Bigg Boss 20 : आमिर खानसोबत वाद, कुटुंबावरही गंभीर आरोप; आता फैसल ‘बिग बॉस 20’मध्ये दिसणार ?

सलमान खानचा बहुचर्चित रिॲलिटी शो 'बिग बॉस 20' ची चाहते आतुरतेने वाट पहात आहेत. पुढल्या महिन्यात हा शो सुरू होणार असून संभाव्य स्पर्धकांच्या नावाबाबत मोठी उत्सुकता आहे.

Bigg Boss 20 :  आमिर खानसोबत वाद, कुटुंबावरही गंभीर आरोप; आता फैसल ‘बिग बॉस 20’मध्ये दिसणार ?
Bigg Boss 20
| Updated on: Aug 29, 2026 | 10:01 PM

Faisal Khan In Bigg Boss 20 : टीव्हीच्या क्षेत्रातील सर्वात मोठा रिॲलिटी शो म्हणजे’बिग बॉस 20′.. लवकरच हा शो पुन्हा सुरू होणार आहे. हा या शोचा 20 वा (Bigg Boss 20 ) सीझन असून जसजशी शो सुरू होण्याची तारीख जवळ येत्ये, तसतसे शोबद्दल अनेक अपडेट्स, नव्या बातम्या समोर येऊ लागल्या आहे. या सीझनबद्दल चर्चा प्रचंड वाढली आहे. दबंग स्टार सलमान खान (Salman Khan) पुन्हा एकदा या शोच्या माध्यमातून होस्ट म्हणून समोर येणार असून चाहते त्याची आतुरतेने वाट बघत आहे. त्याचप्रमाणे या शोमध्ये कोण कोण स्पर्धक सहभागी होणार याबद्दलही अनेक अंदाज व्यक्त केले जात आहेत. याचदरम्यान आता आमिर खानबद्दलही (Aamir Khan) जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

काय म्हणताय ? असं म्हणत दचकू नका. मि. परफेक्शनिस्ट आमिर खान, हा काही ‘बिग बॉस 20’मध्ये सहभागी होणार नाहीये, पण त्याचा भाऊ हा या शोमध्ये स्पर्धक म्हणून येऊ शकतो. आमिरचा भाऊ फैसल याचं नाव या शोशी जोडल जात असून विविध चर्चा सुरू आहेत.

फैसल खान दिसणार बिग बॉसमध्ये ?

आमिर खानचा भाऊ असलेल्या फैसलने अभिनेता म्हणून अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. मात्र, त्याचं फिल्मी करिअर फार काळ टिकलं नाही , ना त्याला त्याच्या भावाप्रमाणे मोठं यश मिळालं.. आता मात्र फैसल पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. ‘व्हरायटी इंडिया’च्या रिपोर्टनुसार, फैसल ‘बिग बॉस 20’मध्ये सहभागी होणार असल्याची माहिती समोर आली आहे. शोसाठी त्याचं नाव निश्चित झाल्याचं सांगितलं जात आहे. फैसल याच नाव समोर येताच सोशल मीडियावर त्याच्या सहभागाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

कुटुंबावर लावले होते गंभीर आरोप

फैसल खान हा यापूर्वी आपल्या कुटुंबीयांवर आणि आमिर खानवर केलेल्या गंभीर आरोपांमुळे चर्चेत आला होता. त्याला तब्बल एक वर्ष घरात कैद करून ठेवण्यात आले, त्याचा मानसिक छळ करण्यात आला आणि त्याच्या इच्छेविरुद्ध औषधे देण्यात आली, असा दावा त्याने केला होता.

मात्र फैसलच्या या आरोपाच्या झडीनंतर खान कुटुंबाकडून एक निवेदन जारी करत स्पष्टीकरण देण्यात आल होतं. खान कुटुंबियांनी हे सर्व आरोप फेटाळून लावत फैसल याच्या वक्तव्यांकडे लक्ष देऊ नका, असं आवाहन केलं होतं. औषधांबाबतच्या आरोपावरही कुटुंबाने स्पष्टीकरण दिलं होते. फैसल याला औषधे देण्याचा निर्णय वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार घेण्यात आला होता, असंही कुटुंबाकडून स्पष्टीकरण देण्यात आलं होतं.

‘बिग बॉस’च्या ऑफरबाबतही केला होता दावा

एवढंच नव्हे तर फैसल याने असाही दावा केला होता की 2008 साली त्याला बिग बॉस’कडून सहभागी होण्याची ऑफर मिळाली होती. ही माहिती आमिर खानला समजल्यानंतर त्याने फैसल याला शोमध्ये जाण्यापासून रोखण्यासाठी प्रयत्न केल्याचा आरोप त्याने केला होता. मात्र, काही काळानंतर फैसल खान याने आपल्या कुटुंबीयांची या आरोपांबद्दल माफी मागितली होती. रागाच्या भरात आपण काही गोष्टी बोलून गेलो आणि ती वक्तव्ये करायला नको होती, असंही त्याेन मान्य केलं होतं.

‘बिग बॉस 20’ कधी होणार सुरू ?

सध्या चाहते आतुरतेने सलमान खानच्या ‘बिग बॉस 20’ ची वाट पहात आहेत. हा शो पुढल्या महिन्या, 6 सप्टेंबर रोजी सुरू होणार आहे. रोज रात्री 9 वाजता जिओ हॉटस्टारवर आणि 10.30 वाजता हा शो कलर्स टीव्हीवर पाहता येणार आहे.

Follow Us