AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

स्वरगात आता फक्त आकाशगंगा नाही तर, होणार हॉटेल, ताऱ्यांमध्ये चहाचा आनंद… किती येईल खर्च?

आतापर्यंत तुम्ही अनेक महागडे आणि आलिशान हॉटेल पाहिले असतील, पण आता तुम्हाला आकाशात सुरु झालेल्या हॉटेलच्या खोलीत राहता येणार आहे. तेथे चांदण्यांना पाहत तुम्हाला चहाचा आनंद घेता येणार आहे. पण त्यासाठी किती खर्च येईल जाणून घ्या...

स्वरगात आता फक्त आकाशगंगा नाही तर, होणार हॉटेल, ताऱ्यांमध्ये चहाचा आनंद...  किती येईल खर्च?
| Updated on: Mar 15, 2026 | 10:37 AM
Share

ताऱ्यांमध्ये सकाळचा चहा! पृथ्वीच्या बाहेर बांधल्या जाणाऱ्या पहिल्या लक्झरी हॉटेलची कहाणी. पण कधी अवकाशात, ढगांमध्ये आलिशन हॉटेल असेल… असं तुम्ही कधी ऐकलं आहे का? लहानपणापासून आपण तारे आणि आकाशगंगा पाहण्यासाठी टेलिस्कोपचा वापर केला आहे, पण आता तो दिवस दूर नाही, जेव्हा तुम्ही स्वतः ब्राह्मांडात बसून तुमच्या आयुष्यातील खास लोकांसोबत गरमागरम चहा पित असाल.. कारण अंतरिक्ष आता फक्त शास्त्रज्ञांना संशोधन करण्यासाठी उरलेला नाही, तर जगातील सर्वात महागडा आणि आलिशान हॉलिडे डेस्टिनेशन म्हणून उदयास येणार आहे.

आतापर्यंत, ब्लू ओरिजिन आणि विविध अंतराळ पर्यटन कंपन्यांच्या अंतराळयानातून सुमारे 100 पर्यटकांनी पृथ्वीबाहेर अवकाशात प्रवास केला आहे आणि ही संख्या सतत वाढत आहे. लोकांच्या आवडीमुळे, अनेकांना त्यांची पुढची सुट्टी ढगांच्या वर एका आलिशान, शून्य-गुरुत्वाकर्षण हॉटेलच्या खोलीत घालवता यावी म्हणून अंतराळ हॉटेल बांधण्याची तयारी आधीच सुरू झाली आहे.

जगातील पहिलं अंतराळ हॉटेल म्हणून ओळखलं जाणारं व्हॉयेजर स्टेशन कॅलिफोर्नियास्थित कंपनी अबव्ह स्पेस द्वारे विकसित केलं जात आहे. हे अंतराळ स्थानक एका महाकाय फिरत्या चाकासारखे दिसतं. या अंतराळ स्थानकाचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे त्याची कृत्रिम गुरुत्वाकर्षण प्रणाली. भौतिकशास्त्राच्या तत्त्वांनुसार, सेंट्रीफ्यूगल फोर्समुळे आत असलेल्यांना चंद्रासारखे गुरुत्वाकर्षण अनुभवायला मिळेल. याचा अर्थ असा की तुम्ही तिथे सामान्यपणे फिरू शकता. सामान्यपणे पाणी पिऊ शकता आणि टॉयलेट आणि चांगले पदार्थ खाऊ देखील शकता… येथे कोणत्याच गोष्टीसाठी संघर्ष करावा लागणार नाही.

पृथ्वीपासून दूर तयार होत असलेलं हॉटेल 50 हजार चौरस मीटरपेक्षा जास्त क्षेत्रफळाचं असेल. त्यात 400 पाहुणे आणि क्रू मेंबर्सना राहता येईल. यामध्ये श्रीमंत व्यक्ती खाजगीरित्या खरेदी करू शकतील असे व्हिला देखील असतील. सुविधांमध्ये जिम, बार, सिनेमा हॉल आणि “स्पेस फूड” ऐवजी पृथ्वीवरील स्वादिष्ट अन्न देणाऱ्या रेस्टॉरंट यांचा समावेश आहे.

