AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

33 वर्षांची सौंदर्य क्वीन, जिने 400 मुलींना ऑडिशनमध्ये दिली टक्कर, पहिलाच चित्रपट दिला ब्लॉकबस्टर, आज 600 कोटींची मालकीण

33 वर्षाची सौंदर्य क्वीन, जिने ऑडिशनमध्ये 400 मुलींना दिली टक्कर. पहिलाच चित्रपट दिला ब्लॉकबस्टर. आज आहे 600 कोटींची मालकीण.

33 वर्षांची सौंदर्य क्वीन, जिने 400 मुलींना ऑडिशनमध्ये दिली टक्कर, पहिलाच चित्रपट दिला ब्लॉकबस्टर, आज 600 कोटींची मालकीण
Image Credit source: Social media
| Updated on: Mar 15, 2026 | 10:16 AM
Share

Bollywood Actress : बॉलिवूडमध्ये मोठे स्थान मिळवणे सोपे नाही. अनेक कलाकारांना वर्षानुवर्षे मेहनत घ्यावी लागते. मात्र अभिनेत्री आलिया भट्टन हिने आपल्या मेहनत आणि अभिनयाच्या जोरावर इंडस्ट्रीत खास ओळख निर्माण केली आहे. 15 मार्च रोजी ती 33 वा वाढदिवस साजरा करत आहे. आलियाला चित्रपटसृष्टीत जवळपास 14 वर्षे पूर्ण झाली असून तिने आतापर्यंत 17 पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे.

आलिया भट्ट हिने 2012 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘स्टुडन्ट ऑफ द इयर’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटाचे दिग्दर्शन करण जोहरने केले होते. या चित्रपटातील भूमिकेसाठी देशभरातून सुमारे 400 मुलींचे ऑडिशन घेण्यात आले होते. या मोठ्या स्पर्धेत आलियाने आपल्या आत्मविश्वास आणि व्यक्तिमत्त्वाच्या जोरावर ही भूमिका मिळवली.

करण जोहरने एका मुलाखतीत सांगितले होते की, ऑडिशनदरम्यान आलियाचे व्यक्तिमत्त्व आणि आत्मविश्वास पाहून त्याला तिच्यात काहीतरी वेगळेपण जाणवले. मात्र, त्याने आलियाला चित्रपटासाठी थोडे वजन कमी करण्याचा सल्लाही दिला. आलियाने हा सल्ला गंभीरपणे घेतला आणि फक्त तीन महिन्यांत मोठ्या प्रमाणात वजन कमी करून पुन्हा स्क्रीन टेस्ट दिली.

पहिल्या चित्रपटानंतर यशाचा प्रवास

‘स्टुडन्ट ऑफ द इयर’ प्रदर्शित झाल्यानंतर आलियाने मागे वळून पाहिले नाही. पहिल्याच चित्रपटातून तिला प्रेक्षकांमध्ये मोठी ओळख मिळाली. त्यानंतर तिने अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या चित्रपटांमध्ये काम करत आपली अभिनय क्षमता सिद्ध केली.

आपल्या कारकिर्दीत आलियाने अनेक चित्रपट दिले आहेत. तिला अनेक मोठे पुरस्कार मिळाले आहेत. विशेषतः ‘राझी’ आणि ‘गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटांसाठी तिला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला. अभिनयासोबतच तिने चित्रपट निर्मितीतही पाऊल टाकले आणि ‘डार्लिंग’ या चित्रपटाची निर्मिती केली.

वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर आलिया ही प्रसिद्ध दिग्दर्शक महेश भट्ट यांची मुलगी आहे. तिने 2022 मध्ये अभिनेता रणबीर कपूरशी विवाह केला. या दोघांना राहा नावाची मुलगी आहे. आज आलिया ही बॉलिवूडमधील सर्वात यशस्वी आणि लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक मानली जाते आणि लवकरच ती अनेक मोठ्या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.

Follow Us
नागरिकांनो घाबरू नका, राज्यात गॅसचा तुटवडा नाही, भुजबळ यांनी थेट....
नागरिकांनो घाबरू नका, राज्यात गॅसचा तुटवडा नाही, भुजबळ यांनी थेट.....
युद्धाचा परिणाम मुंबईतील ड्रायफ्रूट मार्केटवर, सुकामेव्याच्या दरात....
युद्धाचा परिणाम मुंबईतील ड्रायफ्रूट मार्केटवर, सुकामेव्याच्या दरात.....
आखाती युद्धाचा फटका शेतकऱ्यांना, हळदीचे दर घसरले, शेतकरी अडचणीत
आखाती युद्धाचा फटका शेतकऱ्यांना, हळदीचे दर घसरले, शेतकरी अडचणीत.
काँग्रेसने खोट्या रील्सची इंडस्ट्री सुरू केली– मोदींचा हल्लाबोल
काँग्रेसने खोट्या रील्सची इंडस्ट्री सुरू केली– मोदींचा हल्लाबोल.
फडणवीसांचं गॅस तुटवड्यावर मोठं विधान, काँग्रेसवर केला घणाघाती हल्ला
फडणवीसांचं गॅस तुटवड्यावर मोठं विधान, काँग्रेसवर केला घणाघाती हल्ला.
गॅस तुटवडा नियंत्रणासाठी सरकारची नवीन नियमावली; कोणाला मिळणार....
गॅस तुटवडा नियंत्रणासाठी सरकारची नवीन नियमावली; कोणाला मिळणार.....
बदलापुरातील हॉटेल्समध्ये चुलीवर अन्न बनवण्याची वेळ
बदलापुरातील हॉटेल्समध्ये चुलीवर अन्न बनवण्याची वेळ.
संजय राऊतांचा मोदी सरकारवर घणाघाती हल्ला; केली खोचक टीका
संजय राऊतांचा मोदी सरकारवर घणाघाती हल्ला; केली खोचक टीका.
सिलेंडर टंचाईवर संजय राऊतांचा सरकारवर घणाघाती हल्ला
सिलेंडर टंचाईवर संजय राऊतांचा सरकारवर घणाघाती हल्ला.
बदलापूर स्त्री बीज प्रकरण संदर्भात रुपाली चाकणकरांनी दिली मोठी माहिती
बदलापूर स्त्री बीज प्रकरण संदर्भात रुपाली चाकणकरांनी दिली मोठी माहिती.