Bigg Boss 16: टीना-शालीनची लव्हस्टोरी सुरु होण्याआधीच संपली? सुंबुलने केलं तरी काय?

"शालीनसाठी माझ्या मनात शून्य भावना"; टीनाचं वक्तव्य ऐकल्यानंतर अब्दू थक्क!

Bigg Boss 16: टीना-शालीनची लव्हस्टोरी सुरु होण्याआधीच संपली? सुंबुलने केलं तरी काय?
Sumbul and Shalin
Image Credit source: Instagram
| Updated on: Nov 09, 2022 | 5:08 PM

मुंबई- ‘बिग बॉस 16’ या शोमध्ये दररोज स्पर्धकांमधील नाती बदलताना दिसत आहेत. सुरुवातीच्या दिवसांत ज्यांच्यामध्ये खूप चांगली मैत्री झाली, तेच आता एकमेकांचे कट्टर वैरी झाले आहेत. नुकताच या आठवड्याचा नॉमिनेशन टास्क पार पडला. या आठवड्याचा कॅप्टन अब्दू रोझिक याला बिग बॉसने कन्फेशन रुममध्ये बोलावलं आणि नॉमिनेशन प्रक्रियेपासून वाचवण्यासाठी चार स्पर्धकांची नावं त्याला घ्यायला सांगितलं. यावेळी अब्दूने साजिद खान, शिव ठाकरे, निम्रत कौर आणि एमसी स्टॅन यांची नावं घेतली.

अब्दू जेव्हा कन्फेशन रुममधून बाहेर आला, तेव्हा बिग बॉसने इतर स्पर्धकांना नॉमिनेशन टास्क सांगितला. पहिल्या राऊंडमध्ये गोरी नागोरी, दुसऱ्या राऊंडमध्ये सुंबुल आणि शेवटच्या राऊंडमध्ये प्रियांका नॉमिनेट झाली.

हा टास्क संपल्यानंतर सुंबुलने शालीनच्या मैत्रीवर प्रश्न उपस्थित केला. यावरून दोघांमध्ये वाद झाला. टीना दत्तावरूनही सुंबुलने शालीनला सुनावलं. हा वाद नंतर इतका वाढतो की सुंबुल शालीनसोबतची मैत्री तोडते.

या वादानंतर टीना दत्ता गार्डन एरियामध्ये जाऊन शालीनला सांगते की तिच्या मनात त्याच्यासाठी काहीच भावना नाहीत. हे ऐकून अब्दूलाही आश्चर्याचा धक्का बसतो.

नॉमिनेशनच्या तिसऱ्या राऊंडमध्ये टीना आणि शालीन यांच्यामध्ये भांडण होतं. शालीन सतत त्याचा पक्ष बदलतो, असा आरोप टीनाने केला. त्यामुळे या दोघांची लव्हस्टोरी ही सुरू होण्याआधीच संपली की काय, असा अंदाज नेटकऱ्यांकडून वर्तवला जातोय.

बिग बॉसचा खेळ सुरू झाला तेव्हा शालीन आणि सुंबुल यांच्या अफेअरची जोरदार चर्चा झाली. या दोघांच्या वयातील अंतरसुद्धा सोशल मीडियावर चर्चेत आलं होतं. मात्र खेळात पुढे टिकण्यासाठी शालीनने त्याचा पक्ष बदलला. हळूहळू टीना दत्ता आणि शालीन यांच्यात जवळीक वाढू लागली. आता या दोघांमध्येही वाद झाल्यानंतर शालीन कोणाची निवड करणार, हे प्रेक्षकांना पुढील भागात पहायला मिळेल.