
बिग बॉस सीजन 19 ला सुरूवात झालीये. सलमान खान हाच नेहमीप्रमाणे शोला होस्ट करताना दिसत आहे. यंदाच्या सीजनमध्ये काही मोठे बदल करण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला. हे सीजन तीन महिने नव्हे तर पाच महिने चालणार आहे. या सीजनबद्दल चाहत्यांमध्ये एक मोठी क्रेझ बघायला मिळत आहे. अनेक नवीन चेहरे बिग बॉसमध्ये दाखल झाले आहेत. बिग बॉस 19 च्या घरात पहिल्या दिवसापासून तान्या मित्तल ही चर्चेत आहे. अनेकदा ती कारण नसताना देखील घरातील सदस्यांसोबत वाद घालताना दिसले. हेच नाही तर आपल्याला प्रेमात दोनदा धोका मिळाल्याचे सांगून दोन्ही बॉयफ्रेंडने आपला वापर केल्याचे तिने म्हटले.
मुळात म्हणजे तान्या मित्तल कधी काय बोलेल याचा भरोसाच नाही. सध्या तान्या मित्तल हिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतोय. त्यामध्ये ती चक्क बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय हिच्यापेक्षाही अधिक सुंदर मी दिसत असल्याचा दावा करताना दिसत आहे. तान्याने म्हटले की, मी स्वप्न पाहिले होते की, सुष्मित सेनने तिचा मिस यूनिवर्सचा क्राऊन मला दिला. मी ऐश्वर्या रायपेक्षाही जास्त सुंदर होते, पण असे कसे होऊ शकते.
तान्याचे हे बोलणे ऐकून लोकांनी डोक्याला हात लावला. अनेकांचे म्हणणे आहे की, ही काहीही बोलते आणि काहीही विचार करते. तान्याने म्हटले होते की, मी एक अशा कुटुंबातून येते की, तिथे मुलींसाठी काही नियम घालून देण्यात आले. रात्री सहानंतर तुम्ही घराबाहेर पडू शकत नाहीत. मोबाईलवरून कोणत्याही मुलांना बोलू शकत नाहीत. आयुष्यात फक्त स्वयंपाकाशिवाय दुसरे कााहीच शिकू नका.
पुढे तान्याने म्हटले की, मला अजिबात सांगण्यास संकोच वाटत नाही की, मी बारावी पास आहे. माझी पदवी पूर्ण होऊ शकली नाही. आजच्या परिस्थितीला मी भारतातील मिलिनियर आहे. मी स्वत:ची एक कंपनी चालवते. हेच नाही तर माझ्या कंपनीत 350 पेक्षा अधिक लोक काम करतात. मी दिवसरात्र काम करते आणि एकही दिवस सुट्टी घेत नाही. यामुळेच माझ्याकडे सध्याच्या परिस्थितीला 400 पेक्षा अधिक पुरस्कार आहेत. तान्या मित्तल हिला लोक मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर ट्रोल करताना दिसत आहेत.