
Nivedita Saraf on Bihar Election : बिहारमध्ये भाजप पक्षाचा विजय झाल्यामुळे मंत्र्यांसोबत कार्यकर्त्यांमध्ये आनंद आणि जल्लोषाचं वातावरण आहे. पण त्याआधी बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल कसा लागणार? कोणाला बहुमत मिळणार, एनडीएची पुन्हा एकदा सत्ता येणार की? महाआघाडी बाजी मारणार… याकडे सर्वांचं लक्ष होतं. अशात निकाल जाहिर होत असताना भाजप सर्वाधिक म्हणजे 95 जागांवर आघाडीवर आहे. यंदाच्या निवडणुकीनंतर भाजप बिहारमधील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर नितीशकुमार यांच्या जेडीयूचा नंबर आहे. जेडीयू पक्षाने 82 जांगावर विजय मिळवला आहे.
सर्वत्र बिहार मधील भाजप पक्षाच्या विजयाचा बोलबाला सुरु असताना दिग्गज अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी देखील पक्षाबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. सध्या निवेदिता सराफ यांच्या वक्तव्याची सर्वत्र चर्चा सुरु आहे… एका कार्यक्रमात निवेदिता सराफ यांनी वक्तव्य केलं आहे..
बिहार निवडणुकीनंतर झालेल्या एका कार्यक्रमात निवेदिता सराफ यांनी भाजप पक्षाबद्दल स्वतःचं मत सांगितलं आहे. बिहारमध्ये मिळालेल्या मोठ्या विजयाच्या शुभेच्छा देत निवेदिता सराफ म्हणाल्या, ‘मी कट्टर बीजेपी असल्यामुळे मला फारच आनंद होत आहे…’, निवेदिता सराफ यांचं हे वक्तव्य सध्या सर्वत्र चर्चेत आहे…
सांगायचं झालं तर, दिवाळी पहाट कार्यक्रमात दिग्दर्शक आणि अभिनेते महेश कोठारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपतं भरभरून कौतुक केलं होतं… ‘मी मोदीजींचा भक्त आहे… मी भाजपचा भक्त आहे. महापालिका निवडणुकीत मुंबईत भजपचाच कमळ फुलेल आणि मुंबईत भाजपचा महापौर होईल…’ असा विश्वास महेश कोठारे यांनी व्यक्त केलेला…
महेश कोठारे यांच्या वक्तव्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देखील दिली होती. “महेश कोठारे नक्की मराठीच आहेत ना? मला शंका वाटते. प्रत्येकाला मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. पण तुम्ही कलाकार आहात आणि तुमचे सिनेमे फक्त भाजपच्या लोकांनी पाहिलेले नाहीत”, अशी टीका संजय राऊत यांनी केली होती.