Kangana Ranaut यांच्या घरात वाजणार सनई चौघडे, साखरपुड्याचे फोटो पोस्ट करत म्हणाल्या, ‘लग्नाची घाई…’

Kangana Ranaut | कंगना रनौत यांच्या कुटुंबात आनंदाचं वातावरण... अनेक वर्षांनंतर घरात वाजणार सनई चौघडे, साखरपुड्याचे फोटो पोस्ट करत म्हणाल्या, 'लग्नाची घाई...', सोशल मीडियावर सध्या फक्त आणि फक्त कंगना यांनी पोस्ट केलेल्या फोटोंची चर्चा...

Kangana Ranaut यांच्या घरात वाजणार सनई चौघडे, साखरपुड्याचे फोटो पोस्ट करत म्हणाल्या, लग्नाची घाई...
कंगना रनौत
| Updated on: Jun 15, 2024 | 9:14 AM

अभिनेत्री आणि मंडीच्या खासदार कंगना रनौत कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. कंगना त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक छोटी-मोठी गोष्ट सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर करत असतात. आता देखील एक मोठी गोष्ट कंगना यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांपर्यंत पोहोचवली आहे. कंगना यांच्या घरात सध्या आनंदाचं वातावरण आहे. कंगना यांच्या घरात लवकरच सनई चौघडे वाजणार आहे. कंगना यांनी साखरपुड्याचे काही फोटो देखील सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

सांगायचं झालं तर, कंगना रनौत नुकताच कुटुंबातील एका कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. कार्यक्रमाचे फोटो देखील कंगना यांनी सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. कंगना रनौत यांचा लहान भाऊ लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. कंगना यांनी भावाच्या साखरपुड्याचे फोटो पोस्ट करत खास कॅप्शन देखील दिलं आहे. सोशल मीडियावर देखील कंगना यांनी पोस्ट केलेले फोटो तुफान व्हायरल होत आहेत.

कंगना यांनी भावाच्या साखारपुड्याचा फोटो पोस्ट करत कॅप्शनमध्ये, ‘भाई तुझं तर काम झालं आता… सर्वात लहान आहे, पण लग्न सर्वात आधी…’ असं लिहिलं आहे. कंगना यांनी कुटुंबियांसोबत देखील काही फोटो पोस्ट केले आहेत. कंगना यांनी भावाच्या साखरपुड्यासाठी एक साधा पण सुंदर लूक करण्याचा निर्णय घेतला. अभिनेत्रीने गोल्डन बॉर्डर असलेला पांढरा रंगाचा लेहेंगा सेट केला होता. सिंपल लूकमध्ये देखील कंगना सुंदर दिसत होत्या…

 

सांगायचं झालं तर, कंगना रनौत अशा सेलिब्रिटींपैकी एक आहेत, ज्या कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. शिवाय अनेक वादग्रस्त कारणांमुळे देखील कंगना चर्चेत असतात. एवढंच नाही तर, अनेक मुद्द्यांवर देखील कंगना स्वतःचं परखड मत मांडतात.

भाजपच्या वतीने अभिनेत्री हिमाचल प्रदेशातील मंडी मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवत विजय मिळवलेल्या अभिनेत्री आणि खासदार कंगना रनौत कायम वादग्रस्त कारणांमुळे चर्चेत असतात. बॉलिवूडमध्ये स्वतःची भक्कम ओळख निर्माण केल्यानंतर कंगना यांनी आता स्वतःचा मोर्चा राजकारणाकडे वळवला आहे.

सोशल मीडियावर देखील कंगना कायम सोशल मीडियावर सक्रिय असतात. सोशल मीडियावर देखील त्यांनी फॉलो करणाऱ्यांची संख्या फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहाण्यासाठी कंगना देखील स्वतःच्या कामांची अपडेट सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांपर्यंत पोहोचवत असतात.