
Bigg Boss 19 : भोजपुरी अभिनेत्री नीलम गिरी ‘बिग बॉस 19’ च्या घरातून बाहेर आली आहे. जवळपास अडीच महिने बिग बॉसच्या घरातून प्रेक्षकांचं मनोरंजन केल्यानंतर नीलम हिचा प्रवास संपला.. पण आता नीलम तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त नीलम हिच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगील आहे. सांगायचं झालं तर, ‘बिग बॉस’ च्या घरात असताना नीलम हिच्या लग्नाचे फोटो सर्वत्र व्हायरल झाले होते. एवढंच नाही तर, खुद्द नीलम हिने स्वतःच्या अयशस्वी लग्नाबद्दल सांगितलं होतं..
नीलम गिरी हिने लग्नाबद्दल शोमध्ये तान्या मित्तल हिला सांगितलं होतं.. ‘त्या पुरुषासोबत लग्न केल्यानंतर मी माझ्या आयुष्यात कधी आनंद अनुभवलाच नाही… मी माझ्या इच्छेने वेगळी नाही… ते दिवस फार कठीण होते. त्या पुरुषासोबत लग्न माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक होती. आज याबद्दल विचार केल्यानंतर मला दुःख होतं.’ असं नीलम म्हणाली होती.
नीलम गिरी शोच्या बाहेर आल्यानंतर आईने तिच्या खासगी आयुष्याबद्दल मोठं वक्तव्य केलं. ‘नीलम हिचं लग्न झालं होतं. पण दोघांचं लग्न फार काळ टिकलं. अखेर त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.. त्यांनी लव्ह मॅरिज केलं होतं…’
नीलम हिची मोठी बहीण निशा म्हणाली, ‘तिच्या आयुष्यात नक्की काय झालं होतं हे तीच सांगेल कारण हे तिचं खासगी आयुष्य आहे. बिग बॉसमध्ये ती म्हणाली होती घटस्फा झाला आहे. तिच्या लग्नात सर्वकाही परफेक्ट नव्हतं… काही अडचणी होत्या… याबद्दल ती स्वतः सांगेल… तिच्या खासगी आयुष्याबद्दल आम्ही काहीही सांगू शकत नाही..’ असं नीलम हिची मोठी बहिण म्हणाली.
एवढंच नाही तर, शोमध्ये नीलम, मालती हिच्यासोबत बोलताना, नीलम गिरी हिने स्वतःच्या आर्थीक परिस्थितीबद्दल देखील सांगितलं, वडिलांच्या मेहनतीबद्दल नीलम म्हणाली, ‘कुटुंबियांची भूक भागवण्यासाठी माझे वडील लाकूड तोडण्याचं काम करायचे. दोन वेळच्या जेवणासाठी त्यांनी खूप काम केलं आहे…’ असं देखील निलम म्हणाली.