Bigg Boss Marathi Season 6 : बिग बॉस मराठीच्या नव्या सिझनची घोषणा, पुन्हा जोरदार राडा पाहायला मिळणार; मोठी अपडेट समोर!

गेल्या अनेक दिवसांपासून ज्याची प्रतीक्षा होती ती आता संपली आहे. लवकरच बिग बॉस मराठीचा सहावा सिझन येणार आहे. याबाबत कलर्स मराठीने घोषणा केली आहे. त्यामुळे यावेळी कोण स्पर्धक असणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Bigg Boss Marathi Season 6 : बिग बॉस मराठीच्या नव्या सिझनची घोषणा, पुन्हा जोरदार राडा पाहायला मिळणार; मोठी अपडेट समोर!
bigg boss marathi new season announcement
Image Credit source: instagram
| Updated on: Nov 24, 2025 | 8:08 PM

Bigg Boss Marathi Season 6 Announcement : मराठी टेलिव्हिजनवरील सर्वात मोठा व सर्वाधिक प्रतीक्षित रिअॅलिटी शो बिग बॉस मराठी आपला सहावा सीझन घेऊन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे. आता बिग बॉसच्या नव्या पर्वाची चाहूल लागताच चर्चांना उधाण येत असून उत्सुकता शिगेला आहे. बिग बॉसच्या घराचा दरवाजा पुन्हा उघडणार आहे. त्याबातची घोषणा कलर्स मराठीने केली आहे. कलर्स मराठीने आपल्या इन्स्टाग्राम खात्यावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या पोस्टमध्ये लवकरच बिग बॉस मराठीचा नवा सिझन येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे यावेळच्या पर्वात कोण-कोण स्पर्धक असणार, अशी उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.

यंदा रितेश देशमुख सूत्रसंचालन करणार का?

मराठी बिग बॉस लवकरच येणार हे स्पष्ट झाल्यानंतर आता यंदा बिग बॉसच्या घराची थिम का असेल? सदस्य कोण असतील? घर कसे असेल? यंदाचा गेम प्लॅन काय असणार? असे बरेच प्रश्न प्रेक्षकांना पडले आहेत. सोबतच यंदाच्या बिग बॉस मराठीचे सूत्रसंचालन महाराष्ट्राचा लाडका भाऊ म्हणजेच रितेश देशमुख करणार की अन्य कोणाकडे याची सूत्रं सोपवली जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बिग बॉसच्या घरात पुन्हा एकदा भाऊचा कट्टा पाहायला मळणार का? याचीही सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.

यंदा एक नव्हे तर अनेक दरवाजे

कलर्स मराठीकडून सादर करण्यात आलेल्या खास टीझरमध्ये प्रेक्षकांना यंदाच्या सीझनच्या थीमचा सर्वात महत्त्वाचा संकेत मिळाला तो म्हणजे दरवाजा. या वेळी एक नाही तर अनेक दरवाजे असणार आहेत. यावेळेसचा खेळ अजूनच धमाकेदार होणार असल्याचे बोलले जात आहे.

सध्या या सिझनबद्दलची सर्व माहिती गुलदस्त्यात ठेवण्यात आली असून ती लवकरच सर्वांसमोर आणली जाणार आहे. सदस्यांची नावे, घराची पहिली झलक, थीमची अधिकृत घोषणा आणि या वर्षीचे मोठे ट्विस्ट हे सर्व लवकरच प्रेक्षकांसमोर येणार आहेत. हा सिझन प्रेक्षकांना कलर्स मराठी आणि जिओ हॉटस्टारवर पाहायला मिळणार आहे.