कर्नल सोफिया कुरेशी यांच्यावर वादग्रस्त करणाऱ्या मंत्र्यांचं बॉलिवूड अभिनेत्रीसोबत वाईट कृत्य, जाणून बसेल धक्का

Bollywood Actress: मंत्र्यांचं बॉलिवूड अभिनेत्रीसोबत वाईट कृत्य, कर्नल सोफिया कुरेशी यांच्यावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर मोठं सत्य समोर, जाणून तुम्हाला देखील बसेल मोठा धक्का..., सध्या सर्वत्र 'त्या' घटनेची चर्चा...

कर्नल सोफिया कुरेशी यांच्यावर वादग्रस्त करणाऱ्या मंत्र्यांचं बॉलिवूड अभिनेत्रीसोबत वाईट कृत्य, जाणून बसेल धक्का
फाईल फोटो
| Updated on: May 15, 2025 | 1:18 PM

Vijay Shah Video: मध्यप्रदेशचे मंत्री विजय शाह यांनी असं विधान केलं आहे, ज्यामुळे ते वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. विजय शाह यांनी ऑपरेशन सिंदूरनंतर ब्रिफिंग करणाऱ्या भारतीय कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. ज्यामुळे विजय शाह यांचं सर्वत स्तरातून टीकेचा सामना करावा लागक आहे. ही पहिली वेळ नाही जेव्हा विजय शाह यांनी एखाद्या महिलेसाठी अपशब्द वापरले आहे. जवळपास 4 वर्ष आधी प्रसिद्ध अभिनेत्रीने मंत्र्याची मागणी पूर्ण न केल्यामुळे त्यांनी शुटिंग थांबवली होती.

आपल्या अहंकारामुळे विजय शाह यांनी विद्या बालनच्या ‘शेरनी’ सिनेमाचं मध्यप्रदेशमध्ये चित्रीकरण थांबवले होतं. विजय शहा यांचे हे चार वर्षे जुने प्रकरण व्हायरल होत आहे. ज्यामुले विजय शहा वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता नाकारता येत नाही.

संबंधित प्रकरण 2020 मधील आहे, जेव्हा विजय शाह हे मुख्यमंत्री शिवराज चौहान यांच्या मंत्रीमंडळातील वन मंत्री होते. तेव्हा विद्या बालन एमपीच्या जंगलात ‘शेरनी’ सिनेमाचं शुटिंग करत होती. तेव्हा बालाघाटच्या जिल्हा वन अधिकाऱ्यांनी प्रॉडक्शन टीमच्या वाहनांना जंगलात प्रवेश करण्यापासून रोखलं होतं.

प्रॉडक्शन टीमला फक्त दोन वाहने नेण्याची परवानगी होती. रिपोर्टनुसार, विद्या बालनने विजय शाह यांच्यासोबत जेवण्यास नकार दिल्याने त्यांनी शूटिंग थांबवली होती. ज्यामुळे शाह चर्चेत आले होते. यावर त्यांनी स्पष्टीकरण देखील दिलं होतं.

विजय शाह म्हणाले होते, ‘ज्या लोकांनी माझ्याकडून शुटिंगसाठी परवानगी मागितली होती. त्या लोकांसाठी मी स्वतःला बालाघाट येथे उपस्थित होतो. त्यांनी स्वतः मला जेवणासाठी बोलावलं होतं. पण मी त्यांना नकार दिला…’

विद्या बालन स्टारर ‘शेरनी’ सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, सिनेमा जून 2021 मध्ये प्रदर्शित झालेला. सिनेमा मोठ्या पडद्यावर प्रदर्शित न होता थेट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेला. प्राईम व्हिडीओवर सिनेमा प्रदर्शित झाला आहे. सिनेमा प्रेक्षकांनी देखील भरभरुन प्रेम दिलं.

विद्या बालन हिने आतापर्यंत अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका बजावत चाहत्यांचं मनोरंजन केलं आहे. सोशल मीडियावर देखील अभिनेत्री कायम  सक्रिय  असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.