
बिग बॉसच्या चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. नव्या सीझनसह सलमान खानचा हा शो परत येत आहे. आज, 24 ऑगस्ट रोजी बिग बॉस 19ला सुरुवात होणार आहे. नेहमीप्रमाणे यंदाही प्रेक्षकांना या शोमध्ये एकापेक्षा एक प्रसिद्ध चेहरे पाहायला मिळणार आहेत. पण चेहरे कोणते असणार असा प्रश्न सर्वांना पडला आहे. नुकताच समोर आलेल्या माहितीनुसार, बिग बॉस 19मध्ये मराठमोळा कॉमेडीयन दिसणार आहे. हा कॉमेडीयन कोण आहे? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. चला जाणून घेऊया त्याच्याविषयी…
बिग बॉसचे आतापर्यंत १८ सीझन झाले आहेत. आता १९ वा सीझन सुरु होणार आहे. हा शो टीव्हीवर तसेच ओटीटी प्लॅटफॉर्मवरही चाहते पाहू शकतात. यासाठी चाहतेही खूप उत्साहित आहेत. यामध्ये अनेक टीव्ही कलाकार आणि सोशल मीडिया इन्फ्लूएंजर असणार आहेत. यामध्ये मराठमोळा स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरे देखील असणार आहे.
प्रणित मोरे कोण आहे?
प्रणित मोरेची ओळख स्टँडअप कॉमेडियन म्हणून आहे. प्रणितने त्याच्या अप्रतिम विनोदाच्या जोरावर लोकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. आतापर्यंत त्याने अनेक कॉमेडी शो केले आहेत. इन्स्टाग्रामपासून यूट्यूबपर्यंत प्रणितचे व्हिडीओ लोकांना खूप आवडतात.
सोशल मीडियावर खूप लोकप्रिय
प्रणितची सोशल मीडियावर चांगली क्रेझ आहे. इन्स्टाग्रामवर त्याचे लाखो फॉलोअर्स आहेत. तसेच यूट्यूबवरही त्याचे मोठ्या संख्येने सब्सक्रायबर्स आहेत. इन्स्टाग्रामवर २ हजारांहून अधिक पोस्ट करणाऱ्या प्रणितला इन्स्टावर ४ लाख ३१ हजार (४३१K) लोक फॉलो करतात. त्याचे इन्स्टाग्राम अकाउंट त्याच्या कॉमेडी व्हिडीओंनी भरलेले आहे. तर यूट्यूबवर त्याचे १ मिलियनहून अधिक सब्सक्रायबर्स आहेत.
या प्रकरणात झाली होती मारहाण
प्रणित मोरेने आतापर्यंत अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींवरही विनोद केले आहेत. मात्र, अक्षय कुमारसोबत ‘स्काय फोर्स’ (२०२५) या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या वीर पहाडियाची थट्टा करणे प्रणितला महागात पडले होते. एका शोदरम्यान त्याने वीरवर काही विनोद केले होते. शो संपल्यानंतर १०-१२ लोकांच्या एका गटाने वीरची थट्टा केल्याबद्दल प्रणितला मारहाण केली होती. मात्र, या प्रकरणात वीरने सांगितले होते की, याचा त्याच्याशी काहीही संबंध नाही. अभिनेत्याने प्रणितची माफीही मागितली होती.