
Bigg Boss 19 : ‘तू देखेंगी और फिनाले में खड़ी होकर तालियां बजाएंगी मेरे लिए… तू पहचानी जाएगी कि तू मेरे शो में आई थीं…’, ‘बिग बॉस 19’ ची रनरअप ठरलेल्या फरहाना भट्ट हिला एका टाक्स दरम्यान गौरव खन्ना याने असं म्हटलं होतं आणि 7 डिसेंबर रोजी तेच चित्र सर्वांना दिसलं… ‘बिग बॉस 19’ फिनालेच्या अंतिम क्षण गौरव आणि फरहाना आमने – सामने होते… त्यानंतर सलमान खान याने विजेता म्हणून गौरव खन्ना याच्या नावाची घोषणा केली आणि फरहाना विजेता गौरव याच्यासाठी टाळ्या वाजवू लागली… ‘बिग बॉस 19’ चा विजेता गौरव खन्ना ठरला. पण त्यांच्या जिंकण्याचे 5 कारणे घ्या जाणून…
बिग बॉसच्या पहिल्या आठवड्यातच गौरव खन्ना पॉझिटिव्ह ग्रुपचा लीडर बनला. त्याच्या टीममध्ये प्रणीत मोरे, अभिषेक बजाज, अशनूर कौर, आवाज दरबार, नगमा आणि मृदुल तिवारी होते. कॅप्टनसी टास्क दरम्यान, गौरवला नेहमीच त्याच्या टीममधून कोणीतरी कॅप्टन बनावं असं वाटायचं… तो कायम सर्वांना गाईड करायचा…
सुरुवातीला झिशान याला शोचा मास्टरमाईंड समजलं जात होतं. पण झिशान फक्त निलम हिच्या बाजूने उभा राहताना दिसला.. त्यामुळे त्याचा खेळ संपला… पण गौरव खन्ना याने सर्व स्पर्धकांना महत्त्व दिलं. सर्वांसोबत चांगले संबंध बनवण्याचा त्याने प्रयत्न केला. शांत आणि त्याच्या शांत, संयमी स्वभावामुळे, त्याने घरातील टास्क जिंकलीच नाहीत तर शांतपणे अंतिम फेरीतही प्रवेश केला.
गौरव खन्नाच्या विजयाने बिग बॉसच्या घरात जो भांडतो तोच जिंकतो ही धारणाही मोडून काढली. इतर स्पर्धकांप्रमाणे, गौरव खन्नाने जाणूनबुजून मारामारी आणि अनावश्यक आरडा-ओरड टाळली. हाय-व्होल्टेज नाट्यमय परिस्थितीतही त्याने कधीही स्वतःचा संयम गमावला नाही. इतर स्पर्धकांनी चिथावणी दिली तरीही, तो हळूहळू आणि विचारपूर्वक प्रतिक्रिया देत असे.
‘बिग बॉस 19’ च्या घरात दोन ग्रूप झाले होते. असं असूनही, गौरव खन्ना याने 16 स्पर्धकांपैकी कोणत्याही स्पर्धकाशी कधीही असा संघर्ष झाला नाही ज्यामुळे त्यांच्यात भांडणं होतीस. मित्र असोत किंवा स्पर्धक त्याने घरातील प्रत्येकाचा आदर केला. ज्यामुळे प्रेक्षकांच्या मनात त्याने स्वतःची जागा निर्माण केली..
अभिनेता सलमान खान याने गौरव याच्याबद्दल मोठं वक्तव्य केलं होतं. ‘गौरव याचा गेम आतापर्यंत एकसारखा राहिला आहे. त्याने कधीच कोणासोबत बळजबरी झगडा केला नाही… जर हेच त्याचं व्यक्तीमत्व असेल तर, मी त्याचं कौतुक करतो…’ अशा प्रकारे गौरव याने शो जिंकला.