
बिग बॉस 19 मध्ये रोज नवनवे ड्रामे पहायाल मिळत असतात. जसजसा हा गेम पुढे सरकत आहे, तसतशी घरातील एकेक समीकरण बदलू लागली आहे. मात्र गेल्या आठवड्यात प्रेक्षकांना आणि घरच्या सदस्यांना धक्का बसला होता कारण घराचा कॅप्टन झालेला, मराठमोळा कलाकार, कॉमेडियन प्रणित मोरे हा बिग बॉसच्या घरातून बाहेर पडला होता. त्याची तब्येत बिघडल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला होता. खरंतर प्रणित मोरेची प्रकृती बिघडली होती. घरात जाऊन डॉक्टरांनी काही टेस्ट्स केल्या, पण त्याचे रिझल्ट्स चांगले नव्हते. त्यामुळेच कॉमेडियन प्रणितला घराबाहेर जावं लागलं. मात्र तो बिग बॉसच्या घरातून बाहेर गेल्याने घरचे सदस्य आणि बिग बॉसचे चाहते बरेच निराश झाले. मात्र आता त्यांच्यासाठीच एक गूड न्यूज आहे.
प्रणितची बिग बॉसमध्ये घरवापसी
पण आता अशी बातमी समोर येत आहे की, शोमधून बाहेर पडलेला प्रणित मोरे परत येऊ शकतो. प्रणित शोमध्ये परतू शकतो अशी चर्चा आहे. गेल्या वीकेंड का वारमध्ये सलमान खानने प्रणितला वैद्यकीय कारणास्तव काढून टाकले होते, परंतु चाहत्यांनी त्याच्या परतीसाठी बरूच प्रार्थना केली, अखेर ज्याचे फळ मिळताना दिसत आहे. “बीबी तक” आणि “द खबरी” ने या रिॲ लिटी शोबाबत सोशल मीडियावर ही माहिती शेअर केली”प्रणितच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे, तो घरा परत येत आहे” असे दोन्ही हँडलवर म्हटले आहे. मात्र असं असलं तरीही अद्याप चॅनेलकडून प्रणितच्या पुनरागमनाबद्दल कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही.
🚨 BREAKING! Pranit More to enter Bigg Boss 19 house today (Via Filmwindow)
— BBTak (@BiggBoss_Tak) November 5, 2025
ट्रेडिंगमध्ये आहे प्रणित मोरे
प्रणित बिग बॉसमध्ये परतण्याची बातमी पसरताच त्याचे चाहते खूप उत्साहित झाले आहेत. सध्या सोशल मीडियावर “किंग प्रणित इज कमिंग” हे ट्रेंडिंगमध्ये आहे. अनेक चाहत्यांन सोशल मीडियावर कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.
The throne was never empty —
KING PRANIT IS COMING
— Meeskees (@Hritik_oo7) November 5, 2025
Whole India is waiting for this moment ⭐ ✨
Emotions are high, eyes are Wet, Heart is bumping, Excitement is on cloud with this news of 👇KING PRANIT IS COMING #PranitMore || #PranitKiPaltan pic.twitter.com/SyUVo8DYh6
— Pranit More OFC (@PranitMoreFC) November 5, 2025
Pranit more is become most dominant, crazy, highest voted contestants..
KING PRANIT IS COMING#PranitMore #AbhishekBajaj #Abhinoor pic.twitter.com/0m146wXE3e
— Manakdeep Singh Kharaud (@Iam_MKharaud) November 5, 2025
प्रणित हा गेल्या आठवड्यात नॉमिनेट झाला होता, पण त्याला मत मिळाल्यामुळे बाहेर काढण्यात आले नाही. प्रकृतीमुळे तो बाहेर पडला तरी तो परत येईल याची सर्वांना आशा होती. चाहते त्याच्या पुनरागमनाची वाट पाहत आहेत. अशी चर्चा आहे की प्रणितच्या पुनरागमनाचा भाग आज किंवा उद्या, शुक्रवारी प्रसारित होऊ शकतो.
या आठवड्यात कोण नॉमिनेट ?
या आठवड्यामध्ये बिग बॉस 19 च्या घरात अभिषेक बजाज, गौरव खन्ना, फरहाना भट्ट, अशनूर कौर आणि नीलम गिरी हे नॉमिनेटेड आहेत. सुरुवातीच्या ट्रेंडनुसार, नीलमला सर्वात कमी मते मिळाली आहेत. या आठवड्यात कोणता स्पर्धक बिग बॉसचा प्रवास संपवतो याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.