AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

The Kerala Story | ‘द केरळ स्टोरी’च्या वादाच्या पार्श्वभूमीवर भाजप नेत्याने कॉलेज तरणींसाठी उचललं मोठं पाऊल

केरळमधल्या हिंदू आणि ख्रिश्चन मुलींना लव्ह जिहादच्या जाळ्यात अडकवून त्यांचं कशा पद्धतीने धर्मपरिवर्तन करण्यात आलं आणि ISIS चे दहशतवादी बनवण्यात आलं, याची कथा चित्रपटात दाखवण्यात आली आहे.

The Kerala Story | 'द केरळ स्टोरी'च्या वादाच्या पार्श्वभूमीवर भाजप नेत्याने कॉलेज तरणींसाठी उचललं मोठं पाऊल
The kerala story
| Updated on: May 07, 2023 | 2:01 PM
Share

लखनौ : सुदिप्तो सेन दिग्दर्शित ‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपट 5 मे रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. एकीकडे या चित्रपटाला काहींचा विरोध आहे तर दुसरीकडे काहींनी चित्रपटातील कथेला समर्थन दिलं आहे. ‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपट प्रचारकी असल्याची टीका काहींनी केली आहे. या सर्व वादाच्या पार्श्वभूमीवर आता एका भाजप नेत्याने मोठं पाऊल उचललं आहे. लखनौमधील नवयुग कन्या पोस्ट ग्रॅज्युएट कॉलेजच्या 100 विद्यार्थिनींसाठी भाजप नेते अभिजात मिश्रा यांनी ‘द केरळ स्टोरी’च्या स्क्रिनिंगचं आयोजन केलं आहे. लखनौमधील एका सिनेमा हॉलमध्ये 100 विद्यार्थिनींना हा चित्रपट दाखवण्यात आला. यावेळी खुद्द उत्तरप्रदेशनचे भाजप सचित अभिजात मिश्रासुद्धा उपस्थित होते.

याविषयी अभिजात यांनी ट्विट करत लिहिलं, ‘लव्ह जिहादपासून मुलींचं आयुष्य सुरक्षित करण्यासाठी हा चित्रपट नक्की पहा. दहशतवादी, लव्ह जिहादचं समर्थन करणाऱ्यांवर आणि द केरळ स्टोरीचा विरोध करणाऱ्या पक्षांवर बंदी आणली पाहिजे.’ अनेकदा राजकीय प्रचारांदरम्यान ‘लव्ह जिहाद’ हा शब्द वापरला जातो. लव्ह जिहाद ही एक अशी संकल्पना आहे ज्यामध्ये मुस्लिम पुरुष हिंदी स्त्रीला इस्लाम धर्म स्वीकारण्यास प्रलोभन दाखवतो. “मुस्लिम मुलांच्या जाळ्यात अडकण्यापासून तरुणींचं संरक्षण करणं खूप महत्त्वाचं आहे”, असं मिश्रा पुढे म्हणाले.

कॉलेज विद्यार्थिनींना चित्रपट दाखवण्याविषयी मिश्रा म्हणाले, “सर्वांत पहिली गोष्ट म्हणजे लव्ह जिहाद हा प्रेमाचा अपमान आहे. दुसरी गोष्ट म्हणजे ते आमच्या मुलांना राष्ट्रविरोधी बनवत आहेत. प्रत्येकजण आपापल्या धर्माचं पालन करण्यासाठी मोकळा आहे पण दुसऱ्यांचं शोषण करून त्यांना चुकीच्या मार्गावर ढकलणं चुकीचं आणि अस्वीकार्य आहे.” केरळमधील तीन महिन्यांच्या कारकिर्दीत त्यांनी मुस्लिम पुरुषांकडून हिंदू महिलांना कसं आमिष दाखवलं जातं, हेदेखील पाहिल्याचा दावा मिश्रा यांनी यावेळी केला.

‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपट दाखवण्याआधी विद्यार्थिनींची परवानगी घेण्यात आली होती, असं स्पष्टीकरण नवयुग कन्या पीजी. कॉलेजच्या मुख्याध्यापिका मंजुला उपाध्याय यांनी दिलं आहे. विद्यार्थिनींसोबत शाळेतले काही शिक्षकसुद्धा त्यावेळी उपस्थित होते, असंही त्यांनी म्हटलंय.

‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटाने पहिल्या दिवशी 8 कोटी आणि दुसऱ्या दिवशी 12 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. अवघ्या 40 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाच्या दुसऱ्या दिवसाच्या कमाईत चांगलीच वाढ झाल्याचं पहायला मिळालं. केरळमधल्या हिंदू आणि ख्रिश्चन मुलींना लव्ह जिहादच्या जाळ्यात अडकवून त्यांचं कशा पद्धतीने धर्मपरिवर्तन करण्यात आलं आणि ISIS चे दहशतवादी बनवण्यात आलं, याची कथा चित्रपटात दाखवण्यात आली आहे.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.