Birth Anniversary: मोठ्या पडद्यावरील कजाग सासू, प्रेमळ आई… एक होत्या ललिता पवार; वाचा संपूर्ण प्रवास

ललिता पवार यांच्यासोबत चित्रपटसृष्टीचा जवळजवळ 50 वर्षांचा इतिहास जोडला गेला आहे. (Birth Anniversary, Read the Filmy journey of actress Lalita Pawar )

  • Updated On - 11:23 am, Sun, 18 April 21
Birth Anniversary: मोठ्या पडद्यावरील कजाग सासू, प्रेमळ आई... एक होत्या ललिता पवार; वाचा संपूर्ण प्रवास

मुंबई :अभिनेत्री ललिता पवार (Lalita Pawar) यांनी अनेक चित्रपटांमधून लोकांचं मनोरंजन केलंय. त्यांनी मोठ्या पडद्यावर खलनायकाच्या अनेक भूमिका साकारल्या. मात्र प्रेक्षकांनी त्यांना भरभरुन प्रेम दिलं. (Birth Anniversary, Read the Filmy journey of actress Lalita Pawar )

आपण नेहमी अशा कलाकारांबद्दल बोलतो, ज्यांनी मोठ्या पडद्यावर सकारात्मक भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं. मात्र चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका साकारणार्‍या खलनायकाविषयी आपण कधी बोलत नाही. तर, आज आपण चित्रपट कारकीर्दीतील एक उत्तम नाव अर्थात ललिता पवार यांच्याबद्दल माहिती घेऊयात. ललिता पवार यांच्यासोबत जवळजवळ 50 वर्षांचा इतिहास जोडला गेला आहे. त्या या 50 वर्षांच्या काळात वेगवेगळ्या रुपांमध्ये दिसल्या.

कमी काळातच इंडस्ट्रीत झाल्या यशस्वी

ललिता पवार यांचा जन्म 18 एप्रिल 1916 ला एका मराठी कुटुंबात झाला. त्यांचं नाव त्यांच्या आईनं ठेवलं होतं तेही ललिता पवार नाही तर अम्बा लक्ष्मणराव सगुन. ललिता यांचे वडील गणेशराव हे व्यापारी होते. ललिता पवार जेव्हा 9 वर्षांच्या होत्या तेव्हा त्यांना 1928 मध्ये तयार झालेला चित्रपट राजा हरिश्चंद्रमध्ये महत्त्वाची भूमिका साकारण्याची संधी मिळाली आणि याच चित्रपटाच्या माध्यमातून त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. या चित्रपटात ललिता पवार यांनी अगदी छोटी भूमिका साकारली, मात्र ती भूमिका त्यांनी इतकी प्रभावी पार पाडली की त्यानंतर त्यांना एकापेक्षा एक चित्रपट मिळू लागले.

काही वर्षांतच त्याना इतकं यश मिळालं की वयाच्या 16 व्या वर्षी त्यांनी कैलास नावाचा एक चित्रपट देखील तयार केला. हा एक सायलेन्ट चित्रपट होता. यानंतर त्यांनी टॉकी चित्रपटाची निर्मितीही केली. हा चित्रपट होता ‘दुनिया क्या कहें’. याकाळात त्यांने मुख्य अभिनेत्री म्हणून अनेक हिट चित्रपटांमध्ये काम देखील केलं. ललिता पवार यांची गणना त्या काळातील सर्वात यशस्वी अभिनेत्रींमध्ये होत होती. सायलेंट आणि टॉकीज या दोन्ही चित्रपटांमध्ये त्यांनी स्वत:ला सर्वोत्कृष्ट सिद्ध करून दाखवलं.

एका अपघातानं बदललं आयुष्य

जेव्हा ललिता पवार यशाच्या शिखरावर पोहोचल्या, तेव्हा अशी एक घटना घडली ज्यानं त्यांचे संपूर्ण आयुष्य बदललं. ललिता पवार एक अतिशय ग्लॅमरस अभिनेत्री होती, मात्र त्या अपघातानंतर सर्व काही बदललं. ललिता पवार ‘जंग-ए-आझादी’ चित्रपटाचं शूटिंग करत होत्या. दरम्यान भगवान दास या चित्रपटामधील अभिनेते त्यांच्यासोबत होते. तेव्हा ते नवीनच अभिनेते होते आणि त्यांना फारसा अनुभव नव्हता. एका सीनमध्ये त्यांनी ललिता पवार यांना चापट मारली. ललिता पवार यांना भगवान यांनी थापड मारताच त्या बेशुद्ध पडल्या. जेव्हा त्यांना दवाखान्यात नेण्यात आले तेव्हा जोरदार चापट मारल्यामुळे त्यांच्या डोळ्याजवळील नस खराब झाल्याचं कळलं.

अशाप्रकारे ‘ललिता पवार’ हे नाव मिळाले

या अपघातानंतर पूर्णपणे बरं होण्यासाठी त्यांना तीन वर्षे लागली मात्र त्या पुन्हा एकदा चित्रपटसृष्टीत परतल्या. मात्र, आता परिस्थिती बदलली होती. आधी त्या मुख्य अभिनेत्री म्हणून चित्रपटांमध्ये दिसत होत्या, मात्र आता त्यांना एक वेगळ्या प्रकारची भूमिका म्हणजेच खलनायक किंवा सहाय्यक भूमिका साकारण्याची संधी मिळाली.

झालं असं की अपघातानंतर ललिता पवार यांना चित्रपटसृष्टीत परत यायचं होतं, मात्र हे कसं करावं हे त्यांना समजत नव्हत. एक दिवस त्यांचे गुरु त्यांना भेटायला पोहोचले. ललिता पवार यांनी त्यांना आपल्याबद्दल सांगितलं. ललिता पवार यांचं म्हणणं ऐकून त्यांचे मार्गदर्शक म्हणाले की आता तुम्हाला आपली नवीन ओळख निर्माण करावी लागेल, तीही एका नवीन नावाने. डाव्या डोळ्याच्या बिघाडानंतर त्यांना चित्रपटांमधून कोणी अभिनेत्री म्हणून घेणार नाही, हे ललिता पवारांना ठाऊक होतं. ललिता पवार यांनी त्यांच्या गुरुजींनी सांगितलेली बाब मान्य केली आणि त्या पुन्हा नव्या ओळखीनं इंडस्ट्रीत परतल्या तेही नवीन नावासह आणि हे नवीन नाव होतं ललिता पवार.

संबंधित बातम्या


Published On - 11:22 am, Sun, 18 April 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI