नेहमी शांत राहणाऱ्या नील भट्टने अंकिता लोखंडेसोबत केलं असं काही, जे पाहून भडकले नेटकरी

बिग बॉसच्या घरात होणारी भांडणं ही काही नवीन गोष्ट नाही. मात्र या भांडणांमधून अनेक कलाकारांचा वेगळाच चेहरा पहायला मिळतो. असंच काहीसं अभिनेता नील भट्टसोबत घडलंय. बिग बॉसच्या घरात नॉमिनेशन टास्कदरम्यान अंकिता आणि नील यांच्यात जोरदार भांडण झालं.

नेहमी शांत राहणाऱ्या नील भट्टने अंकिता लोखंडेसोबत केलं असं काही, जे पाहून भडकले नेटकरी
Ankita Lokhande, Neil Bhatt
Image Credit source: Youtube
| Updated on: Nov 27, 2023 | 12:04 PM

मुंबई : 27 नोव्हेंबर 2023 | बिग बॉसच्या सतराव्या सिझनला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळतोय. बिग बॉसच्या घरात स्पर्धकांमध्ये दररोज नवीन ड्रामा, नवीन ट्विस्ट आणि भांडणं पहायला मिळत आहेत. यंदाच्या सिझनमध्ये दोन विवाहित जोड्या विशेष चर्चेत आहेत. अंकिता लोखंडे-विकी जैन आणि नील भट्ट-ऐश्वर्या शर्मा या दोघांचे एकमेकांशी चांगलेच वाद आहेत. आता नुकताच नव्या एपिसोडचा प्रोमो सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला असून त्यामध्ये नील भट्ट आणि अंकिता लोखंडे एकमेकांशी जोरदार भांडताना दिसत आहेत. मात्र या भांडणात नेटकऱ्यांना नीलचं वागणं अजिबात आवडलं नाही. तो त्यांचं खरं रुप आता दाखवू लागला आहे, असं नेटकरी म्हणतायत.

नेमकं काय घडलं?

नॉमिनेशन टास्कदरम्यान नील आणि अंकिता यांचं एकमेकांशी कडाक्याचं भांडण होतं. आधी अंकिताचा पती विकी जैन हा नीलला नॉमिनेट करतो आणि त्यानंतर नील अंकिताला नॉमिनेट करतो. हे पाहून अंकिता नीलवर आरोप करते आणि त्याला ‘फट्टू’ (घबराट) म्हणून डिवचते. अंकिताच्या तोंडून ‘फट्टू’ हा शब्द ऐकून नीलची तळपायाची आग मस्तकात पोहोचते आणि तो तिची नक्कल करू लागतो. अंकिता नंतर सोफ्यावर जाऊन बसते आणि तिच्यापाठोपाठ नीलसुद्धा तिच्यासमोर येऊन बसतो.

पहा व्हिडीओ

“माझ्याशी लांबून बोल, कारण तुझ्या तोंडातून दुर्गंधी येतेय”, अशा शब्दांत अंकिता नीलला चिडवते. त्यावर नील तिला म्हणतो, “तुझ्याकडून खोटारडेपणाची दुर्गंधी येतेय.” अंकिता त्याला उत्तर देते, “तुला हवंय का?” त्यावर नील लगेच म्हणतो, “हो मला हवंय.” अखेर नीलवर चिडून अंकिता त्याला म्हणते, “आज तू दिवसभर पोक होशील” (आज मी तुला दिवसभर डिवचणार). नील अंकिताला प्रत्युत्तर देत म्हणतो, “मग कर पोक, सुई मार, चाकू मार, खंजर मार.. जसं तू आधी केलं होतंस.” अंकिताही चिडून नीलला म्हणते, “तुला जो विचार करायचा आहे तो कर.”

अंकिता नीलवर ओरडून त्याला गप्प बसण्यास सांगते. मात्र नील तिचं काही ऐकायला तयार नसतो. तो दुप्पट आवाजात तिच्यावर ओरडतो आणि तिला म्हणतो, “तू चुप.. चल निकल.” नीलचा हा राग पाहून नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘नीलचा खरा चेहरा आता समोर येतोय’, असं एकाने लिहिलं. तर ‘सतत लक्ष वेधून घेण्यासाठी नील मुद्दाम अंकिताला टार्गेट करतोय’, असं दुसऱ्या युजरने म्हटलंय. शोमध्ये फुटेज मिळवण्यासाठी नील सतत अंकिताशी भांडतोय, असाही अंदाज नेटकऱ्यांनी लगावला आहे. बिग बॉसच्या सोमवारच्या एपिसोडमध्ये नॉमिनेशन पार पडणार आहे.