AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बिग बॉस १६ मध्ये वादाच्या भोवऱ्यात असणारा शालिन भनोट कोट्यवधींचा मालक

बिग बॉसच्या घरात वादाच्या भोवऱ्यात अडकलेला शालिन खऱ्या आयुष्यात प्रचंड रॉयल आयुष्य जगतो. कायम आपल्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असणारा शालिन कोट्यवधींचा मालक आहे.

बिग बॉस १६ मध्ये वादाच्या भोवऱ्यात असणारा  शालिन भनोट कोट्यवधींचा मालक
shalin bhanot
| Updated on: Jan 15, 2023 | 10:55 AM
Share

मुंबई : अभिनेता शालिन भनोट ‘बिग बॉस १६’ मुळे सध्या तुफान चर्चेत आहे. शालिन बिग बॉसमधील दमदार स्पर्धकांपैकी एक आहे. गेल्या काही दिवसांपासून बिग बॉसच्या घरात शालिन अभिनेता टीना दत्तासोबत असलेल्या नात्यामुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी टीनाने शालिन याला रागीट असं म्हटलं होतं. दरम्यान बिग बॉसच्या घरात वादाच्या भोवऱ्यात अडकलेला शालिन खऱ्या आयुष्यात प्रचंड रॉयल आयुष्य जगतो. कायम आपल्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असणारा शालिन कोट्यवधींचा मालक आहे.

टीव्ही विश्वातील प्रसिद्ध अभिनेता शालिन दोन कंपन्यांचा मालक आहे. शालिन फक्त अभिनयाच्या माध्यमातून नाही तर, त्यात्या दोन कंपन्यांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची कमाई करतो. शालिन प्राइम लँड प्रायव्हेट लिमिटेड आणि भनोट क्रिएशंस प्रायव्हेट लिमिटेड अशी शालिनच्या दोन कंपन्यांची नावे आहेत.

सध्या शालिन त्यांच्य संपत्तीमुळे चर्चेत आहे. पण एक काळ असा होता जेव्हा शालिन त्याच्या खाजगी आयुष्यामुळे चर्चे आला. शालिनचं घटस्फोट झालं आहे. टीव्ही अभिनेत्री दलजीत कौर हिच्यासोबत शालिनचं लग्न झालं होतं. शालिन आणि दलजीत यांना एक मुलगा आहे.

घटस्फोटानंतर दलजीत मुलासोबत आनंदी आयुष्य जगत आहे. दलजीत हिने शालिन रागीट आणि आक्रमक स्वभावाचा असल्याचं अभिनेत्यावर सांगत घरगुती हिंसाचाराचे गंभीर आरोप केले. लग्नाच्या ६ वर्षांनंतर दलजीत आणि शालिन विभक्त झाले.

दोघांनी नातं टीकावं म्हणून एकमेकांना संधी देखील दिली. दोघांनी ‘नच बलिए 4’ शोमध्ये भन्नाट डान्स करुन विजय देखील आपल्या नावावर केला. ज्यामुळे दोघांचं प्रचंड कौतुक झालं. पण शालिन आणि दलजीत यांचं नातं टिकलं नाही. अखेर २०१५ मध्ये दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.

Follow Us
अंगद का पैर म्हणत अमित शाहांचा भाजपच्या विजयाचा विश्वास...
Amit Shah : अंगद का पैर म्हणत अमित शाहांचा भाजपच्या विजयाचा विश्वास; अखिलेश यादवांनी एका वाक्यात दिलं प्रत्युत्तर
साताऱ्यात पावसाची जोरदार बॅटिंग, शहरासह ग्रामीण भाग जलमय...
Satara Rain : साताऱ्यात पावसाची जोरदार बॅटिंग, शहरासह ग्रामीण भाग जलमय; शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद
पुर्णेकर प्रकरणावर प्रश्न विचारताच उपमुख्यमंत्री थेट.. नेमकं काय घडलं?
Eknath Shinde On Purnekar Case : पुर्णेकर प्रकरणावर प्रश्न विचारताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे थेट...; नेमकं काय घडलं?
वाल्मिक कराड यांचा मुलगा सुशील कराड पुन्हा चर्चेत; ऑडिओ क्लिप व्हायरल
Sushil Karad : वाल्मिक कराड यांचा मुलगा सुशील कराड पुन्हा चर्चेत; पीडित महिलेला धमकी दिल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल
आम्ही संविधानाला संपवू देणार नाही! राहुल गांधींचा हुंकार....
Rahul Gandhi : आम्ही संविधानाला संपवू देणार नाही! राहुल गांधींचा हुंकार; संपूर्ण भाषण पाहा
नरेंद्र मोदी ज्ञानेश कुमार यांना निवडणार की देशाला? तेजस्वी यादव...
Tejashwi Yadav : नरेंद्र मोदी ज्ञानेश कुमार यांना निवडणार की देशाला? तेजस्वी यादव यांचा थेट सवाल
शेतकऱ्यांना भरघोस मदत मिळणार, सरकार वाऱ्यावर सोडणार नाही....
Eknath Shinde : शेतकऱ्यांना भरघोस मदत मिळणार, सरकार वाऱ्यावर सोडणार नाही; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी ग्वाही
शिंदेंनी पुर्णेकर कुटुंबाला भेटायला येऊ नये, हात जोडून विनंती...
Ram Purnekar : शिंदेंनी पुर्णेकर कुटुंबाला भेटायला येऊ नये, हात जोडून विनंती; राम पूर्णेकर असं का म्हणाले?
दिवाळीच्या फराळावर FDA चा कडक पहारा; तुकाराम मुंडेंनी स्वतः तपासले...
Tukaram Munde FDA : दिवाळीच्या फराळावर FDA चा कडक पहारा; तुकाराम मुंडेंनी स्वतः तपासले लाडू-चिवडे; विक्रेत्यांना दिला इशारा
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजस्तंभासाठी पुरोहित संघाची मोठी मागणी; कायमस
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजस्तंभासाठी पुरोहित संघाची मोठी मागणी; कायमस्वरूपी सुरक्षा देण्याची विनंती