अंकिता लोखंडेच्या पतीविषयी नील भट्टकडून मोठा खुलासा; अखेर बिग बॉसने घेतली माघार

'बिग बॉस 17'च्या घरात अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि तिचा पती विकी जैनला खास सुविधा मिळत असल्याची तक्रार इतर स्पर्धकांनी केली. यानंतर नील भट्टने विकीच्या केसांबद्दल मोठा खुलासा केला. हा खुलासा ऐकल्यानंतर बिग बॉसलाही स्पष्टीकरण द्यावं लागलं. नेमकं काय घडलं, ते वाचा..

अंकिता लोखंडेच्या पतीविषयी नील भट्टकडून मोठा खुलासा; अखेर बिग बॉसने घेतली माघार
नील भट्ट, विकी जैन, अंकिता लोखंडेImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Nov 20, 2023 | 12:47 PM

मुंबई : 20 नोव्हेंबर 2023 | ‘बिग बॉस 17’च्या 36 व्या एपिसोडमध्ये बराच ड्रामा पहायला मिळाला. अरबाज आणि सोहैल खान येण्याआधीच सर्व स्पर्धक बिग बॉसवर नाराज झाले होते. बिग बॉस हा अंकिता लोखंडे आणि तिचा पती विकी जैनला विशेष ट्रिटमेंट देत असल्याचा आरोप इतरांनी केला. यामागचं कारण म्हणजे विकी जेव्हा मेडिकल रुममधून बाहेर आला, तेव्हा तहलकाच्या हे निदर्शनास येतं की त्याचे केस कापलेले आहेत आणि दाढी केलेली आहे. तर दुसरीकडे मन्नारा चोप्राला असा संशय आला की मेडिकल रुममध्ये अंकिताने हेअर स्पासुद्धा केला. यावरूनच घरातील इतर स्पर्धक अंकिता-विकीवर भडकले होते.

अरुण आणि तहलका भडकले

बिग बॉसच्या घरातील सर्व स्पर्धक भडकले आणि ते अंकिता-विकीवरून बिग बॉसला प्रश्न विचारू लागले. यावेळी तहलका आणि अरुण यांच्याशी बोलताना मन्नारा म्हणते, “विकीने बिग बॉसशी आधीच बोलून हेअर स्पाची गोष्ट करारात लिहून घेतली असेल.” मन्नाराचं ऐकल्यानंतर अरुण आणि तहलका भडकतात. ते म्हणतात, “जर विकीला सलूनची सर्व्हिस मिळत असेल तर आम्हालाही हवी आहे.” इतकंच नव्हे तर या दोघांसोबत मन्नारासुद्धा बिग बॉससमोर आपली मागणी मांडते.

नील भट्टचा दावा

बिग बॉसकडे ही तक्रार सुरू असतानाच नील त्यांना सांगतो की विकीचे केस खोटे आहेत. “विकीला हेअरलाइन आणि टक्कलची समस्या आहे. त्याला विगची गरज लागते. दर दोन आठवड्यांनी तो मेडिकल ग्लूने विग चिटकवत असतो. त्यामुळे त्याने आधीच करारात त्याने ही गोष्ट लिहिली असेल. म्हणूनच बिग बॉसकडून त्याला विशेष सेवा मिळतेय”, असा खुलासा नील करतो.

हे सुद्धा वाचा

अंकिता आणि विकी हे बिग बॉसच्या इतर स्पर्धकांमध्ये चर्चेचा विषय ठरतात. तेव्हा बिग बॉस सर्वांना हे स्पष्ट करतो की कास्टिंगच्या वेळीच त्यांच्यासमोर वेगवेगळ्या मागण्या करण्यात आल्या होत्या. मात्र जेव्हा त्यांना समजावलं गेलं तेव्हा त्यांनी या मागण्या मागे घेतल्या होत्या. पण बिग बॉसच्या घरात येणाऱ्या दोन लोकांनी आपली मागणी मागे घेण्यास नकार दिला. “जेव्हा आम्ही त्यांना सांगितलं की त्यांची ही डिमांड त्यांच्यावर भारी पडेल तेव्हा ते म्हणाले, “आम्ही सांभाळून घेऊ.” पण आता ही विशेष सर्व्हिसच चर्चेचा विषय बनली आहे. त्यामुळे सध्यासाठी मी ही सेवा बंद करतोय. जोपर्यंत घरातील इतर सदस्य त्याला होकार देत नाहीत, तोपर्यंत विकी आणि अंकिताला ही विशेष सेवा मिळणार नाही,” असं बिग बॉसने स्पष्ट केलं.

Non Stop LIVE Update
मोदींसोबत जवळीक वाढवण्यासाठी शिंदेंचा खटाटोप, उबाठा नेत्याचा टोला काय?
मोदींसोबत जवळीक वाढवण्यासाठी शिंदेंचा खटाटोप, उबाठा नेत्याचा टोला काय?.
मनोज जरांगे पाटील लहान, त्यांनी अभ्यास करावा; कुणी दिला खोचक सल्ला
मनोज जरांगे पाटील लहान, त्यांनी अभ्यास करावा; कुणी दिला खोचक सल्ला.
... अन् छगन भुजबळ यांच्यासमोरच शेतकरी महिलेला अश्रू अनावर
... अन् छगन भुजबळ यांच्यासमोरच शेतकरी महिलेला अश्रू अनावर.
तेव्हा NCP चा CM का झाला नाही? अजितदादा तुम्हीच सांगा; तटकरेंचं साकडं
तेव्हा NCP चा CM का झाला नाही? अजितदादा तुम्हीच सांगा; तटकरेंचं साकडं.
अजित पवार ३१ डिसेंबरला मुख्यमंत्री होणार? संजय राऊतांचं नवं भाकीत काय?
अजित पवार ३१ डिसेंबरला मुख्यमंत्री होणार? संजय राऊतांचं नवं भाकीत काय?.
मग तुमच्या मनात जे आहे ते, अजितदादांचं मुख्यमंत्रिपदाबाबत सूचक वक्तव्य
मग तुमच्या मनात जे आहे ते, अजितदादांचं मुख्यमंत्रिपदाबाबत सूचक वक्तव्य.
... तेव्हा झोपले होते, भाजपच्या नेत्यानं आरक्षणावरून कुणाला सुनावलं
... तेव्हा झोपले होते, भाजपच्या नेत्यानं आरक्षणावरून कुणाला सुनावलं.
सुनील प्रभूंवर साक्ष बदलण्याची वेळ! शिंदेंच्या वकिलांनी काय केले सवाल?
सुनील प्रभूंवर साक्ष बदलण्याची वेळ! शिंदेंच्या वकिलांनी काय केले सवाल?.
राजीनाम्याची मागणी तर कॅबिनेटमध्ये भुजबळांवरून चर्चा अन् दिली तंबी?
राजीनाम्याची मागणी तर कॅबिनेटमध्ये भुजबळांवरून चर्चा अन् दिली तंबी?.
मराठा आरक्षणावरून सरकार मोठा निर्णय घेणार? हिवाळी अधिवेशनात काय घडणार?
मराठा आरक्षणावरून सरकार मोठा निर्णय घेणार? हिवाळी अधिवेशनात काय घडणार?.