
Bigg Boss 19 Shocking Eviction: ‘बिग बॉस 19’चं घर या आठवड्यात डबल हादरलं आहे. त्याचं कारण म्हणजे घरात झालेलं डबल एव्हिक्शन. गेल्या आठवड्यात, प्रणीत याला मेडिकल इमर्जन्सीमुळे घराबाहेर पडावं लागलं, त्यामुळे तेव्हा इतर कोणताही स्पर्धक बाहेर पडला नाही. मात्र त्यानंतर मेकर्सनी तगडा झटका देत यंदा डबल एव्हिक्शनचा मास्टरस्टोरक लगावला. बरं होऊन प्रणित मोरेची तर बिग बसॉच्या घरात पुन्हा एंट्री झाली, पण तो आल्यावर घरातील दोन सदस्यांना मात्र बाहेर जावं लागलंय
यंदा एव्हिक्ट झालेले दोन स्पर्धक म्हणजे नीलम गिरी आणि अभिषेक बजाज.. हो तुम्ही बरोबर वाचलंत. अभिषेकही आता घराबाहेर पडला आहे. आणि त्याच्या एव्हिक्शनमधील सर्वात मोठा ट्विस्ट म्हणजे अभिषेकला घराबाहेर घालवण्यात कळत-नकळतपणे, त्याचाच खास दोस्त प्रणित मोरे याचा हात आहे. या आठवड्यात, गौरव खन्ना, अशनूर कौर आणि फरहाना भट्ट यांच्यासह अभिषेक बजाज आणि नीलम गिरी यांना घराबाहेर काढण्यासाठी नॉमिनेशन देण्यात आलं होतं. वीकेंड का वार मध्ये सलमान खानने सर्वप्रथम गौरव खन्ना आणि फरहाना भट्ट सुरक्षित असल्याची घोषणा केली. त्यानंतर फक्त अभिषेक, नीलम आणि अशनूर उरले.
प्रणित मोरेला स्पेशल पॉवर
आजारपणानंतर बरा होऊन बिग बॉस 19 च्या घरात प्रणित मोरे परतला. तेव्हा बिग बॉसने त्याला एक स्पेशल पॉवर दिली. या पॉवरमुळे त्याला नॉमिनेटेड असलेल्या तीन स्पर्धकांपैकी एकाला वाचवण्याची संधि होती. मात्र त्यानंतर डबल एव्हिक्शन असेल याची घरात कोणालाच कल्पना नव्हती.
प्रणितचा चुकीचा निर्णय ठरला भयानक
त्यानंतर प्रणीत मोरे याने त्याच्या स्पेशल पॉवरचा वापर करत अशनूर कौरला वाचवलं. अभिषेक बजाज याला त्याच्या चाहत्यांकडून भरपूर मतं मिळतील आणि त्या मतांच्या आधारे तो शोमध्ये सहजपणे टिकून राहील, असं प्रणितला वाटलं. मात्र त्याचा हा विश्वास चुकीचा ठरला. कारण त्याने अशनूरला वाचवण्याचा निर्णय घेतल्यावर मेकर्सनी डबल एव्हिक्शनचं ट्विस्ट आणलं आणि त्याचाच परिणाम म्हणजे अभिषेक बजाज आणि नीलम गिरी हे दोघेही एकाच वेळी बाहेर पडले.
मित्रालाच केलं क्लीन बोल्ड
ही संपूर्ण घटना बिग बॉसच्या इतिहासातील सर्वात मोठ्या धक्क्यांपैकी एक मानली जात आहे. घरातील सर्वात मजबूत स्पर्धकांपैकी एक असलेला अभिषेक बजाजला त्याच्या स्वतःच्या जवळच्या मित्राने अनावधानाने घेतलेल्या निर्णयामुळे शो सोडावा लागला.स्पेशल पॉवर मिळाल्यानंतर जर प्रणितने त्यावेळी अभिषेकला वाचवले असते, तर कदाचित अशनूर कौर ही नीलम गिरीसोबत बाहेर पडली असती आणि अभिषेक बजाजचा प्रवास सुरूच राहिला असता.
चाहत्यांना मोठा धक्का, प्रणितवर संतापले
या निर्णयामुळे सर्वांनाच धक्का बसला असून चाहत्यांनीही संताप व्यक्त केला आहे. अभिषेकचं एव्हिक्शन प्रेक्षकांना आवडलं नसून त्यांनी कमेंट्स करत जोरदार टीका केली आहे. प्रणीत मोरेनं अशनूरला सेफ करण्याचा निर्णय घेताल तो चाहत्यांना फारसा आवडलेा नसून ते प्रणितवर चिडले आणि त्यांनी संताप व्यक्त करत शेकडो कमेंट्स केल्या आहेत. सोशल मीडियावर , ट्विटरवर अभिषेक बजाजचं नावं ट्रेडिंगमध्ये आहे.
Good By BigBoss 😢🙏
UNBEATABLE ABHISHEK BAJAJ
SCRIPTED BB19 THUD PE
THE FARRHANA BHATT SEASON
Pranit Ashnoor #Abhinoor #AbhisekhBajaj #BigBoss19 #FarrhanaBhatt pic.twitter.com/DiM9UK6ePd— मारवाड़ी काका (@marwadikaka25) November 9, 2025
That’s the most unfair eviction 💔
UNBEATABLE ABHISHEK BAJAJ#AbhisekhBajaj #AshnoorKaur #BiggBoss19 pic.twitter.com/q6dAJpD1bW
— BB_Tak 👁️ (@BBTak2468) November 9, 2025
Money makes #SalmanKhan dance & bias makers make him blind. #BiggBoss19 isn’t hosted anymore it’s bought.
UNBEATABLE ABHISHEK BAJAJ #AbhisekhBajaj @ColorsTV@EndemolShineIND pic.twitter.com/P5Lg0E59XI
— Azila👑 (@GirlBoss_Azila) November 9, 2025