
बॉलिवूडच्या दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्या निधनाला आज अनेक वर्ष झाली आहेत. पण आजही त्यांच्या अनेक आठवणी चाहते आणि अनेक सेलिब्रिटींच्या मनात कायम आहेत. अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका बजावत श्रीदेवी यांनी चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. अशाच सिनेमांमधील एक सिनेमा म्हणजे ‘लम्हे’, 1999 मध्ये प्रदर्शित झालेल्या सिनेमात अभिनेता अनिल कपूर, दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी आणि अभिनेते अनुपम खेर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. तर अभिनेता फरहान अख्तर याने सिनेमॅटोग्राफर मनमोहन सिंह यांच्या असिस्टंटच्या कामापासून करियरची सुरुवात केली..
तेव्हा सिनेमाच्या सेटवर घडलेला एक किस्सा फरहान याने एक मुलाखतीत सांगितलं होता. फरहान म्हणाला ‘माझं दुर्भाग्य असं होतं की, सिनेमाच्या सेटवर एक छोटा अपघात झाला होता. ‘लम्हे’ सिनेमाच्या सेटवर मी मनमोहन सिंह यांचा कदाचित सातवा आठवा असिस्टंट होतो…’
‘सिनेमात एक सीन होता, ज्यामध्ये श्रीदेवी यांना एक वाईट बातमी समजते आणि डान्सच्या माध्यमातून ती स्वतःचा राग व्यक्त करते. श्रीदेवी तेव्हा रिहर्सल करत होत्या आणि महमोहन सिंह फ्रेम चेक करत असताना, तिथल्या फरशीवर एक डाग पडलेला होता, त्यांनी तो साफ करायला सांगितला… तेव्हा मी जवळ बसलो होतो म्हणून गलेच साफ करायला गेलो…’
‘तेव्हा श्रीदेवी घाईत येत होत्या… मी ते पाहिलं नाही… खाली वाकून सफाई करत होतो… तेव्हा श्रीदेवी जमिनीवरून घसरुन खाली पडल्या… अशात सेटवर पूर्ण शांतता पसरली… तेव्हा मला वाटलं माझं करियर संपलं आहे… श्रीदेवी रागवल्या नाहीत आणि म्हणाल्या काहीही नाही असं होत असतं… सगळे हसायला लागल्यानंतर मी सुखाचा श्वास घेतला…’, असं देखील फरहान म्हणाल्या…
1979 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘सोलहवां सावन’ सिनेमातून श्रीदेवी यांनी करीयरची सुरुवात केली. में ‘हिम्मत वाला’, ‘मिस्टर इंडिया’, ‘जुदाई’, ‘लाडला’, ‘खुदा गवाह’, ‘लम्हे’, ‘इंग्लिश विंग्लिश’, ‘चांदनी’ आणि ‘नगीना’ सिनेमात श्रीदेवी यांनी महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्याचं मनोरंजन केलं. आज श्रीदेवी आपल्यात नसल्या तरी, त्यांच्या असंख्य आठवणी चाहत्यांच्या मनात कायम राहतील.