सुरज चव्हाण लग्नासाठी बाशिंग बांधून तयार, होणाऱ्या बायकोसाठी सोन्याच्या दागिन्यांची मोठी खरेदी, बस्ता अन्

बिग बॉस मराठी सीजन 5 चा विजेता सुरज चव्हाण याच्या लग्नाची जोरदार तयारी सुरू असून काही फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. सुरजच्या होणाऱ्या बायकोचे नाव संजना आहे. नुकताच सुरजने लग्नाची मोठी खरेदी केली.

सुरज चव्हाण लग्नासाठी बाशिंग बांधून तयार, होणाऱ्या बायकोसाठी सोन्याच्या दागिन्यांची मोठी खरेदी, बस्ता अन्
Suraj Chavan
| Updated on: Nov 08, 2025 | 1:04 PM

‘झापुक झुपूक’ म्हटले की, आपल्या सर्वांना आठवण येते ती म्हणजे सुरज चव्हाणची. सूरज चव्हाणने जबरदस्त गेम खेळत आणि आपल्या साध्या वागण्यातून थेट बिग बॉस मराठी जिंकले. ज्यावेळी तो बिग बॉसच्या घरात दाखल झाला, त्यावेळी तो एक जोडी चप्पल आणि दोन जोडी कपडे घेऊन. त्याने बिग बॉस मराठीचा विजेता होण्याचा मान मिळवला. लोकांच्या मनावर अधिराज्य सुरज चव्हाणने गाजवले. बिग बॉस मराठीच्या घरात दाखल झाल्यानंतर अनेकदा तो आपल्या लग्नाबद्दल आणि होणाऱ्या बायकोबद्दल बोलताना दिसला. कमी वयात आई वडिलांचे छत्र हरवलेल्या सुरज चव्हाणने मोठी गरीबी बघितली. हाताला मिळेल ते काम त्याने केले. बायको कशी पाहिजे, हे सांगताना तो अनेकदा बिग बॉसच्या घरात दिसला. अजित पवारांनी सुरजला त्याच्या गावात घर बांधण्यासाठी मोठी मदत केली.

अगदी कमी दिवसामध्ये त्याला एक वेगळी ओळख मिळाली. सुरज चव्हाण एक लोकप्रिय सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे. सूरज चव्हाण लवकरच लग्न करणार असून त्याच्या लग्नाची जय्यत तयारी सुरू आहे. सूरज चव्हाणच्या होणाऱ्या बायकोचे फोटो आणि व्हिडीओही पुढे आली आहेत. आपल्याला हवी तशीच मुलगी भेटल्याचेही त्याने म्हटले. त्याला कशी बायको हवी हे त्याने यापूर्वी बिग बॉसच्या घरात अनेकदा सांगितले.

सूुरजच्या होणाऱ्या बायकोचे नाव संजना आहे. बिग बॉसच्या घरातील सूरज चव्हाणची मैत्रिण अंकिता वालावलकर हिने सूरजला आणि त्याच्या होणाऱ्या बायकोला केळवणसाठी बोलावले होते. यानंतर सुरज चव्हाणने होणाऱ्या बायकोसाठी सोन्याच्या दागिन्यांची मोठी खरेदी केली. सुरज हा होणाऱ्या पत्नीचे दागिने खरेदी करण्यासाठी ठाण्यात पोहोचला होता. तिथे त्याने मोठ्या दागिन्यांची खरेदी केली.

यादरम्यान सुरज चव्हाणने लग्नासाठी बस्ता देखील बांधला. सूरजची होणारी पत्नी दागिने घालून आरशात बघताना दिसत आहे. अंकिता देखील लग्नाची खरेदी करण्यासाठी दोघांची मदत करताना दिसत आहे. सुरज चव्हाणच्या घरी लगीनघाईन सुरू असल्याचे आता बघायला मिळतंय. सुरज चव्हाणच्या लग्नाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.