व्हॉयेजर स्टेशन 2027-2028 पर्यंत कार्यान्वित करण्याचं लक्ष्य आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या हॉटेल्सच्या बांधकामासाठी अब्जावधी डॉलर्स खर्च येत आहेत. प्रसिद्ध फ्रेंच डिझायनर फिलिप स्टार्क यांनी हॉटेलच्या आतील भाग डिझाइन केला आहे. शून्य-गुरुत्वाकर्षणाच्या वेळी कोणताही आघात टाळण्यासाठी भिंती मऊ, मखमली पॅडिंगने झाकलेल्या आहेत. ज्यामुळे कोणाला दुखापत होणार नाही.

एका तिकिटची किंमत कोट्यवधी…

अंतराळातील हॉटेलच्या तिकिटाची किंमत 20 ते 50 दशलक्ष डॉलर्स किंवा अंदाजे 165 ते 415 कोटी डॉलर्स पर्यंत असू शकते. पण, अंतराळातील हॉटेलमध्ये राहण्यासाठी फक्त पैशांचीच गरज नाही; येथे राहण्यासाठी पर्यटकांना किमान 15 ते 20 आठवड्यांचे प्रशिक्षण देखील घ्यावं लागेल, ज्यामध्ये सेंट्रीफ्यूज प्रशिक्षण – शरीराचं उच्च वेगाने व्यवस्थापन करण्याची कला – आणि आपत्कालीन निर्वासन यांचा समावेश आहे.

Follow Us
मुंबईच्या महापौर रितू तावडे वादाच्या भोवऱ्यात? 2017 चा मोठा नियम मोडला
मुंबईच्या महापौर रितू तावडे वादाच्या भोवऱ्यात? 2017 चा मोठा नियम मोडला.
LPG चं टेंशन संपणार! नागरिकांना मोठा दिलासा, चंद्रपूरमधून....
LPG चं टेंशन संपणार! नागरिकांना मोठा दिलासा, चंद्रपूरमधून.....
नागरिकांनो घाबरू नका, राज्यात गॅसचा तुटवडा नाही, भुजबळ यांनी थेट....
नागरिकांनो घाबरू नका, राज्यात गॅसचा तुटवडा नाही, भुजबळ यांनी थेट.....
युद्धाचा परिणाम मुंबईतील ड्रायफ्रूट मार्केटवर, सुकामेव्याच्या दरात....
युद्धाचा परिणाम मुंबईतील ड्रायफ्रूट मार्केटवर, सुकामेव्याच्या दरात.....
आखाती युद्धाचा फटका शेतकऱ्यांना, हळदीचे दर घसरले, शेतकरी अडचणीत
आखाती युद्धाचा फटका शेतकऱ्यांना, हळदीचे दर घसरले, शेतकरी अडचणीत.
काँग्रेसने खोट्या रील्सची इंडस्ट्री सुरू केली– मोदींचा हल्लाबोल
काँग्रेसने खोट्या रील्सची इंडस्ट्री सुरू केली– मोदींचा हल्लाबोल.
फडणवीसांचं गॅस तुटवड्यावर मोठं विधान, काँग्रेसवर केला घणाघाती हल्ला
फडणवीसांचं गॅस तुटवड्यावर मोठं विधान, काँग्रेसवर केला घणाघाती हल्ला.
गॅस तुटवडा नियंत्रणासाठी सरकारची नवीन नियमावली; कोणाला मिळणार....
गॅस तुटवडा नियंत्रणासाठी सरकारची नवीन नियमावली; कोणाला मिळणार.....
बदलापुरातील हॉटेल्समध्ये चुलीवर अन्न बनवण्याची वेळ
बदलापुरातील हॉटेल्समध्ये चुलीवर अन्न बनवण्याची वेळ.
संजय राऊतांचा मोदी सरकारवर घणाघाती हल्ला; केली खोचक टीका
संजय राऊतांचा मोदी सरकारवर घणाघाती हल्ला; केली खोचक टीका.