Salman Khan : 37 वर्ष लहान अभिनेत्रीसोबत सलमान खान थाटणार! 200 कॅमेऱ्यांसमोर घातली लग्नाची मागणी, कोण आहे ‘ती’?

Salman Khan : अभिनेता सलमान खान याच्या खासगी आयुष्याची चर्चा कायम चाहत्यांमध्ये रंगलेली असते. आता देखील भाईजान खासगी आयुष्यामुळेच चर्चेत आला आहे. सलमान खान 37 वर्ष लहान अभिनेत्रीसोबत संसार थाटणार का? अशा चर्चांनी जोर धरला असून, 200 कॅमेऱ्यांसमोर लग्नाची मागणी घातली... तर जाणून घ्या काय आहे प्रकरण?

Salman Khan : 37 वर्ष लहान अभिनेत्रीसोबत सलमान खान थाटणार! 200 कॅमेऱ्यांसमोर घातली लग्नाची मागणी, कोण आहे ती?
अभिनेता सलमान खान
| Updated on: Nov 24, 2026 | 9:10 AM

Salman Khan : अभिनेता सलमान खान त्याच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे कमी पण खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत असतो. भाईजान आता 60 वर्षांचा आहे. तरी देखील सलमान खान याचं लग्न कधी होणार? असा प्रश्न अनेक जण विचारत असतात. सलमान याच्या लव्हलाईफबद्दल सांगायचं झालं तर, भाईजानच्या आयुष्यात कधी प्रेमाची एन्ट्री झाली नाही असं नाही. अनेक लोकप्रिय अभिनेत्रींसोबत सलमान खान रिलेशनशिपमध्ये होता. पण कोणत्याच अभिनेत्रीसोबत सलमान खान याचं नाव लग्नापर्यंत पोहोचलं नाही. आता सलमान खान 37 वर्ष अभिनेत्रीसोबत लग्न करणार का? अशा चर्चांना उधाण आलं आहे. तर जाणून घ्या नेमकं काय आहे प्रकरण?

सलमान खान वयाच्या 60 व्या वर्षात पोहोचला असला तरी, त्याच्यावर असेलेलं मुलींचं क्रश कमी झालेलं नाही. वयाच्या 60 व्या वर्षी देखील सलमान त्याच्या गुडलुक्स आणि दमदार स्वागमुळे तरुणींमध्ये लोकप्रिय आहे. आता तर, ‘बिग बॉस 20’ मधील स्पर्धक अरिश्फा खान हिने सलमान खान याच्यासाठी असलेल्या मनातील भावना व्यक्त केल्या. यंदाच्या विकेंडका वारमध्ये अरिश्फा हिने सलमान खान बद्दल असलेल्या भावना व्यक्त केल्या…

Loading...

विनोदी अंदाजात अरिश्फा म्हणाली, सलमान खान माझा लहानपणीचा क्रश आहे… एक वेळ अशी देखील होती, जेव्हा मला सलमान खान याच्यासोबत लग्न देखील करायचं होतं. मात्र, अरिश्फाने पुन्हा घाबरत सलमानची माफी मागितली. यानंतर ती पुढे म्हणाली, मला माहीत आहे की ही खूप मोठी गोष्ट आहे, मी जेव्हा खूप लहान होते… तेव्हापासून तुम्ही माझा क्रश आहात.

अरिश्फाच्या या गोड कबुलीचा सलमानही आनंद घेताना दिसला. सलमानने अरिश्फाला ‘अॅडोरेबल’ म्हटलं. सलमान आणि अरिश्फाचे हे गोंडस नातं लोकांना खूप आवडत आहे. याशिवाय, अरिश्फाने सलमानला हेदेखील सांगितलं की तिला त्याच्यासोबत काम करायचं आहे. यावर सलमान खान याने देखील अरिश्फा हिला भविष्यात एकत्र काम करण्याचं वचन दिलं. आता अरिश्फा आणि सलमान खान कधी एकत्र स्क्रिन शेअर करताना दिसतील, याकडे देखील चाहत्यांचं लक्ष लागले आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us