Bigg Boss 19 : बापाचं परक्या महिलेसोबत प्रेमसंबंध… दारोदारी भटकर राहिली आई… फरहाना म्हणाली…

Bigg Boss 19 : प्रचंड खडतर होतं 'बिग बॉस 19' फेम फरहाना भट्ट हिचं बालपण... आई 26 वर्षांची असताना बापाने सोडली साथ आणि थाटला दुसरा संसार... आई दरोदारी भटकत असल्याचं पाहून फरहानाने घेतला मोठा निर्णय

Bigg Boss 19 : बापाचं परक्या महिलेसोबत प्रेमसंबंध... दारोदारी भटकर राहिली आई... फरहाना म्हणाली...
Farhana Bhatt
| Updated on: Dec 05, 2025 | 12:46 PM

Bigg Boss 19 : आई – वडिलांच्या नात्याच कटुता असेल तर, त्याचे परिणाम मुलांच्या आयुष्यावर होतात. असंच काही ‘बिग बॉस 19’ फेम फरहाना भट्ट हिच्यासोबत देखील झालं आहे. फरहाना ‘बिग बॉस 19’ च्या घरात कायम रागात आणि भांडताना दिसते. ‘बिग बॉस’ शोमधील प्रत्येक स्पर्धकासोबत तिचं भांडण झालं आहे… ज्यामुळे अनेकदा शोचा होस्ट सलमान खान याने देखील फरहाना हिला चांगलंच सुनावलं आहे… कायम वाद आणि वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असलेल्या फरहाना हिचं लहानपण फार कठीण होतं… याचा खुलासा खुद्द फरहाना हिने अभिनेत्री कुनिका सदानंद हिच्याकडे केलेला.

सांगायचं झालं तर, एका जुन्या एपिसोडमध्ये फरहाना हिने तिच्या खासगी आयुष्यातील मोठी गोष्ट कुनिका सदानंद हिला सांगितली होती. आई – वडिलांच्या घटस्फोटावर फरहाना हिने मोठं वक्तव्य केलं… तर ग्लॅमरस विश्वापासून मुलींनी दूर राहायलं हवं… असं फरहाना हिच्या कुटुंबियाचं मत होतं…

फरहाना भट्ट म्हणाली, ‘माझे आजोबा प्रचंड प्रतिष्ठित व्यक्ती राहिले आहेत… घरातल्या मुली कधीच टीव्हीवर जाणार नाहीत… असं त्यांचं म्हणणं होतं. अशात माझी आई माझ्यासोबत आहे. मला सपोर्ट करते म्हणून त्यांनी अनेकदा वाद देखील घातले. पण माझ्या आईने कधीच मला मागे खेचलं नाही..’ त्यानंतर कुनिका हिने फरहाना हिला तिच्या वडिलांबद्दल विचारलं..

यावर फारहाना म्हणाली, ‘माझ्या वडिलांनी दुसरं लग्न केलं आहे… त्यांचं दुसऱ्या महिलेसोबत विवाहबाह्यसंबंध होते. म्हणून माझ्या आईने वडिलांना सोडून दिलं आणि घटस्फोट घेतला.. तेव्हा माझी आई फक्त 25 – 26 वर्षांची होती… वडिलांनी फसवणूक केल्यानंतर आईने कधीच दुसऱ्या लग्नाचा विचार केला नाही.’

पुढे फरहाना म्हणाली, ‘मी कधी – कधी विनोदी अंदाजात म्हणाते माझा बाप प्रचंड रंगेल व्यक्ती होता… मी कधीच माझ्या बापाला पाहिलं नाही… फक्त फोटोंमध्ये पाहिलं आहे… मी कधीच त्यांना भेटली देखील नाही… त्यांनी मला भेटण्याचा प्रयत्न केला. पण माझ्या आईने कधीच मला भेटू दिलं नाही… कारण तेव्हा कोर्टात केस सुरु होती…’

आई – वडिलांचं वैवाहिक आयुष्य पाहिल्यानंतर फरहाना हिने मोठा निर्णय घेतला. ‘माझ्या आईला मी पाहिलं आहे. त्यामुळे मला आता लग्नाची भीती वाटते… माझ्या मनात आता लग्नाबद्दल भीती आहे आणि ही प्रचंड भीतीदायक गोष्ट आहे…’ असं देखील फरहाना म्हणाली होती.