AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘गदर 2′ गटारात गेला असता जर…’, अमीषा पटेलने सनी देओल यांच्याबद्दल केला मोठा खुलासा

Ameesha Patel on Gadar 2 : 'गदर 2' गटारात गेला असता जर...', प्रदर्शनाच्या 10 महिन्यानंतर अमीषा पटेल हिने केला मोठा खुलासा, 'गदर 3' बद्दल देखील अभिनेत्री म्हणाली..., सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्रीने केलेल्या वक्तव्याची चर्चा... असं का म्हणाली अभिनेत्री?

'गदर 2' गटारात गेला असता जर...', अमीषा पटेलने सनी देओल यांच्याबद्दल केला मोठा खुलासा
| Updated on: Jun 15, 2024 | 8:16 AM
Share

अभिनेते सनी देओल आणि अभिनेत्री अमीषा पटेल स्टारर ‘गदर 2’ सिनेमा 11 ऑगस्ट 2023 रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला होता. सिनेमात सनी यांच्यासोबत अमीषा मुख्य भूमिकेत दिसली. सिनेमाने बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई देखील केली. आज देखील सिनेमाचे काही सीन सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. पण सिनेमा प्रदर्शित झाल्याच्या 10 महिन्यांनंतर अमीषा पटेल हिनं मोठं वक्तव्य केलं आहे. अमिषाने सिनेमाशी संबंधित असे काही दावे केले आहेत जे आश्चर्यचकित करणारे आहेत. अभिनेत्रीच्या मते सिनेमात काही बदल केले नसते तर हा ब्लॉकबस्टर नाहीतर, गटारात गेला असता.

सांगायचं झालं तर, सिनेमाचं दिग्दर्शन दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी केलं होतं. सिनेमा प्रदर्शित होत असताना अमीषा हिने दिग्दर्शकावर अनेक गंभीर आरोप लावले होते. आता देखील अमीषा हिने आश्चर्यचकित करणारे दावे केले आहेत. आम्ही सिनेमात गेस्ट दिग्दर्शक होतो.. असं अभिनेत्री म्हणाली आहे..

‘सिनेमा ज्याप्रकारे प्रेक्षकांच्या भेटीस आला त्यासाठी सिनेमात सनी आणि मी मिळून अनेक गोष्ट योग्य आणि बदल केले आहेत.’ नुकताच झालेल्या एका मुलाखतीत अमीषा हिला ‘गदर 3’ मध्ये काम करणार का? असा प्रश्न देखील विचारण्यात आला.

प्रश्नाचं उत्तर देत अभिनेत्री म्हणाली, ‘मला गरद 3 सिनेमात काम करण्याती संधी मिळाली तर, माझ्या काही अटी असतील. याचं कारण म्हणजे सनी आणि मला अनेक प्रकारच्या रचनात्मक अस्वस्थतेचा सामना करावा लागला. आम्ही दोघांनी भरपूर एडिटिंग, री-शूटिंग केले आणि आमच्या दिग्दर्शकासोबत खूप वाद देखील झाले…’

‘जेणेकरून गदर ब्रँड मोठ्या पडद्यावर उत्तम प्रकारे यावा अशी आमची इच्छा होती. सनी आणि मी सिनेमाचे अर्धे दिग्दर्शक होतो.’ यावेळी बिझनेस पार्टनर कुणाल घूमर याला श्रेय देत अभिनेत्री म्हणाली, ‘कुणाल याने सनीला सांगितलं अनेक गोष्टी चुकीच्या झाल्या आहेत. म्हणून जेव्हा सीन शेड्यूल होईल तेव्हा सर्व काही योग्यप्रकारे करुन घेशील… ज्यामुळे सनी सतर्क झाला…’ असं देखील अभिनेत्री म्हणाली.

सांगायचं झालं तर, दिग्दर्शक अनिल शर्मा यांच्या ‘गदर 2’ सिनेमात सनी देओल आणि अमिषा पटेलसोबत उत्कर्ष शर्माही महत्त्वाच्या भूमिकेत होता. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला. रिपोर्ट्सनुसार, 80 कोटी रुपयांमध्ये बनलेल्या या सिनेमाने जगभरात जवळपास 686 कोटींचा गल्ला जमा केला.

फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.