Mahima Chaudhari ने थाटलाट दुसरा संसार? पण त्याआधी खेळाडूकडून फसवणूक, सिक्रेट लग्न आणि..
Mahima Chaudhary Love Life : महिमाची प्रसिद्ध खेळाडूकडून फसवणूक, भावाच्या मित्रासोबत सिक्रेट लग्न, लग्नाआधी प्रेग्नेंट आणि..., खडतर प्रवासानंतर महिमाने वयाच्या 52 व्या वर्षी थाटलाय दुसरा संसार

Mahima Chaudhary Love Life : अभिनेत्री महिमा चौधरी गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूडपासून दूर आहे. पण आता अभिनेत्री तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. सध्या महिमा हिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये महिमा नव्या नवरीच्या रुपात दिसत आहे. अशात वयाच्या 52 व्या वर्षी अभिनेत्रीने दुसरा संसार थाटला का? असा प्रश्न अनेकांनी निर्माण केला. पण असं काहीही नाही. लवकरच महिमा ‘दुर्लभ प्रसाद की दुसरी शादी’ सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. सध्या अभिनेत्री सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.
सध्या महिला हिच्या दुसऱ्या लग्नाची चर्चा सुरु आहे. पण अभिनेत्रीच्या खासगी आयुष्याबद्दल फार कोणाला माहिती नाही. प्रसिद्ध खेळाडूसोबत ब्रेकअप, त्यानंतर भावाच्या मित्रासोबत केलेलं लग्न देखील जास्त काळ टिकलं नाही. आता अभिनेत्री मुलीसोबत आनंदी आयुष्या जगत आहे.
View this post on Instagram
महिमा चौधरी आणि टेनिसपटू लिएंडर यांचं रिलेशनशिप
यशाच्या उच्च शिखरावर असताना अभिनेत्री टेनिसपटू लिएंडर पेस यांच्या प्रेमात पडली. आपल्या आयुष्यातील खास व्यक्ती म्हणून महिमा टेनिसपटू लिएंडर पेस यांना पाहत होती. पण लिएंडर पेस यांनी अभिनेत्रीची फसवणूक करुन मॉडेल रिया पिल्लई हिला डेट करण्यास सुरुवात केली. अशात महिमा हिने खेळाडूसोबत असलेलं नातं संपवलं…
भावाच्या मित्रासोबत सिक्रेट लग्न
लिएंडर याच्यासोबत घटस्फोट झाल्यानंतर महिमा हिने भावाचा मित्र बॉबी मुखर्जी याच्यासोबत लग्न केलं. बॉबी आणि महिमा यांची ओळख एका कार्यक्रमात झाली. त्यानंतर पहिल्या भेटीचं रुपांतर प्रेमात झालं. त्यानंतर 19 मार्च 2006 मध्ये बॉबी आणि महिमा यांनी गुपचूप लग्न केलं.
महिमा हिने लग्नानंतर वैवाहिक आयुष्य कायम लपवून ठेवलं. पण प्रेग्नेंट राहिल्यानंतर बेबीबम्प समोर आल्यानंतर अभिनेत्रीला सिक्रेट लग्नाबद्दल सांगावं लागलं… लग्नानंतर 2007 मध्ये महिमा हिने मुलीला जन्म दिला. पण मुलीच्या जन्मानंतर देखील महिमा आणि बॉबी यांचं नातं फार काळ टिकलं नाही…
लग्नाच्या काही वर्षात महिमा आणि बॉबी यांच्यामध्य खटके उडू लागले. अखेर दोघांनी 2013 मध्ये विभक्त होण्याचा निर्णय घेतला. पतीपासून विभक्त झाल्यानंतर अभिनेत्रीने कधीच दुसऱ्या लग्नाचा विचार केला नाही. आज महिमा लेकीसोबत आनंदी आयुष्य जगत आहे. महिला मुलीसोबत फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर पोस्ट करत असते.
