AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अपूर्वा नेमळेकर हिच्या जवळच्या व्यक्तीचं निधन; अभिनेत्रीवर कोसळला दुःखाचा डोंगर

'तुला गमावणं ही आयुष्यातील सर्वात कठीण गोष्ट...', जवळच्या व्यक्तीच्या निधनानंतर फोटो पोस्ट करत अभिनेत्रीने भावना केल्या व्यक्त... सध्या सर्वत्र अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हिच्या पोस्टची चर्चा...

अपूर्वा नेमळेकर हिच्या जवळच्या व्यक्तीचं निधन; अभिनेत्रीवर कोसळला दुःखाचा डोंगर
| Updated on: Apr 15, 2023 | 5:28 PM
Share

मुंबई : ‘रात्रीस खेळ चाले’ मालिकेतून चाहत्यांच्या भेटीस अलेली अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हिच्या भावचं निधन झालं आहे. वयाच्या २८ व्या वर्षी भावाने अखेरचा श्वास घेतल्यामुळे अभिनेत्रीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. खुद्द अपूर्वाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत भावाच्या निधनाची माहिती दिली आहे. सध्या सर्वत्र अपूर्वाने भावासाठी लिहिलेल्या पोस्टची चर्चा रंगत आहे. भावाचे काही फोटो शेअर करत अभिनेत्रीने भावना व्यक्त केल्या आहेत. अभिनेत्रीच्या पोस्टवर अनेक चाहत्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तर अनेकांनी अपूर्वाच्या भावाला सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली आहे. अपूर्वाने भावूक पोस्ट शेअर करत भावाला श्रद्धांजली वाहिली आहे.

भावाचे फोटो पोस्ट करत अभिनेत्री म्हणाली, ‘माझ्या प्रिय भाऊ ओमी… आयुष्यात अनेकदा होणाऱ्या तोट्याचा सामना करावा लागतो…पण झालेल्या काही नुकसानाची भरपाई करता येत नाही. तुला गमावणं ही माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण गोष्ट आहे… तुझा अखेरचा निरोप घेण्यासाठी मी अद्याप तयार नाही. मी तुला सोडायला मी तयार नाही. आणखी एका दिवसासाठी मी कहीही गमवायला तयार आहे… फक्त एका सेकंदासाठी… मी बिनशर्त प्रेमावर विश्वास ठेवायला शिकली आहे, कारण मृत्यूबद्दलची एक गहन गोष्ट म्हणजे प्रेम… प्रेम कधीही मरत नाही.’

अभिनेत्री पुढे म्हणाली, ‘काही नाती कधीच तोडता येत नाहीत… कारण शारीरिकदृष्ट्या तुम्ही त्या ठिकाणी नसाला तरी तुमच्या हृदयात कायम प्रेम राहतं. तु्झ्या आठवणी कायम माझ्यासोबत असतील. आपण पुन्हा नक्की भेटू. पण तेव्हा इतक्या लवकर विभक्त व्हायचं नाही… तू कायम माझ्यासोबत राहशील… . माझं तुझ्यावर प्रेम होतं, प्रेम आहे आणि ते नेहमीच राहिल.’ अशी पोस्ट अपूर्वाने तिच्या भावासाठी केली आहे. अपूर्वाचा भाऊ २८ वर्षांचा होता. हृदयविकाराचा झटका आल्यामुळे अभिनेत्रीच्या भावाने अखेरचा श्वास घेतला आहे.

अपूर्वाच्या पोस्टवर अनेक कमेंट करत अभिनेत्रीला सावरण्यासाठी सांगितलं आहे. भावाच्या निधनानंतर अपूर्वा पूर्णपणे कोलमडली आहे. मराठी सिनेविश्वातील प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री म्हणून अपूर्वा नेमळेकर हिची ओळख आहे. अपूर्वाने बिग बॉसच्या माध्यमातून देखील चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. बिग बॉस मराठीच्या चौथ्या सीझनची अपूर्वी रनरअप ठरली होती.

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.