धर्मेंद्र यांच्या प्रकृतीत सुधारणा, कुटुंबियांची मोठी विनंती, आता अभिनेत्यावर घरूनच…

Dharmendra Health Updates : बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र यांच्यावर मुंबईतील रूग्णालयात उपचार सुरू होते. आता त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. पुढील उपचार त्यांच्यावर घरीच केली जातील. धर्मेंद्र यांच्या कुटुंबियांनी नुकताच मोठी विनंती केली आहे.

धर्मेंद्र यांच्या प्रकृतीत सुधारणा, कुटुंबियांची मोठी विनंती, आता अभिनेत्यावर घरूनच...
Dharmendra
| Updated on: Nov 12, 2025 | 9:56 AM

बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र यांच्यावर मुंबईतील रूग्णालयात उपचार सुरू होते. आज त्यांना डिस्चार्ज देण्यात आला असून त्यांच्यावर पुढील उपचार घरीच सुरू राहणार आहेत. अभिनेत्याच्या तब्येतीबद्दल विविध चर्चा सुरू होत्या. काल सकाळी धर्मेंद्र यांच्या निधनाची अफवा पसरली आणि एकच खळबळ उडाली. ईशा देओल आणि हेमा मालिनी यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत संताप व्यक्त केला आणि धर्मेंद्र यांच्या तब्येतीत सुधार होत आहे. त्यामध्येच आज धर्मेंद्र यांना डिस्चार्ज देण्यात आला. धर्मेंद्र यांच्या डिस्चार्जवेळी बॉबी देओल रूग्णालयात उपस्थित होता. गेल्या अनेक दिवसांपासून ब्रीच कँडी रुग्णालयात धर्मेंद्र यांना दाखल केले होते.

धर्मेंद्र यांच्या चाहत्यांसाठी आनंदाची बाब समोर आलीये.  कुटुंबाच्या प्रार्थनांचा परिणाम झाला असून धर्मेंद्र यांच्या तब्येतीत सुधारणा झाली आहे.  त्यांच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा झाल्यानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सकाळी सुमारे 7:30 वाजता धर्मेंद्र यांना ब्रीच कँडी रुग्णालयातून सुटी देण्यात आली. कुटुंबाने पुढील उपचार घरूनच करण्याचा निर्णय घेतल्याने त्यांना सकाळी पूर्णपणे बंद अॅम्ब्युलन्समधून घरी नेण्यात आले.

डिस्चार्ज होण्यापूर्वी त्यांचा मुलगा बॉबी देओल रुग्णालयात पोहोचला होता. सध्या धर्मेंद्र आपल्या घरी असून त्यांची तब्येत हळूहळू सुधारत आहे. सकाळीच बॉबी देओलही रुग्णालयातून बाहेर पडताना दिसले. आता त्यांचे वडील धर्मेंद्र सुरक्षितपणे घरी परतले आहेत. गेल्या काही दिवसांपासून आरोग्याच्या तक्रारींमुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र सोमवारी त्यांच्या तब्येतीत अचानक बिघाड झाल्याने कुटुंबातील सदस्य वारंवार रुग्णालयात ये-जा करत होते.

अखेर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर धर्मेंद्र यांना बुधवारी सकाळी रुग्णालयातून सुटी देण्यात आली असून पुढील उपचारांसाठी त्यांना घरी नेण्यात आले आहे. यादरम्यान धर्मेंद्र यांच्या कुटूंबियांकडून अधिकृत निवेदन जारी करण्यात आलंय. निवेदनात सांगण्यात आले की, धर्मेंद्र यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून ते आता घरीच विश्रांती घेत उपचार सुरू ठेवणार आहेत.

आम्ही विनंती करतो की माध्यमांनी आणि जनतेने त्यांच्या कुटुंबाच्या गोपनीयतेचा आदर करावा आणि कोणत्याही प्रकारच्या अफवा अथवा तर्कवितर्कांपासून दूर राहावे. धर्मेंद्र यांच्या लवकर बरे होण्यासाठी, उत्तम आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी व्यक्त केलेल्या सर्वांच्या प्रेम, प्रार्थना आणि शुभेच्छांसाठी आम्ही मनःपूर्वक आभार मानतो. धर्मेंद्र यांच्या तब्येतीत सुधारणार झाली आहे.