5 स्टार हॉटेलपेक्षा सुंदर घर; प्रत्येक मजल्यावर 5 नोकर, 7 ड्रायव्हर अन्… तान्या मित्तल खरंच आहे एवढी श्रीमंत?
बिग बॉस 19 मधील एक स्पर्धक जिच्याबद्दल खूप चर्चा होताना दिसत आहे. ती म्हणजे तान्या मित्तल. तान्याच्या संपत्तीबद्दल, तिच्या जीवनशैलीबद्दल बऱ्याच चर्चा होताना दिसत आहेत. तिने ज्यापद्धतीने तिच्या घर, संपत्तीबद्दल सांगितलं आहे त्यावरून तिला ट्रोलही केलं जात आहे आणि तिच्याबद्दल जाणून घेण्यासाठीही प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे.

बिग बॉस 19 हळू हळू रंगत चालला आहे. स्पर्धकांचे एक एक नवीन पैलू बाहेर येत आहे. शोमधील बऱ्याच स्पर्धकांची चर्चाही होत आहे. त्यातील एक म्हणजे तान्या मित्तल. तान्याबद्दल तिच्या जीवनशैली आणि व्यवसायाबद्दल बऱ्याचदा चर्चा होताना दिसते. तसेच शोमध्ये तान्या तिच्या लाईफस्टाईलबद्दल सांगतानाही दिसते. जे की लोकांना खरं वाटणे थोडे कठीण आहे. प्रत्येकजण तिच्या खऱ्या आयुष्याबद्दल अधिकाधिक जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये, सहकारी स्पर्धक तान्याला तिचे घर कसे आहे असेही विचारताना दिसतात. यावर तान्याने सांगितले होते, की तिचे घर 7 स्टार हॉटेलपेक्षा महागडे आणि सुंदर आहे.
घर स्वर्गासारखे आहे
स्पर्धक तान्याला विचारतो, तुझे घर कसे आहे तान्या? यावर तान्या उत्तर देते, ‘ते खूप सुंदर आहे. स्वर्ग आहे, जर ते पृथ्वीवर असते तर ते असे दिसले असते. ते स्वप्नासारखे आहे. म्हणजे, 5 स्टार हॉटेलमध्ये जा, 7 स्टार हॉटेल, ते याच्या तुलनेत स्वस्त दिसतील. तुम्हाला असे वाटेल की मी कुठून आले आहे. माझ्या कपड्यांसाठी एक संपूर्ण मजला आहे. माझे कपडे 2500 चौरस फूट पसरलेले आहेत.’ तान्या पुढे म्हणते, ‘प्रत्येक मजल्यावर 5 नोकर आहेत, स्वयंपाकघरातील कर्मचारी आहेत. 7 ड्रायव्हर आहेत.’
View this post on Instagram
सोशल मीडियावर तान्याच्या रीलवर कमेंट्सा भडीमार
तिने शोमध्ये जे सांगितलं त्याचा व्हिडीओ चंक किंवा रील व्हायरल झाला आहे. अनेक कमेंट्स येताना दिसत आहे. एकाने लिहिले आहे की, ‘लोक हे कसे सहन करत आहेत.’ एकाने लिहिले आहे, ‘जर ती इतकी श्रीमंत असेल तर ती बिग बॉसमध्ये का गेली.’ एकाने कमेंट केली आहे, मला तिचे घर पहायचे आहे.
एका युजरने सांगितले कि तान्याचे घर कसे आहे?
यावर एकाने उत्तर दिले आहे, ‘तिचे घर माझ्या घराच्या बाजूला आहे.तिच्या घराखाली कॅनरा बँक देखील आहे. ती खूप सामान्य आहे. काही खास नाही, सर्व काही खोटे आहे. ती खूप बनावट सांगत आहे’, तर दुसऱ्याने लिहिले आहे, ‘मी रील स्क्रोल करताना तिचे स्वयंपाकघर पाहिले आहे, आमचे स्वयंपाकघर खरोखर यापेक्षा खूप चांगले असले पाहिजे.’ एक कमेंट अशीही आहे जिथे काही लोकांनी आयकर विभागाच्या सोशल मीडिया अकाउंटला तिचा व्हिडीओ टॅग केले आहे आणि लिहिले आहे की तान्याच्या घरी जा”
