AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

या स्पर्धकाच्या आईने संपवलं होतं आयुष्य; ‘बिग बॉस 17’च्या घरात धक्कादायक खुलासा

बिग बॉसच्या घरातील स्पर्धक अनेकदा एकमेकांसमोर आपल्या भावना मोकळेपणे व्यक्त करत असतात. याआधी अंकिता लोखंडे अनेकदा सुशांत सिंह राजपूतविषयी व्यक्त झाली. आता नुकत्याच पार पडलेल्या एपिसोडमध्ये एका स्पर्धकाने त्याच्या आईविषयी मोठा खुलासा केला आहे.

या स्पर्धकाच्या आईने संपवलं होतं आयुष्य; 'बिग बॉस 17'च्या घरात धक्कादायक खुलासा
BIGG BOSS 17Image Credit source: Instagram
| Updated on: Dec 02, 2023 | 12:50 PM
Share

मुंबई : 2 डिसेंबर 2023 | एकाच घरात जेव्हा अनेक स्पर्धक बऱ्याच दिवसांसाठी बंद केले जातात, तेव्हा त्यांच्यात भावनिक जवळीक निर्माण होणं स्वाभाविक असतं. ‘बिग बॉस’ मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी होणाऱ्यांना इतरांसोबत घरात जुळवून घ्यावं लागतं. अनेकदा त्यांच्यात भांडणं होतात, तर कधी ते एकमेकांसमोर आपलं मन मोकळं करतात. असंच काहीसं ‘बिग बॉस 17’च्या नुकत्याच पार पडलेल्या एपिसोडमध्ये पहायला मिळालं. या शोमधील स्पर्धक आपल्या खासगी आणि व्यावसायिक आयुष्यातील बऱ्याच गोष्टी एकमेकांसोबत मोकळेपणे शेअर करत आहेत. सध्याच्या सिझनमध्ये सर्वाधिक चर्चेत असलेला आणि विजेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानला जाणारा स्पर्धक म्हणजे मुनव्वर फारुकी. मुनव्वरने अनेकदा बिग बॉसच्या घरात त्याच्या खासगी आयुष्याविषयी खुलासे केले आहेत. नुकत्याच पार पडलेल्या एपिसोडमध्ये त्याने त्याच्या आईविषयी धक्कादायक खुलासा केला.

मुनव्वरच्या आईने संपवलं आयुष्य

मुनव्वरने त्याच्या आईविषयी जे सांगितलं, ते ऐकून सर्वांनाच मोठा धक्का बसला. गार्डन एरियामध्ये रिंकू, ऐश्वर्या, नील आणि मुनव्वर एकत्र बसलेले होते. त्यावेळी मुनव्वर त्यांना सांगतो, “आम्ही लहानपणी एक चपाती आणि एक डाळ खाऊन राहायचो. त्यावेळी ते आवडायचंसुद्धा.” हे ऐकल्यानंतर रिंकू मुनव्वरला विचारतो की, “तुझ्या आईचं निधन कधी झालं?” याचं उत्तर देताना मुनव्वर सांगतो, “मी 13 वर्षांचा असताना माझ्या आईने स्वत:चं आयुष्य संपवलं. तिने ॲसिड पिऊन या जगाचा निरोप घेतला होता.”

मुनव्वरच्या आईबद्दल ऐकताच सर्वांना मोठा धक्का बसतो. यावेळी ऐश्वर्या शर्मा मुनव्वरला आईच्या आत्महत्येचं कारण विचारते. तेव्हा तो सांगतो, “त्यावेळी खूप समस्या होत्या. माझ्या वडिलांसोबत त्यांचं नातं चांगलं नव्हतं. खूप सारं कर्ज डोक्यावर होतं आणि इतरही बऱ्याच गोष्टी होत्या.” आईबद्दल बोलताना मुनव्वर भावूक होतो आणि पुढे म्हणतो, “याविषयी नंतर कधीतरी बोलुयात.” घरातील विविध समस्यांमुळे अभ्यास पूर्ण करू शकलो नसल्याचंही मुनव्वरने याआधी बऱ्याचदा सांगितलं होतं. घराची परिस्थिती सुधारण्यासाठी त्याने कमी वयात काम करण्यास सुरुवात केली.

