AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आंदोलनात सहभागी होण्यासाठी सेलिब्रिटींना देतायत पैसे; अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा

कॉकरोच जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी सेलिब्रिटींना पैशांची ऑफर दिली जात आहे, असा आरोप प्रसिद्ध अभिनेत्रीने केला आहे. या अभिनेत्रीने नेमकं काय म्हटलंय, ते जाणून घ्या..

आंदोलनात सहभागी होण्यासाठी सेलिब्रिटींना देतायत पैसे; अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा
विद्यार्थ्यांचं आंदोलनImage Credit source: Instagram
| Updated on: Jul 24, 2026 | 2:35 PM
Share

बिग बॉस ओटीटी फेम अभिनेत्री आकांक्षा पुरीने विद्यार्थ्यांच्या आंदोलनाबद्दल धक्कादायक खुलासा केला आहे. इंडस्ट्रीतील लोकांना आंदोलनात सहभागी होण्याच्या बदल्यात पैशांची ऑफर दिली जात आहे, असं तिने म्हटलंय. नीट पेपरफुटीप्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीतल्या जंतर मंतर याठिकाणी कॉकरोच जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाची धग आता संपूर्ण देशभरात पसरली असून विविध राज्यांमधील तरुणही रस्त्यावर उतरले आहेत. या आंदोलनात सेलिब्रिटीसुद्धा सहभागी होत आहेत.

काय म्हणाली आकांक्षा?

‘आयएनएस’ला दिलेल्या मुलाखतीत आकांक्षा पुरी म्हणाली, “लोकांनी योग्य गोष्टींची साथ द्यावी, इतकंच मला वाटतं. याचं मार्केटिंग करू नये, त्यातून पैसे कमावू नये. या आंदोलनातून स्वत:ची पोळी भाजू नका. योग्य लोकांची साथ द्या. यापेक्षा अधिक मोकळेपणे मी काय बोलू? मला असं वाटतं, जे लोक माझ्यासोबत आहेत.. अभिनेते, कंटेंट क्रिएटर्स.. त्या सर्वांना माहीत आहे की अनेक लोक आणि पक्ष आमच्याशी संपर्क साधत आहेत. याचं मार्केटिंग करू पाहत आहेत.”

सेलिब्रिटींना पैशांची ऑफर

“मला या कचऱ्याचा भाग बनायचं नाहीये. मला योग्य गोष्टींची साथ द्यायची आहे आणि त्यामुळेच मी तिथे आहे की नाही याने काही फरक पडत नाही. जेव्हा कधी कोणाला गरज असते, तेव्हा मी त्यांच्यासोबत उभी असते. मला विद्यार्थ्यांबद्दल खूप वाईट वाटतंय, कारण ते भारताचं भविष्य आहेत. विद्यार्थ्यांवर लाठीचार्जचे व्हिडीओ पाहून मी खूप अस्वस्थ झाले. त्यामुळे सरकारने त्यांचं बोलणं ऐकून घ्यावं, असं मला वाटतं.”

18 जुलै रोजी सकाळी दिल्ली पोलिसांनी शास्त्रज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांना जंतर मंतर इथल्या आंदोलनस्थळावरून बळजबरीने हटवलं. दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आणि वैद्यकिय सल्ल्यामुळे अधिकाऱ्यांनी त्यांना रुग्णालयात दाखल केलं. त्यानंतर सोमवारी सीजेपीच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी थेट संसद भवनावर धडक मोर्चा काढला. यावेळी दिल्ली पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला. या लाठीचार्जचा अनेक सेलिब्रिटींनी निषेध व्यक्त केला आहे.

Follow Us
पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
Pune Dry Day : पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
मला चांगली मराठी येते, भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
Sanjay Dutt | मला चांगली मराठी येते, कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा व्हिडिओ बघाच
Lalbaugcha Raja First Look 2026 | ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा संपूर्ण व्हिडिओ बघाच
ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPI...
PM Modi | ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये PM मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPIपर्यंत भारताच्या प्रगतीचा पाढाच वाचला
विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! व्हिडिओ होतोय व्हायरल
Virat Kohli Meets Eknath Shinde | विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! क्रिकेट अन् राजकारणातील दोन दिग्गज एकाच फ्रेममध्ये; व्हिडिओ होतोय व्हायरल
एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले
Yogesh Kadam | एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले; मनोज जरांगेंना केलं आवाहन
जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी....
Manoj Jarange | जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी मिळणार की ब्रेक लागणार?
छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत
CM Devendra Fadnavis | छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत; मुख्यमंत्री फडणवीसांचा नेमका कोणाला टोला?
सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा सदावर्तेंवर पुन्हा घणाघात
Ambadas Danve vs Gunaratna Sadavarte | सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा गुणरत्न सदावर्तेंवर पुन्हा घणाघात; पुढे म्हणाले...
आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता...
Atul Bhatkhalkar On Aaditya | आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता संतापलाच