Arjun Kapoor याच्या कुटुंबातील जवळच्या सदस्याचं निधन; भावना व्यक्त करत म्हणाला…
Arjun Kapoor याच्या कुटुंबातील जवळच्या सदस्याने घेतला अखेरचा श्वास; अभिनेत्यावर कोसळला दुःखाचा डोंगर... सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत अभिनेता म्हणाला...

मुंबई : 15 सप्टेंबर 2023 | अभिनेता अर्जुन कपूर कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. आता देखील अभिनेता एका महत्त्वाच्या कारणामुळे चर्चेत आला आहे. अर्जुन कपूर यांच्या कुटुंबातील जवळच्या सदस्याचं निधन झालं आहे. अभिनेत्याने एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर करत दुःख व्यक्त केलं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अर्जुन कपूर यांच्या सोशल मीडिया पोस्टची चर्चा सुरु आहे. अर्जुन कपूर याच्या पाळीव कुत्र्याने अखेरचा श्वास घेतला आहे. अभिनेत्याच्या पाळीव कुत्र्यांचं नाव मॅक्स असं होतं. मॅक्सच्या आठवणीत अर्जुन याने त्याच्यासोबत काही फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत भावना व्यक्त केल्या आहेत. काही फोटोंमध्ये अभिनेत्याची बहीण अंशूला कपूर देखील दिसत आहे.
पोस्ट शेअर करत अभिनेता म्हणाला, ‘जगातील सर्वात चांगला मुलगा… माझा मॅक्सिमस… सर्वात दयाळू, गोड, हुशार… प्रामाणिक… मला तुझी खूप आठवण येत आहे बच्चा.. घर आता पूर्वी प्रमाणे राहणार नाही… तू मला आणि अंशुला हिला जे प्रेम दिलं, त्यासाठी आभारी आहे… तू कायम चांगल्या – वाईट प्रसंगी आमच्यासोबत होतास… स्वतःची काळजी घे…’ असं देखील अर्जुन कपूर म्हणाला…
View this post on Instagram
सध्या अभिनेत्याची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. एवढंच नाही तर, सोशल मीडियावर चाहते आणि सेलिब्रिटी देखील अभिनेत्याच्या पोस्टवर लाईक आणि कमेंट करत दुःख व्यक्त करत आहेत. अंशुला कपूर हिने देखील भावाच्या पोस्टवर कमेंट करत दुःख व्यक्त केलं आहे.
अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांच्या नात्याची चर्चा…
अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. अभिनेता अरबाज खान याच्यासोबत घटस्फोट झाल्यानंतर मलायका हिच्या आयुष्यात अर्जुन कपूर याची एन्ट्री झाली. अर्जुन आणि मलायका यांच्यामध्ये वयाचं अंतर असल्यामुळे देखील दोघांना अनेकांनी ट्रोल केलं. पण अर्जुन आणि मलायका यांनी फक्त त्यांच्या भावनांना अधिक महत्त्व दिलं.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून अर्जुन आणि मलायका यांच्या ब्रेकअपच्या चर्चांना उधाण आलं आहे. पण दोघांनी देखील यावर अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. सोशल मीडिया स्टार कुशा कपिला हिला डेट करत असल्यामुळे मलायका हिच्यासोबत अर्जुन याचं ब्रेकअप झालं अशी चर्चा रंगत आहे. पण कुशा हिने रंगऱ्या सर्व चर्चा फक्त अफवा असल्याचं सांगितलं आहे.