मुनव्वरने बिग बॉसच्या घरात त्याच्या गर्लफ्रेंडविषयीही खुलासा केला होता. नाजिलाला डेट करत असल्याचं त्याने बिग बॉसच्या घरात म्हटलं होतं. याआधी कंगना रनौतच्या ‘लॉक अप’ या शोमध्ये असताना त्याचं नाव अंजली अरोरासोबत जोडलं गेलं होतं. मुनव्वर घटस्फोटीत असून कमी वयातच त्याचा निकाह झाला होता. त्याला पाच वर्षांचा एक मुलगासुद्धा आहे.

Follow Us
नवीन नियम लागू! ST बसमध्ये सवलत हवी असेल तर आता हे कार्ड अनिवार्य
नवीन नियम लागू! ST बसमध्ये सवलत हवी असेल तर आता हे कार्ड अनिवार्य
पप्या शिंदे खंडणी विरोधी पथकात, आईची पहिली प्रतिक्रिया समोर; पुरणेकर..
Pradeep Purnekar Case | अटकेत असलेला आरोपी पप्या शिंदेला खंडणी विरोधी पथकात आणलं, आता...
ठाकरे गट मोठ्या तयारीत! 4 ऑक्टोबरला आंदोलन नंतर 7 ऑक्टोंबरला थेट..
ठाकरे गट मोठ्या तयारीत! 4 ऑक्टोबरला आंदोलन आणि 7 ऑक्टोंबरला थेट...
ज्ञानेश कुमारांविरोधात CJP आक्रमक; मुंबईत उद्या जेलभरो आंदोलनाचा इशारा
ज्ञानेश कुमारांविरोधात CJP आक्रमक; मुंबईत उद्या जेलभरो आंदोलनाचा इशारा!
दुष्काळाची झळ! नागपूरचं संत्रा मार्केट ओस पडलं, 70 टक्के उत्पादन घटलं
दुष्काळाची झळ! नागपूरचं संत्रा मार्केट ओस पडलं, 70 टक्के उत्पादन घटलं
माझ्या मुलाने काही केलं नाही; यात हात असेल तर...पुर्णेकर प्रकरणात
Pradip Purnekar | माझ्या मुलाने काही केलं नाही; यात हात असेल तर... प्रदीप पुर्णेकर प्रकरणात पप्या शिंदेंच्या आईचा मोठा दावा
वाल्मिक कराड जेलमध्ये असला तरी अनेकांसोबत फोनवरून संवाद - बजरंग सोनवणे
Bajrang Sonawane : वाल्मिक कराड जेलमध्ये असला तरी अनेकांसोबत फोनवरून संवाद; बजरंग सोनवणेंचा गंभीर आरोप
1285 गावांची पैसेवारी 50 पैशांखाली; शेतकऱ्याने उभं सोयाबीनच जाळलं
Amravati : अमरावतीत दुष्काळाचा कहर; 1285 गावांची पैसेवारी 50 पैशांखाली; शेतकऱ्याने उभं सोयाबीनच जाळलं
50 वर्षांपासून प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; सूर्या प्रकल्पग्रस्तांना...
Chandrshekhar Bawankule : 50 वर्षांपासून प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; सूर्या प्रकल्पग्रस्तांना मिळणार प्रॉपर्टी कार्ड अन्...
उद्याच्या CJP मोर्चाला पवारांची राष्ट्रवादी मैदानात; सुप्रिया सुळेंनी
NCP Sharad Pawar on CJP : उद्याच्या CJP मोर्चाला पवारांची राष्ट्रवादी मैदानात; सुप्रिया सुळेंनी जाहीर केला पाठिंबा