हे मुंबईत घडलंय विश्वास बसेना…Bigboss फेम अभिनेत्रीच्या कॅफेमध्ये चोरी, CCTV फुटेजमध्ये नेमकं काय दिसतंय?
अभिनेत्रीच्या कॅफेमध्ये चोरी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यासंदर्भातील CCTV फुटेजही अभिनेत्रीने सोशल मीडियावर शेअर केले असून ते आता व्हायरल होत आहे.

Mumbai Cafe Robbed: बिग बॉस फेम अर्चना गौतमच्या मुंबईतील ‘ओये चुरोस’ या कॅफेमध्ये पहाटे ५-६ च्या सुमारास चोरी झाली. तिने या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर शेअर केले आहे आणि आपल्या चाहत्यांना व फॉलोअर्सना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. व्हिडिओ शेअर करताना अर्चनाने लिहिले, “मी मुंबईतील माझ्या कॅफेमधील चोरीचे हे सीसीटीव्ही फुटेज तुम्हा सर्वांसोबत शेअर करत आहे, जेणेकरून तुम्हीसुद्धा सतर्क राहाल आणि तुमच्या घरांच्या व व्यवसायाच्या सुरक्षेची काळजी घ्याल.” चोरीचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून, त्यामुळे अनेकांमध्ये चिंता वाढली आहे.
अर्चनाने पुढे स्पष्ट केले की, मी माझी स्वतःची बचत गुंतवून, खूप प्रेम आणि मेहनतीने हा कॅफे उभारला होता. मी यासाठी खूप मेहनत घेतली, पण एका चोराने माझ्या कॅफेमध्ये घुसून कॅश काउंटरमधील सर्व पैसे चोरले.” या घटनेबद्दल अधिक माहिती देताना अर्चनाने दावा केला की, मी चोरीच्या संदर्भात एफआयआर दाखल केली आहे आणि मुंबई पोलिसांना कारवाई करण्याचे आवाहन केले आहे. मी मुंबई पोलिसांना नम्रपणे विनंती करते की त्यांनी या व्यक्तीला लवकरात लवकर शोधून योग्य कायदेशीर कारवाई करावी. मी मुंबईला नेहमीच एक सुरक्षित शहर मानते म्हणून मला विश्वास बसत नाहीये की हे मुंबईत घडलंय.
अर्चनाने ऑक्टोबर २०२५ मध्ये मुंबईत ‘ओये चुरोस’ नावाचा आपला कॅफे सुरू केला होता, अंधेरी पश्चिममधील वर्सोवा मेट्रो स्टेशनजवळ हा कॅफे आहे, या कॅफेच्या उद्धटासाठी तिने मराठी ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी यांना बोलावले होते.
अर्चना गौतम एक अभिनेत्री, मॉडेल आहे, जी ‘बिग बॉस १६’ मधून प्रसिद्धीस आली. तिच्या स्पष्टवक्त्या व्यक्तिमत्त्वासाठी आणि मनोरंजक स्वाभावासाठी ती ओळखली जाचे, तिने नंतर ‘खतरों के खिलाडी १३’, ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ इंडिया’ आणि ‘क्वीन्स ऑफ द जंगल २’ सारख्या रिॲलिटी शोमध्ये भाग घेतला. नुकतेच तिने व्यवसाय क्षेत्रातही पाऊल ठेवले आहे.