30 रुपयांसाठी पेट्रोल पंपावर कॉफी विकायची ‘ही’ अभिनेत्री, खडतर प्रवास, पण जिंकले 5 राष्ट्रीय पुरस्कार
Bollywood Actress Life : आई अभिनेत्री असताना देखील 'या' अभिनेत्रीने पेट्रोल पंपवर विकलीये कॉफी, फक्त 30 रुपयांसाठी करायची काम, खडतर होता प्रवास, पण जिंकले 5 राष्ट्रीय पुरस्कार

Bollywood Actress Life : बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी स्वतःच्या बळावर झगमगत्या विश्वात स्वतःचं स्थान निर्माण केलं आहे. अशाच अभिनेत्रींपैकी एक म्हणजे अभिनेत्री शबाना आझमी… शबाना आझमी यांनी आतापर्यंत अनेक सिनेमांमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. आज देखील त्या बॉलिवूडमध्ये सक्रिय आहेत. पण त्याच्या या प्रवासाबद्दल फार कमी लोकांना माहिती असेल. बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी शबाना आझमी यांनी 30 रुपयांसाठी पेट्रोल पंपवर कॉफी देखील विकली आहे.
आई वडील कलाविश्वात सक्रिय असताना देखील त्यांनी खडतर मार्गाचा स्वीकार केला. शबाना आझमी यांच्या आई वडिलांबद्दल सांगायचं झालं तर, त्यांचे वडील कैफी आझमी प्रसिद्ध शायर आणि आई शौकत आझमी अभिनेत्री होत्या…
सांगायचं झालं तर, लहानपणापासून शबाना आझमी यांनी काम करण्यास सुरुवात केली. कॉलेजमध्ये प्रवेश करण्यापूर्वी त्यांनी तीन महिने पेट्रोल पंपवर कॉफी विकली आणि रोजचे 30 रुपये कमावले… पण कधीच आई – वडिलांकडून पैसे मागितले नाहीत… शौकत यांचे आत्मचरित्र, “कैफ अँड आय मेमॉयर्स” मध्ये शबाना यांच्य आयुष्यातील काही महत्त्वाचे आणि न सांगितलेले पैलू उलगडले आहेत.
पुस्तकात लिहिल्यानुसार, ‘सिनियर केंब्रिजमध्ये प्रथम श्रेणी मिळवल्यानंतर, शबाना यांनी कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यापूर्वी तीन महिने पेट्रोल पंपावर ब्रू कॉफी विकली आणि दिवसाला 30 रुपये कमावले. पण शबाना हिने कधीच मला याबद्दल सांगितलं नाही… मी रिहर्सलमध्ये इतकी व्यस्त असायचे की मला तीची अनुपस्थिती लक्षात आलीच नाही. एके दिवशी तिने मला सर्व पैसे माझ्याकडे दिले आणि मी तिला विचारले, तिने सांगितलं, ‘माझ्याकडे तीन महिन्यांचा वेळ होता, त्याचा उपयोग मी कॉफी विकून केला.’ असं शबाना आझमी यांच्या आईच्या आत्मचरित्रात लिहिलं आहे.
शबाना आझमी यांचं करीयर
शबाना यांनी 1974 मध्ये अंकुर या सिनेमातून बॉलिवूड पदार्पण केलं, पदार्पणासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कारने सन्मानित करण्यात आलं. त्यानंतर त्यांनी “अर्थ,” “पार,” आणि “गॉडमदर” सारख्या सिनेमांमध्ये काम केलं आणि पाच राष्ट्रीय पुरस्कार जिंकले.
शबाना आझमी यांचं करीयर
शबाना आझमी यांनी 1984 मध्ये प्रसिद्ध संगीतकार जावेद अख्तर यांच्यासोबत लग्न केलं. पण त्यांना कधीच आई होण्याचं सुख अनुभवता आलं नाही. एवढंच नाही तर, लहानपणी त्यांनी दोनवेळा स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला. पण कायम त्यांनी स्वतःला संभाळलं.
