घटस्फोटीत मुनव्वरच्या प्रेमात परिणीती चोप्राची बहीण? गर्लफेंड म्हणाली ‘मूर्ख बनू नकोस’

स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुकी सध्या बिग बॉसमध्ये चांगलाच चर्चेत आहे. यादरम्यान त्याची गर्लफ्रेड नाजिला सिताशीची एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या पोस्टद्वारे तिने कोणाचंही नाव न घेतला अप्रत्यक्ष टोला लगावला आहे. ही पोस्ट नेमकी काय आहे, ते पाहुयात..

घटस्फोटीत मुनव्वरच्या प्रेमात परिणीती चोप्राची बहीण? गर्लफेंड म्हणाली 'मूर्ख बनू नकोस'
मुनव्वर फारुकीच्या गर्लफ्रेंडची पोस्ट चर्चेतImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Nov 21, 2023 | 3:39 PM

मुंबई : 21 नोव्हेंबर 2023 | यंदाच्या बिग बॉसमध्ये कपल्सचा भरणा आहे. एकीकडे अंकिता लोखंडे-विकी जैन यांची भांडणं तर दुसरीकडे ईशा मालवीय आणि समर्थ जुरेल यांचा रोमान्स. यादरम्यान स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुकी आणि अभिनेत्री मन्नारा चोप्रा यांच्यातील जवळीकने प्रेक्षकांचं लक्ष वेधलं आहे. आमच्यात फक्त मैत्री आहे, असं दोघांनी स्पष्ट केलं असलं तरी बिग बॉसच्या घरातील त्यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना आवडू लागली आहे. मुनव्वर घटस्फोटीत असून त्याने त्याच्या गर्लफ्रेंडचाही खुलासा केला होता. आता त्याची गर्लफ्रेंड नाजिला सिताशी हिने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली आहे.

गेल्या वीकेंड का वार एपिसोडमध्ये मन्नारा आणि मुनव्वरच्या लिंकअपची चर्चा झाली. इतकंच नव्हे तर मन्नाराला ‘भाभी’ (वहिनी) म्हणून चिडवलं गेलं. एका टास्कदरम्यान खुद्द मुनव्वरने तिला गुलाबाचं फूल दिलं होतं. शोमधील या दोघांची जवळीक वाढल्यानंतर आता मुनव्वरची गर्लफ्रेंड नाजिलाने पोस्ट लिहिली आहे. या पोस्टद्वारे तिने कोणाला टोमणा मारला, असा प्रश्न नेटकरी विचारत आहेत.

हे सुद्धा वाचा
View this post on Instagram

A post shared by 🦋 (@nazilx)

नाजिलाची पोस्ट

‘माझी अशी इच्छा आहे की ऑनलाइन जे दिसतं ते सत्य नसतं हे लोकांनी आता समजून घ्यावं. कोणतीच व्यक्ती तितकी पवित्र आणि नैतिकदृष्ट्या प्रामाणिक नसते जितकी ती दाखवण्याचा प्रयत्न करते. किंबहुना सत्य पाहून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. म्हणूनच असं म्हटलं जातं की तुमच्या आदर्श व्यक्तींना कधीच भेटू नका. कारण बहुतांश वेळी तुमच्या मनात त्यांच्याविषयी जी प्रतिमा असते, त्यापेक्षा खऱ्या आयुष्यात ते खूप वेगळे असतात. त्यामुळे ऑनलाइन किंवा टीव्हीवर तुम्ही जे पाहता ते पाहून स्वत:ला मूर्ख बनवू नका’, अशी पोस्ट तिने लिहिली आहे.

नाजिलाने तिच्या या पोस्टद्वारे नेमका कोणावर निशाणा साधला, हे मात्र स्पष्ट नाही. परंतु या पोस्टद्वारे तिने अप्रत्यक्षरित्या मुनव्वरला टोमणा मारल्याचं म्हटलं जात आहे. मुनव्वरने नाजिलाला डेट करत असल्याचं बिग बॉसच्या घरात म्हटलं होतं. त्यापेक्षा त्याने गर्लफ्रेंडविषयी अधिक माहिती दिली नव्हती. याआधी कंगना रनौतच्या ‘लॉक अप’ या शोमध्ये असताना त्याचं नाव अंजली अरोरासोबत जोडलं गेलं होतं. मुनव्वर घटस्फोटीत असून कमी वयातच त्याचा निकाह झाला होता. त्याला पाच वर्षांचा एक मुलगासुद्धा आहे.

Non Stop LIVE Update
शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी संपली, उद्या काय घडणार?
शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी संपली, उद्या काय घडणार?.
रोहित पवार यांचं सोशल मीडिया अकाऊंट बंद? भाजपवर गंभीर आरोप करत म्हणाले
रोहित पवार यांचं सोशल मीडिया अकाऊंट बंद? भाजपवर गंभीर आरोप करत म्हणाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंविरोधात अपशब्द, नंतर अटक; कोण आहेत दत्ता दळवी?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंविरोधात अपशब्द, नंतर अटक; कोण आहेत दत्ता दळवी?.
MPSC विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी, परीक्षा पास झाल्यावर मुलाखती आधी...
MPSC विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी, परीक्षा पास झाल्यावर मुलाखती आधी....
राणे, त्यांची दोन नेपाळी पोरं खुलेआम शिव्या देतात, कुणाची जळजळीत टीका?
राणे, त्यांची दोन नेपाळी पोरं खुलेआम शिव्या देतात, कुणाची जळजळीत टीका?.
ठाकरेंच्या डोक्यावर परिणाम,उपचारांची गरज; जिव्हारी लागणारी टीका कुणाची
ठाकरेंच्या डोक्यावर परिणाम,उपचारांची गरज; जिव्हारी लागणारी टीका कुणाची.
नालायक लोकांना तो शब्द वापरला पाहिजे, ठाकरे अन राऊतांवर कुणाचा पलटवार?
नालायक लोकांना तो शब्द वापरला पाहिजे, ठाकरे अन राऊतांवर कुणाचा पलटवार?.
छगन भुजबळ पदाला चिकटून बसणारे, गरळ ओकणारे मंत्री, कुणी केली जहरी टीका?
छगन भुजबळ पदाला चिकटून बसणारे, गरळ ओकणारे मंत्री, कुणी केली जहरी टीका?.
नाशकात गारपीट आणि अवकाळीनं सारं काही हिरावलं, बळीराजाला अश्रू अनावर
नाशकात गारपीट आणि अवकाळीनं सारं काही हिरावलं, बळीराजाला अश्रू अनावर.
आज आनंद दिघे असते तर त्यांनी चाबकानं फोडल असतं, राऊतांनी कुणाला फटकारल
आज आनंद दिघे असते तर त्यांनी चाबकानं फोडल असतं, राऊतांनी कुणाला फटकारल.