Bigg Boss च्या घरातून बेघर होताच काय होतं? नीलमकडून मोठं सत्य समोर, ‘त्याच रात्री आम्हाला…’
Bigg Boss 19 : 'बिग बॉस 19' फेम निलम गिरी हिच्याकडून हैराण करणारा खुलासा, घरातून बेघर होताच स्पर्धकांसोबत काय होतं, निलम म्हणाली, 'ऑफिसमध्ये बसवलं जातं आणि त्याच रात्री आम्हाला...', सर्वत्र चर्चांना उधाण...

Bigg Boss 19 : भोजपुरी अभिनेत्री आणि ‘बिग बॉस 19’ ची स्पर्धक नीलम गिरी हिचा बिग बॉसच्या घरातील प्रवास संपला आहे. रविवारी नीलम शोमधून एव्हिक्ट झाली. अभिनेता सलमान खान याच्या वादग्रस्त शोमधून बहेर आल्यानंतर नीलम हिने घरातील अनेक गोष्टी चाहत्यांसोबत शेअर केल्या. सध्या सर्वत्र नीलम हिची चर्चा सुरु आहे. सांगायचं झालं तर, शोमधून बाहेर आल्यानंतर नीलम मुलाखती देत आहे. ज्या नीलम तिच्या घरातील प्रवालाबद्दल आणि घरातील अन्य सदस्यांबद्दल सांगणार आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त नीलम गिरी हिची चर्चा रंगली आहे.
नुकताच झालेल्या मुलाखतीत नीलम हिने ‘बिग बॉस 19’ स्पर्धक फरहाना भट्ट आणि बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर काय होतं याबद्दल सांगितलं आहे. ‘बिग बॉस’ च्या घरातून बाहेर येण्यापूर्वी स्पर्धकांना फक्त 15 – 20 मिनिटं दिली जातात… तर जाणून घ्या काय म्हणाली नीलम…
नीलम म्हणाली, ‘पहिल्या आठवड्यात तर मी पूर्णपणे घाबरलेली होती. मला गेम कळत नव्हता… माझ्यासाठी ही संधी फार मोठी होती, त्यामुळे मी प्रचंड घाबरलेली देखील होती. सुरुवातीला मला कळलं नाही करु, पण त्यानंतर मी खेळू लागले… ‘बिग बॉस’मुळे माझं आयुष्य बदललं आहे..
‘शोमुळे मला प्रसिद्धी आणि लोकप्रियता मिळाली आहे… याच्या माझ्या आयुष्यावर सकारात्मक परिणाम झाला आहे. मी आता टीव्ही आणि सिनेमांमध्ये काम करण्यासाठी तयार आहे.. कोणता रिऍलिटी शो करण्यासाठी देखील मी आनंदाने तयार आहे..,’ असं देखील निलम म्हणाली.
‘बिग बॉस 19’ च्या घरातून बेघर होताच काय होतं?
नीलम म्हणाली, ‘एविक्शन नंतर आम्हाला सामान एकत्र करायला आणि सर्वांना भेटण्यासाठी 15 – 20 मिनिटांचा काळ लागतो त्यानंतर आम्हाला बाहेर जाण्यास सांगतात… घरातून बाहेर आल्यानंतर आम्हाला ऑफिसमध्ये बसवलं जातं… जेथे टीम आम्हाला भेटते… त्यानंतर एका तासात आम्हाला आमचं सर्व सामान मिळतं आणि त्याच रात्री आम्ही आमच्या घराच्या दिशेने निघतो…’
फिनालेमध्ये कोणाला पाहण्याची इच्छा…
नीलम म्हणाली, ‘मला असं वाटकं शेहबाद, अमाल, तान्या, गौरव आणि कुनिका शो जिंकतील असं मला वाटतं… फरहाना देखील चांगलं खेळत आहे.. पण की स्वार्थी आहे… ती खमकी मुलगी आहे… पण कधी – कधी तिची वागणूक दुखावणारी असत आणि तिच्याकडून तुम्ही कोणतीच अपेक्षा ठेवू शकत नाही…’ असं दोखील नीलम म्हणाली.
