Bigg Boss 19: ट्रॉफी महाराष्ट्रातच आली पाहिजे; फिनालेआधीच बिग बॉस 19चा विजेता ठरला? व्हायरल फोटोने वेधले लक्ष

Bigg Boss 19: सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये बिग बॉस 19ची ट्रॉफी घेऊन एक स्पर्धक उभा असल्याचे दिसत आहे. आता अनेकांना प्रश्न पडला आहे की फिनाले आधीच विजेता कसा घोषीत करण्यात आला?

Bigg Boss 19: ट्रॉफी महाराष्ट्रातच आली पाहिजे; फिनालेआधीच बिग बॉस 19चा विजेता ठरला? व्हायरल फोटोने वेधले लक्ष
Bigg Boss 19
Image Credit source: Tv9 Network
Updated on: Nov 29, 2025 | 1:26 PM

छोट्या पडद्यावरील वादग्रस्त पण तितकाच लोकप्रिय शो म्हणून बिग बॉस पाहिला जातो. बॉलिवूडचा भाईजान सलमान खान सूत्रसंचालन करत असलेल्या या शोमध्ये सतत काही ना काही सुरु असते. सध्या बिग बॉसचा 19वा सिझन चर्चेत आहे. या सिझनचा विजेचा कोण होणार? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. दरम्यान, सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये फिनालेआधीच बिग बॉस 19ची ट्रॉफी घेऊन एक स्पर्धक उभा असल्याचे दिसत आहे. आता नेमकी काय भानगड आहे? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

नेमकी काय आहे भानगड?

बिग बॉस 19ची ग्रँड फिनाले 7 डिसेंबरला आहे. त्यापूर्वी सोशल मीडियावर बिग बॉस 19च्या घरातील स्पर्धक, कॉमेडीयन प्रणीत मोरेचा एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये प्रणीत ग्रँड फिनालेमध्ये असून तो हा शो जिंकल्याचे दाखवण्यात आले आहे. त्याच्या हातात बिग बॉस 19ची ट्रॉफी दिसत आहे. खरंतर हा फोटो AI जनरेटेड फोटो असल्याचे समोर आले आहे. कारण फिनाले आधी कधीही बिग बॉसचा विजेता घोषीत होत नाही. शेवटच्या क्षणापर्यंत विजेत्याचे नाव गुलदस्त्यात ठेवण्यात येते.

अनेकांनी केल्या कमेंट्स

सोशल मीडियावर एका यूजरने प्रणीत मोरेचा बिग बॉस 19ची ट्रॉफी हात घेतलेला फोटो शेअर करत, “आपला प्रणित भाऊ ट्रॉफी घेऊन आलाच पाहिजे, ट्रॉफी महाराष्ट्रातच आली पाहिजे, महाराष्ट्राची शान आपला प्रणित भाऊ मोरे” असे कॅप्शन देण्यात आलेले आहे. ही पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली असून अनेकजण त्यावर कमेंट्स करताना दिसत आहेत. ही पोस्ट बिग बॉस मधील स्पर्धक प्रणीत मोरेला पाठींबा देण्याकरता करण्यात आलेली आहे.

कोण आहेत टॉप स्पर्धक?

गेल्या अनेक दिवसांपासून असे म्हटले जात आहे की बिग बॉस 19 मध्ये या वीकेंड का वारला डबल एव्हिक्शन होईल आणि तसेच झाले आहे. अशनूरनंतर ज्या कंटेस्टंटला बाहेर पडायचे आहे, तो म्हणजे शहबाज बडेशा. या आठवड्यात नॉमिनेटेड कंटेस्टंट्समध्ये शहबाजला सर्वात कमी वोट्स मिळाले आहेत, त्यामुळे तो बिग बॉसमधून बाहेर पडणार आहे. मात्र, याची अधिकृत घोषणा सलमान खान वीकेंड का वारमध्ये करणार आहे. अशनूर आणि शहबाजच्या एव्हिक्शननंतर बिग बॉस 19च्या घरात आता फरहाना भट्ट, गौरव खन्ना, प्रणित मोरे, अमाल मलिक, तान्या मित्तल आणि मालती चाहर राहिले आहेत. गौरव खन्ना आधीच फायनलिस्ट आहेत. आता बघायचे आहे की या सीझनचा विजेता कोण होणार.