Bigg Boss 20 : पहिल्याच कॅप्टन्सी टास्कमध्ये राडा! काजी-आसिफ भिडले; कोण बनला पहिला कॅप्टन?

Bigg Boss 20 : बिग बॉस 20 च्या पहिल्याच कॅप्टन्सी टास्कमध्ये बराच गोधळ झाल्याचं समजतं. वीकेंड का वारमध्ये हा मुद्दा चांगलाच गाजेल अशी चर्चा आहे.

Bigg Boss 20 : पहिल्याच कॅप्टन्सी टास्कमध्ये राडा! काजी-आसिफ भिडले; कोण बनला पहिला कॅप्टन?
Big Boss 20
| Updated on: Sep 09, 2026 | 9:14 PM

टीव्हीवरचा सर्वात मोठा रिॲलिटी शो असलेल्या ‘बिग बॉस 20’ (Bigg Boss 20 ) च्या घरात आधीच भांडणं व्हायला सुरूवात झाली आहे. ताजा प्रोमो नुकताच समोर आला असून कॅप्टन्सी टास्क फार सहज सोपा नसेल हेच त्यातून दिसत आहे. या टास्कसाठी तगडी टक्कर देण्यात आल्याचीही चर्चा आहे. हॉटस्टारने जो नवा प्रोमो जारी केल्या, त्यामध्ये काजी तौकीर हा कनिका मान, आम्रपाली दुबे आणि आसिफ खान यांच्याशी कॉम्पिटिशनमध्ये भिडताना दिसला. हा प्रोमो पाहून चाहते नव्या एपिसोडसाठी अतिशय उत्सुक असतानाच, बिग बॉसच्या घराला पहिला कॅप्टन मिळाल्याची देखील चर्चा आहे. यंग डीएसए हा पहिला कॅप्टन बनल्याचं बोललं जात आहे.

DSA बनला पहिला कॅप्टन !

बिॉग बॉसशी निगडीत सर्व बातम्या पोहोचवणारं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म म्हणजे बिग बॉस तक. त्यांनी एक पोस्ट लिहीली असून यंग डीएसए नव्या सीझनचा पहिला कॅप्टन बनल्याचं त्यांनी त्यात नमूद केलंय. कॅप्टन्सीसाठी घेण्यात आलेला हा टास्क अतिशय चॅलेंजिग असल्याचं नुकत्याच आलेल्या प्रोमोतून समोर दिसून आलं. या प्रोमोत गुल्लू, आसिफ खान आणि यंग डीएसए यांच्यात झालेल्या मुकाबल्याची झलकही दाखवण्यात आली. तसेच आसिफशी टक्कर होणायापूर्वी काजीचा कनिका आणि आम्रपालीशी वाद झाल्याचंही त्यात दिसलं.

पहिल्याच टास्कमध्ये मारामारी ?

बिग बॉसच्या घरात काजी आणि आसिफ यांच्यातील परिस्थिती बिघडायला सुरूवात झाली, सर्वांचं त्यांच्याकडे लक्ष वेधलं गेलं. त्यानंतर घरातील स्पर्धकांनी त्या दोघांना थांबवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे हा वाद मारामारीपर्यंत पोहोचला असावा अशी शक्यता प्रोमोवरून दिसून येत्ये. मात्र, खरंच आसिफ आणि काजी यांनी एकमेकांवर हात उचलला होता का? हे जाणून घेण्यासाठी बिग बॉसचा आगामी एपिसोड पाहण्याची चाहत्यांना उत्सुकता आहे. कारण प्रोमो व्हिडिओवरून या वादात प्रत्यक्ष भांडण किंवा मारामारी झाली का हे स्पष्ट होत नाही.

वीकेंडच्या वार मध्ये पेटणार मुद्दा ?

घरातील स्पर्धक बिघडलेली परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत होते, प्रोमोमध्ये फक्त एवढंच दाखवण्यात आलं. बिग बॉसच्या घरात कोणावरही हात उचलण्यास मनाई आहे. बिग बॉसच्या घरात शारीरिक हिंसाचार केल्यामुळे यापूर्वी अनेक स्पर्धकांना घराबाहेरही जावं लागलं होतं. घरातील मारामारी हा इतका गंभीर मुद्दा बनू शकतो त्याचा परिणाम व्होटिंगपासून ते ‘वीकेंड का वार’ आणि अगदी एलिमिनेशनपर्यंत दिसून येऊ शकतो. काजी आणि आसिफ यांच्यातील वाद पाहता, यंदा ‘वीकेंड का वार’मध्ये हाच मोठा मुद्दा बनू शकतो अशी शक्यता आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us