
बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू होते. आता त्यांना डिस्चार्ज देण्यात आले असून त्यांच्यावर घरी उपचार सुरू आहेत. हेमा मालिनी, ईशा देओल, बॉबी देओल सर्वजण यादरम्यान रूग्णालयात उपस्थित होते. धर्मेंद्र यांच्या तब्येतीबद्दल कळताच अनेक बॉलिवूड कलाकारांनी रूग्णालयात धाव घेतली. धर्मेंद्र यांच्या निधनाची अफवा पसरताना दिसली. ज्यानंतर हेमा मालिनी आणि ईशा देओल यांनी संताप व्यक्त करत सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली. धर्मेंद्र यांना संक्रमण होण्याची शक्यता अधिक असल्याने कुटुंबियांनी सर्वांना विनंती केली की, त्यांना भेटण्यासाठी कोणीही येऊ नये. बुधवारी संध्याकाळी ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन जुहूमध्ये गाडी चालवताना दिसले. धर्मेंद्र यांच्या घराजवळ अमिताभ बच्चन स्पॉट झाले.
धर्मेंद्र मागील काही दिवसांपासून आजारी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ब्रीच कँडी रुग्णालयात ते दाखल होते. मात्र, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला असून त्यांच्यावर घरी उपचार सुरू आहेत. त्यांच्या जुहू बंगल्यात परतले आहेत जिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अमिताभ बच्चन धर्मेंद्र यांच्या जुहू बंगल्याच्या परिसरात स्पॉट झाले. यामुळे अमिताभ बच्चन हे धर्मेंद्र यांना भेटण्यासाठी आल्याचे सांगितले जातंय. अमिताभ बच्चन यांना पाहिल्यावर धर्मेंद्र यांच्या घराजवळ मोठी गर्दी जमली.
विशेष म्हणजे अमिताभ बच्चन स्वत:च गाडी चालवत आले होते. अमिताभ बच्चन यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हिरवे जॅकेट आणि टोपी घालून इलेक्ट्रिक कार चालवताना अमिताभ बच्चन दिसले. अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्र यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलंय. दोघांची जोडी चांगलीच फेमस होती. दोघांमध्ये खास मैत्री होती. अमिताभ बच्चन मित्रांच्या भेटीला पोहोचल्याचे सांगितले जातंय.
जय आणि वीरूची जोडी हिट झाली. अमिताभ आणि धर्मेंद्र यांनी गुड्डीमध्येही एकत्र काम केले. असंख्य चित्रपटात दोघांनी एकत्र काम केले. मागील काही दिवसांपासून धर्मेंद्र यांच्या तब्येतीमध्ये चढउतार बघायला मिळतोय. मध्यंतरी धर्मेंद्र यांची तब्येत नाजूक असल्याचे सांगितले गेले. यादरम्यानच्या काळात त्यांचे सर्व सहा मुले त्यांच्यासोबत आहेत. ईशा देओल, सनी देओल आणि बॉबी देओलचे हॉस्पिटलमध्ये जातानाचे अनेक व्हिडीओ पुढे आली.