कंगना रणौत यांचं 3 कृषी कायद्यांवर वादग्रस्त वक्तव्य, भाजपच्या प्रवक्त्यांकडून अभिनेत्रीला इशारा

Kangana Ranaut on Three Agriculture Law: 3 कृषी कायद्यांवर वादग्रस्त वक्तव्य कंगना रणौत यांना भोवलं..., भाजपच्या प्रवक्त्यांकडून अभिनेत्रीला थेट इशारा... कंगना रणौक कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे असतात वादाच्या भोवऱ्यात

कंगना रणौत यांचं 3 कृषी कायद्यांवर वादग्रस्त वक्तव्य, भाजपच्या प्रवक्त्यांकडून अभिनेत्रीला इशारा
Kangana Ranaut
| Updated on: Sep 25, 2024 | 12:06 PM

भाजपच्या लोकसभा खासदार कंगना रणौत कायम त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. आता देखील असंच काही झालं आहे. कंगना रणौत यांनी काही दिवसांपूर्वी तीन कृषी कायद्यांची पुनर्स्थापना करण्याची मागणी केली होती. पण भारतीय जनता पक्षाने आम्ही कंगना यांच्या वक्तव्याशी सहमत नसल्याचं स्पष्ट केलं आहे. शिवाय भाजपने कृषी कायद्यावर वक्तव्य करण्याता अधिकार कंगना यांना दिलेला नाही… असं देखील स्पष्ट केलं आहे. ज्यामुळे कंगना पुन्हा वादाच्या भोवऱ्यात अडकल्या आहेत.

भाजपचे प्रवक्ता गौरव भाटिया यांनी एक्सवर एक व्हिडीओ पोस्ट करत स्पष्टीकरण दिलं आहे. ‘केंद्र सरकारने मागे घेतलेल्या कृषी विधेयकांबाबत भाजप खासदार कंगना रणौत यांचं वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पण कंगना यांचे हे वैयक्तिक मत आहे… हे याठिकाणी मला स्पष्ट करायचं आहे.’

पुढे गौरव भाटिया म्हणाले, ‘संबंधित मुद्द्यावर भाजपकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्याचा अधिकार कंगना यांना नाही. त्यांचं मत कृषी विधेयकांबाबत भाजपचं मत दर्शवत नाही…’ असं देखली भाटिया म्हणाले. महत्त्वाचं म्हणजे, यावर देखील कंगना यांनी स्वतःच मत मांडलं आहे.

 

 

गौरव भाटिया यांचा व्हिडीओ पोस्ट करत कंगना म्हणाल्या, ‘नक्कीच…, कृषी कायद्यांबाबत माझे मत वैयक्तिक आहे आणि ते पक्षाच्या भूमिकेचं प्रतिनिधित्व करत नाही.’, सांगायचं झालं तर, मंगळवार, 24 सप्टेंबर रोजी हिमाचल प्रदेशातील मंडी येथील भाजप खासदार कंगना रणौत यांनी शेतकऱ्यांच्या दीर्घ आंदोलनानंतर मागे घेण्यात आलेले तीन कृषी कायदे सरकारने परत लागू करावेत… असं वक्तव्य करत वाद निर्माण केला होता.

काय म्हणाल्या होत्या कंगना रणौत?

माध्यमांसोबत बोलतना कंगना म्हणाल्या, ‘माझं हे वक्तव्य वादग्रस्त असू शकतं याची मला कल्पना आहे. पण कृषी कायदे लागू करायला हवेत. शेतकऱ्यांनी स्वतः अशी मागणी करायला हवी. शेतकरी हा देशाच्या विकासाचा आधारस्तंभ आहे. मला त्यांना आवाहन करायचे आहे की त्यांनी स्वतःच्या हितासाठी कायदे परत आणावेत.’ असं देखील कंगना म्हणाल्या होत्या.

 

 

दरम्यान, कंगना यांनी कृषी कायद्याबद्दल केलेलं वक्तव्य मागे घेतलं आहे. कंगना यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करत स्वतःते शब्द मागे घेतले आहे. ‘कृषी कायदे विषयात मी माझ्या पक्षाच्या बाजूने उभी आहे… जय हिंद…’ असं कॅप्शन कंगना यांनी व्हिडीओला दिलं आहे.