AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Suraj Chavan Daughter Photo: सूरज चव्हाणच्या लेकीला पाहिलेत का? आत्या जान्हवी किल्लेकरने शेअर केला खास व्हिडीओ

Suraj Chavan Daughter Photo: सूरज चव्हाण आणि अभिनेत्री जान्हवी किल्लेकर हे बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतरही कायम एकमेकांना भेटताना दिसतात. जान्हवीने सूरजला बहिण मानले आहे. आता सूरजला मुलगी झाल्यानंतर जान्हवी तिला पाहण्यासाठी हॉस्पिटलमध्ये गेली आहे.

Suraj Chavan Daughter Photo: सूरज चव्हाणच्या लेकीला पाहिलेत का? आत्या जान्हवी किल्लेकरने शेअर केला खास व्हिडीओ
सूरज चव्हाणImage Credit source: tv9 Marathi
| Updated on: Sep 08, 2026 | 11:32 AM
Share

‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा विजेता सूरज चव्हाणच्या घरी चिमुकल्या पाहुणीचे आगमन झाले असून घरात आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. ‘गुलिगत स्टार’ सूरज चव्हाण आणि त्यांची पत्नी संजना चव्हाण यांना कन्यारत्न झाले आहे. जन्माष्टमीच्या शुभमुहूर्तावर सूरज बाप झाला आहे. ही बातमी सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली आणि चाहत्यांकडून सूरज व संजना यांना शुभेच्छांचा वर्षाव झाला.

सूरजच्या घरी चिमुकलीचे आगमन

लग्नानंतर अवघ्या नऊ महिन्यांनी सूरज आणि संजना यांच्या आयुष्यात हा आनंदाचा क्षण आला असून दोघेही आई-बाबा झाले आहेत. बाबा झाल्यानंतर सूरजचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. लेकीच्या जन्मानंतरचा त्यांचा रुग्णालयातील पहिला व्हिडिओ समोर आला आहे. एका फॅनने रुग्णालयातून शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये सूरज आणि संजनाच्या बाळाला पाहण्यासाठी स्टाफ व चाहत्यांनी गर्दी केलेली दिसते. गर्दीतून वाट काढत सूरज संजना आणि बाळाला भेटला. मात्र या व्हिडिओमध्ये सूरजच्या लग्नापासून ते संजनाच्या डोहाळे जेवणापर्यंत हक्काने मिरवणारी त्यांची सेलिब्रिटी बहीण जान्हवी किल्लेकर दिसली नव्हती. त्यामुळे चाहत्यांनी कमेंट्समध्ये ‘आत्याबाई कुठे आहेत?’ असे प्रश्न विचारले होते.

जान्हवीने शेअर केला व्हिडीओ

आता मात्र जान्हवीने वेळ काढून रुग्णालयात पोहोचून संजना आणि सूरजच्या बाळाला भेट दिली आहे. यावेळी जान्हवी काहीशी भावूक झाल्याचेही दिसून आले. मराठी अभिनेत्री जान्हवी किल्लेकरने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. यात जान्हवी खूप खूश दिसते. आपल्या लाडक्या भावाच्या आयुष्यात आलेल्या या आनंदाच्या क्षणाचा गोडवा तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतो. जान्हवी गाडीतून उतरून थेट सूरज-संजनाच्या बाळाच्या वॉर्डकडे धावत जाते. तिथे संजना भेटते. जान्हवी तिला कडकडून मिठी मारते आणि मग बाळाला भेटण्यासाठी जाते. जान्हवी बाळाला हातात घेते आणि डोळेभरून पाहते. त्यावेळी तिच्या डोळ्यात आनंदाश्रू पाहायला मिळाले. जान्हवी संपूर्ण रुग्णालयात बर्फी वाटते. संपूर्ण व्हिडिओमध्ये सूरज मात्र दिसला नाही.

Follow Us
बिनबुडाचं गाडगं... बिना पेंदे का लोटा! सदावर्तेंनी जरांगेंना डिवचलं
बिनबुडाचं गाडगं... बिना पेंदे का लोटा! गुणरत्न सदावर्तेंनी जरांगेंना डिवचलं
नरेंद्र मोदी हे गुजरातचे पंतप्रधान आहेत का? संजय राऊतांचा थेट सवाल
Sanjay Raut | नरेंद्र मोदी हे गुजरातचे पंतप्रधान आहेत का? संजय राऊतांचा थेट सवाल; पुढे म्हणाले, देशाचे कॅबिनेट...
श्वेता महालेंना प्रत्युत्तर देताना संजय गायकवाडांची जीभ घसरली! म्हणाले
Sanjay Gaikwad | श्वेता महालेंना प्रत्युत्तर देताना संजय गायकवाडांची जीभ घसरली! म्हणाले...
रात्री 2 वाजेपर्यंत वर्षा बंगल्यावर खलबतं! मराठा आरक्षणावर सरकारची...
Maratha Reservation | रात्री 2 वाजेपर्यंत वर्षा बंगल्यावर खलबतं! मराठा आरक्षणावर सरकारची महत्त्वाची बैठक; फडणवीसांसह...
डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट
Aishwarya Jadhav Dancer | डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट...
दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
Dancer Radha Patil News | पुण्यात दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं...
Baramati | बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं स्वतंत्र पॅनल; सोमेश्वर कारखान्याची निवडणूक रंगणार
विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
Vishakha Raut | विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला इशारा
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला कडक इशारा
20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर!
Nanded | 20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर! नांदेडमध्ये हजारो एकर पीक धोक्यात