंय. बिग बॉसच्या घरात कधी स्पर्धकांमधील भांडणं तर कधी रोमान्स पहायला मिळतोय. मात्र आता प्रेक्षकांना अशी गोष्ट पहायला मिळणार आहे, जी याआधी कधीच बिग बॉसमध्ये घडली नव्हती. असा रोमान्स पहायला मिळाला, ज्यानंतर फक्त प्रेक्षकच नाही तर घरातील सदस्यांनाही धक्का बसला. रात्री बिग बॉसच्या घरातील लाइट्स बंद झाल्यानंतर दोन स्पर्धकांनी लिपलॉक केलं. हे दोन स्पर्धक टीना दत्ता आणि शालीन भनोट नाहीत तर श्रीजिता डे आणि सौंदर्या शर्मा या दोघी आहेत.

सौंदर्या-श्रीजिताचा लिपलॉक

नुकत्याच पार पडलेल्या एपिसोडमध्ये श्रीजिता आणि सौंदर्याने लिपलॉक करत सर्वांना मोठा धक्का दिला. शिव ठाकरे आणि अब्दु रोझिकने त्या दोघींना लिपलॉक करताना पाहिलं आणि दोघंजण थक्क झाले. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यावर नेटकऱ्यांच्या विविध प्रतिक्रिया येत आहेत.

नेमकं काय घडलं?

रात्रीची वेळ होती, बिग बॉसच्या घरातील लाइट्स बंद करण्यात आले होते. कॅप्टन शिव ठाकरे, अब्दु रोझिक, श्रीजिता डे आणि सौंदर्या शर्मा निवांत बसले होते. दोन दिवसांनंतर सौंदर्या आणि श्रीजिता यांचा पॅचअप झाला होता. त्यामुळे दोघी खूप खूश होत्या. चौघे गप्पा मारत होते आणि किसबद्दल बोलत होते. तेव्हाच अचानक सौंदर्या आणि श्रीजिता लिपलॉक करतात. हे पाहून शिव आणि अब्दु यांना धक्काच बसतो आणि दोघं ओरडू लागतात.

पहा व्हिडीओ-

लिपलॉकनंतर श्रीजिता ही अब्दू आणि शिवलाही लिप किस करायला सांगते. तेव्हा अब्दु तिला म्हणतो, “वेडी आहेस का?” नंतर सौंदर्या अब्दुच्या गालावर किस करते. सौंदर्या शिव ठाकरेसोबतही फ्लर्ट करते आणि त्याच्याही गालावर किस करते. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. सौंदर्या आणि श्रीजिताच्या आधी बिग बॉस ओटीटीमध्ये नेहा भसीन आणि रिद्धिमा पंडित यांनीसुद्धा लिप किस केलं होतं. नॅशनल टेलिव्हिजनवर हे पाहून प्रेक्षकसुद्धा थक्क झाले होते.