AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जादूई हास्याशिवाय ती काहीच बोलायची नाही…, दिग्दर्शकाने सांगितला माधुरीबाबतचा ‘तो’ किस्सा

Madhuri Dixit Birthday: 'या' दिग्दर्शकामुळे माधुरी दीक्षितच्या करीयरला मिळाली योग्य दिशा, दिग्दर्शक म्हणाला, 'जादूई हास्याशिवाय ती काहीच बोलायची नाही...', सध्या सर्वत्र माधुरी दीक्षित हिची चर्चा...

जादूई हास्याशिवाय ती काहीच बोलायची नाही..., दिग्दर्शकाने सांगितला माधुरीबाबतचा 'तो' किस्सा
फाईल फोटो
| Updated on: May 15, 2025 | 12:34 PM
Share

अभिनेत्री माधुकी दीक्षित हिचा आज वाढदिवस आहे. माधुरीला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. कारण अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत अभिनेत्रीने चाहत्यांच्या मनात स्वतःचं राज्यं निर्माण केलं आहे. माधुरीच्या कारकिर्दीला पुढे नेण्यात सुभाष घई यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. अभिनेत्रीचा पहिला “अबोध” सिनेमा फ्लॉप झाल्यानंतर, सुभाष घई यांनी त्यांना “राम लखन” मध्ये एका नवीन चेहऱ्याच्या भूमिकेत घेतले, जो खूप हिट झाला. यानंतर माधुरीने इतर अनेक यशस्वी सिनेमांमध्येही काम केले.

अशात आज माधुरीचा वाढदिवस असल्यांमुळे सुभाष घई यांनी अभिनेत्रीचं कौतुक केलं आहे. माधुरी माझा गर्व आहे असं घई म्हणाले आहेत… ‘मी माधुरीला ‘अबोध’ सिनेमापासून ओळखत आहे. त्यामुळे तिच्याबद्दल लिहिणं फार कठीण आहे. यश न मिळाल्यानंतर तिने सिनेमांमध्ये छोट्या भूमिकांमध्ये काम करायला सुरुवात केली, तेव्हा एके दिवशी तिच्या हेअर ड्रेसर खातूनने मला काश्मीरमध्ये तिच्या चित्रीकरणादरम्यान भेटायला सांगितले, जिथे मी कर्मासाठी रेकीसाठी गेलो होतो.’

जेव्हा मी तिला तिच्या आई आणि खातूनसोबत जेवणासाठी भेटलो तेव्हा मला ती सिनेमामध्ये काम करण्यासाठी मला खूपच निरागस वाटली पण तिचा चेहरा मला सुचित्रा सेनची आठवण करून देत होता. सुचित्रा सेन म्हणजे प्रसिद्ध बंगाली अभिनेत्री… तिनं बोलावं असं मला वाटत होतं पण ती काहीच बोलली नाही. तिच्या चेहऱ्यावरील जादुई हास्य उत्तर देत होतं.

पुढे घई म्हणाले, ‘1984 मध्ये काश्मीर येथे शुट करत असताना मला एका डान्सरची गरज होती. सिनेमा जॅकी आणि श्रीदेवी यांच्या चित्रित होता. तेव्हा मी कोरिओग्राफर सरोज खान यांना फोन केला. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता मला सांगितलं एक डान्सर आह पण ती लोकप्रिय नाही. ती माधुरी होती… मला लगेच तिचा चेहरा आठवला आणि मी तिच्या आईला फोन केला की जर ते काश्मीरला एका छोट्या भूमिकेसाठी येऊ शकत असतील तर, त्यांनी देखील होकार दिला आणि दुसऱ्या दिवशी माधुरी माझ्या सेटवर चित्रीकरण करत होती.

सेटवर एक लोकल मुलगी माझा सहाय्यक दिग्दर्शक राजू फारूकीसोबत डान्स करत होती. पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण टीमने माधुरीसाठी टाळ्या वाजवल्या. आणि तोच क्षण माधुरीच्या करीयरला कलाटणी देणारा ठरला. ती पुढील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.. हे मला तेव्हाच कळलं होतं.

‘राम लखन, प्रेम दिवाने, आणि खलनायक या 3 सिनेमांसाठी मी माधुरीला मुख्य भूमिकेत साईन केल्यापासून माझं तिच्याशी खूप गुंतागुंतीचे नातं आहे. त्यानंतर आमच्यात एक अद्भुत गुरुशिष्य नाते निर्माण झालं आणि कालांतराने आम्ही मित्र झालो. अखेर आजपर्यंत कुटुंबातील मित्र बनलो.

एक मोठी स्टार, एक परिपक्व महिला, दोन सुंदर मुलांची आई आणि एक समर्पित पत्नी असूनही, ती अजूनही निरागस आहे. आजही महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी माधुरी इतरांच्या सल्ल्यावर अवलंबून आहे. ती जे काही करते ते मूल्ये आणि वचनबद्धतेने करते.

मला आजही तिचा अभिमान आहे, माझी सर्वात चांगली विद्यार्थिनी म्हणून, एक मैत्रीण म्हणून आणि दोन कुटुंबांसारखे परस्पर प्रेम आणि आदर असलेले कुटुंब म्हणून… असं म्हणत सुभाष घई यांनी बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरीचं कौतुक केलं आहे.

पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप
पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप.
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा.
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही.
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब.
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत.
शिंदे साहेब जी जबाबदारी देतील, ती...; बांगर यांनी स्पष्ट केली भूमिका
शिंदे साहेब जी जबाबदारी देतील, ती...; बांगर यांनी स्पष्ट केली भूमिका.
नाशिकमध्ये भाजपविरोधात शिंदे शिवसेना, दादांची राष्ट्रवादी एकत्र?
नाशिकमध्ये भाजपविरोधात शिंदे शिवसेना, दादांची राष्ट्रवादी एकत्र?.
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य.
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक.
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला.