प्रणित मोरे याने थेट या भारतीय क्रिकेटरच्या बहिणीला मारली लाथ, मोठा वाद, धक्का देत…

Bigg Boss 19 : बिग बॉस 19 च्या फिनाले विकला सुरूवात झाली आहे. विशेष म्हणजे बिग बॉसच्या घरात या आठवड्यातही मोठा हंगामा बघायला मिळतंय. बिग बॉसला त्याचे टॉप 6 फायनलिस्ट मिळाले आहेत. पाच नावेही पुढे आल्याचे प्रोमोमध्ये बघायला मिळतंय.

प्रणित मोरे याने थेट या भारतीय क्रिकेटरच्या बहिणीला मारली लाथ, मोठा वाद, धक्का देत...
Bigg Boss 19
Updated on: Dec 04, 2025 | 2:47 PM

बिग बॉस सीजन 19 च्या फिनालेला काही दिवस शिल्लक आहेत. त्यापूर्वी बिग बॉसच्या घरातील वातावरण तापताना दिसत आहे. बिग बॉस 19 ला त्यांचे टॉप 6 फायनलिस्ट मिळाले आहेत. मात्र, बिग बॉसच्या फिनालेला अवघे काही दिवस शिल्लक असतानाच घरात मोठा राडा होताना दिसला. तान्या मित्तल, अमाल मलिक, मालती चहर, प्रणित मोरे, फरहाना भट्ट आणि गौरव खन्ना हे बिग बॉस 19 चे टॉप 6 फायनलिस्ट आहेत. त्यामध्ये भारतीय क्रिकेटर दिपक चहर याची बहीण मालती चहर ही बिग बॉसच्या घरातून बाहेर पडणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, अजून त्याबद्दल स्पष्टता नाहीये. बिग बॉसचा विजेता कोण होणार याकडे चाहत्यांच्या नजरा आहेत. या सीजनने धमाका केला आहे. लोकांमध्ये मोठी क्रेझ बघायला मिळत आहे.

बिग बॉसने घरातील सदस्यांना शेवटचा टास्क दिला. बिग बॉस 19 च्या घरात वातावरण खूपच तापले. एक रोस्ट टास्क बिग बॉसने घरातील सदस्यांना दिला. जिथे स्पर्धेक एकमेकांसोबत जोरदार वाद घालताना दिसले. शोच्या सुरूवातीपासून प्रणित मोरे आणि मालती चहर चांगले मित्र म्हणून फिरताना दिसले. मात्र, मालती चहर आणि प्रणित यांच्यामध्ये चांगलाच वाद होताना दिसला. फक्त वादच नाही तर प्रणित याने थेट मालतीला लाथ मारली.

प्रणित मोरे याने मालती चहरला लाथ मारल्याने मोठा वाद सुरू झाला. प्रणितने आपल्याला लाथ मारल्याने मालती चांगली संतापली. नुकताच आता बिग बॉस 19 चा प्रोमो पुढे आला. मालती आणि प्रणित स्वयंपाकघरात एकमेकांसोबत मजाक करताना दिसले. प्रणितने सुरुवातीला मालतीला धक्का दिला आणि तिला घरी पाठवण्यास सांगितले. दोघांमध्ये मस्त मजाक मस्ती सुरू होती.

त्यानंतर मालती देखील प्रणितला धक्का मारताना दिसली. तू मला हात कसा लावला.. यादरम्यान दोघांमध्ये मजाक सुरू होती. मालतीने धक्का मारल्यानंतर प्रणित याने तिला लाथ मारली. प्रणितने लाथ मारल्यानंतर मालती चांगलीच संतापली. तू मला लाथ मारली कशी म्हणून मालती प्रणितला भांडताना दिसली. बिग बॉसच्या फिनालेला काही दिवस शिल्लक असताना दोघांमध्ये चांगलाच मोठा वाद झाल्याचे बघायला मिळाले. प्रणित आणि मालती यांच्यातील वाद वाढला आहे. बिग बॉसच्या घरात फिनाले विकमध्ये मोठे भांडण झाले.