19 वर्षीय मोलकरणीवर बलात्कार, 7 वर्ष भोगला तुरुंगवास, आता ‘तो’ अभिनेता विकतोय कपडे

Bollywood Handsome Hunk Hero: अभिनेता आज करत असता बॉलिवूडवर राज्य, पण 19 वर्षीय मोलकरणीवर बलात्कार केला आणि संपवलं सर्वकाही, 7 वर्षांचा तुरुंवास भोगल्यानंतर अभिनेता विकतोय कपडे

19 वर्षीय मोलकरणीवर बलात्कार, 7 वर्ष भोगला तुरुंगवास, आता तो अभिनेता विकतोय कपडे
फाईल फोटो
| Updated on: Oct 30, 2025 | 2:46 PM

Bollywood Handsome Hunk Hero: बॉलिवूडमध्ये पदार्पण करणं… स्वतःच्या बळावर इंडस्ट्रीमध्ये आणि चाहत्यांच्या मनावर राज्य करणं… हे फार कमी लोकांच्या नशिबात आलं आहे. पण एक असा अभिनेता आहे, ज्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण करताच चाहत्यांच्यां मनावर राज्य केलं. पण एक चुकीमुळे अभिनेत्याचे आयुष्य उद्ध्वस्त झालं. आज अभिनेता कपडे विकण्याचं काम करत आहे. सांगायचं झालं. अभिनेता शाहरुख खान याचा लेक आर्यन खान दिग्दर्शित ‘द बॅड्स ऑफ बॉलिवूड’ सीरिजच्या माध्यमातून अभिनय विश्वात पुन्हा पदार्पण करणाऱ्या रजत बेदी यांच्यासोबत देखील असंच झालं आहे.

हिंदी चित्रपटांमध्ये काम मिळत नसल्याने त्याने इंडस्ट्री सोडली आणि आता परदेशात जाऊन रिअल इस्टेटमध्ये काम करू लागला. रजत बेदी व्यतिरिक्त, आज इंडस्ट्रीमध्ये असे अनेक स्टार आहेत ज्यांनी एकेकाळी शोबिझमध्ये यशाची चव चाखली होती आणि नंतर त्यांना काम मिळणं बंद झालं किंवा वादांमुळे त्यांचे करिअर संपलं.

या यादीत अभिनेता शायनी आहुजा याचाही समावेश आहे. बॉलीवूड स्टार अक्षय कुमारच्या भूल भुलैया आणि आमिर खानच्या फना या सिनेमांमधील कामासाठी अभिनेत्याला कौतुकाची थाप मिळवली आहे. आता, या अभिनेत्याने इंडस्ट्रीला निरोप दिला आहे. शायनी आता कुठे आहे आणि तो काय करत आहे.. याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे.

शायनी याचं करीयर संपण्याचं कारण म्हणजे, त्याच्यावर लागलेले बलात्काराचे आरोप. बलात्काराच्या खटल्यात अभिनेत्याने सात वर्षे तुरुंगात घालवली. यशाच्या उच्च शिखरावर पोहोचलेल्या अभिनेत्याचं करीयर 2009 मध्ये संपलं. 19 वर्षीय मोलकरणीवर बलात्कार, अपहरण आणि धमकी देण्याच्या आरोपाखाली त्याला अटक करण्यात आली. काही महिन्यांनंतर त्याला दिल्ली सोडू नये या अटीवर जामीन मंजूर करण्यात आला. तरुणीने काही काळानंतर तक्रार मागे घेतली.पण 2011 मध्ये मुंबईतील न्यायालयाने शायनीला दोषी ठरवले आणि त्याला सात वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली.

यानंतर, शायनीने या आदेशाविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयात अपील केलं आणि अभिनेत्याची अपील स्वीकारण्यात आली, त्यानंतर अभिनेत्याला जामीन मिळाला. 2003 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने त्याला 10 वर्षांसाठी पासपोर्ट नूतनीकरण करण्याची परवानगी दिली. एक्सवरील एका पोस्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, शायनी आता फिलीपिन्समध्ये स्थायिक झाला आहे आणि तिथे कपड्यांचा व्यवसाय करत आहे.