
सलमान खान याचा बहुचर्चित शो बिग बॉस सीजन 19 ला धमाकेदार पद्धतीने सुरूवात झालीये. हे सीजन 3 महिने नाही तर 5 महिने चालणार असल्याची शक्यता आहे. यावेळी अनेक प्रसिद्ध चेहरे हे बिग बॉसच्या घरात दाखल झाली आहेत. घरात नेहमीच्या सीजनप्रमाणेत मोठा राडा बघायला मिळतोय. मागच्या सीजनला म्हणावा तसा धमाका करण्यात अजिबातच यश मिळाले नाही. यामुळे निर्मात्यांनी सुरूवातीपासूनच हे सीजन हीट करण्यासाठी कंबर कसली आहे. अनुपम मालिकेतील फेम गाैरव खन्ना हा बिग बॉसच्या घरात दाखल झाला असून चांगला गेम खेळताना दिसतोय.
बिग बॉसच्या घरातील वादग्रस्त सदस्य सध्या तान्या मित्तल ठरत आहे. ती घरात कोणत्याही कारणावरून इतर सदस्यांसोबत भांडत असते. पहिल्या दिवसापासून ती चर्चेत आहे. तान्या मित्तल आणि घरातील इतर सदस्यांसोबत तिचा नुकताच मोठा राडा झाला. आता ती परत एकदा चर्चेत आलीये. तिने आपल्या खासगी आयुष्याबद्दल अत्यंत मोठा खुलासा हा केला आहे. प्रेमात दोन जणांनी धोका दिला आणि फक्त आणि फक्त वापर केल्याचे सांगताना तान्या मित्तल दिली आहे.
तान्या मित्तल हिने बसीर अलीला किचनमध्ये बोलताना म्हटले की, मी दोनदा प्रेमात पडले आणि दोन्हीवेळा माझा विश्वासघात झाला आणि दोघांनीही माझा वापर केला. यावर बसीनने ब्रेकअप होण्याचे कारणे विचारले. तान्या मित्तलने म्हटले, मी काही केले नाही माझ्यासोबत खूप विश्वासघात झाले. माझा फक्त वापर केला त्यांनी त्यांच्या फायद्यासाठी. तिने म्हटले की, माझ्यासोबत दोनदा असेच घडले पण मी कुठेच चुकीची नव्हते.
तान्या मित्तल ही तिच्या खासगी आयुष्याबद्दल पहिल्यांदाच बोलताना दिसली आहे. ज्यावेळी आपल्या ब्रेकअपबद्दल तान्या मित्तल सांगत होती, त्यावेळी तिच्या चेहऱ्यावरील भाव बरेच काही सांगून जात होती. तान्या मित्तल हिला प्रेमात दोनदा धोका मिळाला आहे. तान्या मित्तल ही सध्या बिग बॉसच्या घरातील सर्वात जास्त वादात सापडणारी स्पर्धेक आहे. तान्या मित्तलची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग ही बघायला मिळते.