AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राहुल वैद्यसोबत अफेअरच्या चर्चा, 20 वर्षांनंतर प्राजक्ता शुक्रेकडून नात्याबद्दल मोठा खुलासा…

'तो आय लव्ह यू... म्हणालेला...', राहुल वैद्य आणि प्राजक्ता शुक्रे यांच्या नात्यात का आलेला दुरावा... 20 वर्षांनंतर प्राजक्ताकडून नात्याबद्दल मोठा खुलासा..., सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त प्राजक्ता हित्या वक्तव्याची चर्चा...

राहुल वैद्यसोबत अफेअरच्या चर्चा, 20 वर्षांनंतर प्राजक्ता शुक्रेकडून नात्याबद्दल मोठा खुलासा...
प्राजक्ता शुक्रे
| Updated on: May 05, 2026 | 3:24 PM
Share

बिग बॉस मराठीच्या सहाव्या सीझननंतर गायिका प्राजक्ता शुक्रे हिच्या लोकप्रियतेत मोठी वाढ झाली. बिग बॉसच्या घरातून बाहेर निघाल्यापासून प्राजक्ता कामय कोणत्या कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सांगायचं झालं तर, इंडियन आयडॉलच्या पहिल्या सीझनमध्ये प्राजक्ता, अभिजीत सावंत आणि राहुल वैद्य स्पर्धक म्हणून सहभागी झालेले. तेव्हा प्राजक्ता आणि राहुल यांच्या रिलेशनशिपच्या चर्चांनी जोर धरलेला. पण दोघांचं नातं फार काळ काही टिकलं नाही. अखेर त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. अखेर 20 वर्षानंतर प्राजक्ता हिने लव्हस्टोरीवर मौन सोडलं आहे.

नुकताच झालेल्या मुलाखतीत प्राजक्ता म्हणाली, ‘इंडियन आयडॉलच्या वेळी आम्ही खूप लहान होतो. तेव्हा आम्हाला दोघांना देखील फार काही कळत नव्हतं. त्या वयात कोणी अधिक महत्त्व दिलं तर, आपल्याला आवडतं… राहुल मला आवडायचा… तो खूप बोलका आहे… आमच्यात नेमकं काय होतं, ते आम्ही कधीच ठरवलं नव्हतं..’

मुलाखतीत, राहुल याने तुला प्रपोज केलेला का? असं देखील विचारण्यात आलं. यावर प्राजक्ता स्पष्टपणे काही सांगितलं नाही, पण म्हणाली, ‘मी यावर फार काही जास्त बोलणार नाही. पण राहुल मला इतकंच म्हणालेला की, ‘तू खूप चांगली मुलगी आहेस, आणि मला तू खूप आवडतेस… मी आता इथेच थांबतो…’ यावर मी त्याला म्हणालेले, ‘तू माणून म्हणून आणि गायक म्हणून खूप चांगला आहेस…’

एवढंच नाही तर, प्राजक्ता हिने दोघांमधील एक रंजक किस्सा देखील सांगितलेला. तेव्हा प्राजक्ता आणि राहुल एकत्र शो करायचे. तेव्हा एका लग्नात गाण्यासाठी त्यांना बोलावलं होतं… पण लग्नात लोकं खाण्यापिण्यात इतके मग्न होते की, त्यांचं गाणं कोणीच ऐकत नव्हतं..

प्राजक्ता म्हणाली, ‘त्या घटनेचा माझ्या बालमानावर फार मोठा परिणाम झाला. मला वाटत होतं, कोणाला ऐकायचं नसेल तर आपण गायचं कशाला. पण राहुल प्रचंड प्रोफेशनल होता आणि वातावरणाशी जुळवून घेणारा होता… तेव्हा मला कळलं की, आमचे विचार सारखे नाही… आम्ही दोघे खूप वेगळे आहोत…’ असं देखील प्राजक्त म्हणाली.

राहुल याच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेता आज त्याच्या खासगी आयुष्यात आनंदी आहे. पत्नी आणि मुलीसोबत सुखी आयुष्य जगत आहे. तर दुसरीकडे ‘बिग बॉस’ नंतर प्राजक्ता हिने देखील नवीन सुरुवात केली आहे.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी